विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 May 2024

बहादुर वाडीतील बाबज्या घोड्याचे थडगे🚩🚩

 



बहादुर वाडीतील बाबज्या घोड्याचे थडगे🚩🚩
सांगली जिल्ह्यांील वाळवे तालुक्यांत बहादुरवाडी या नांवाचा एक घोरपडे देशमुखी यांचे इनामाचा गाव आहे.
सांगलीकर देशमुख व बहादुर वाडीकर घोरपडे भाऊबंद यांच्या मध्ये देशमुखी वरून वैर वंशपरंपरागत होते यामुळे त्यांच्या ह्यांच्या वारंवार चकमकी होत व हें परंपरा कित्येक वर्षे चालू होतें. वाडीकर घोरपडे महिपतरावाच्या मागून पुढे दोन तीन पिढीपर्यंत जे पुरुष त्याच्या देशमुखीचे मालक झाले त्याची नांवें महिपतराय अशीच ठेविली होती, यांपैकी दुसरी महिपतराव हयात असतां गोटखिंडीनजीक सांगली- करांची व त्याची चकमक झाली (सांगलीकरांचे नांव चिंतामणराव सांगतात,) त्यांत सांगलीकरांच्या फौजेचा मोड झाला, त्यांच्या बाजूनें बाबाजी म्हणून एक मराठा सरदार लढत होता तो पडला त्याचा घोडा बहादुरवाडीच्या शिवंत आला तो बहादुरवाडकरांनी धरला, हे बाबाजी खुप पराक्रमी होते जेव्हा बाबाजी मेला तेव्हा त्याच्या आपल्या विरोधात लढणारे वीर मराठा सरदार यांच्या पराक्रमीचे आठवण म्हणून पुढील काळात जेव्हा बाबाजी यांचे अत्यंत प्रिय घोडे मेल्यावर त्याचे थडगे बांधून त्यास • बाबज्या घोड्याचे थडगे असे म्हणू लागले. त्या थडग्यावर घोडयाची प्रतिमा कारलेली असून ते अद्याप पहावयास मिळते
आपल्या विरुद्ध लढणाऱ्या बाबाजी व आपल्या धन्यासाठी अत्यंत एकनिष्ठ असलेल्या प्राणप्रिय घोड्याची स्मृती जपण्याची परंपरा समाधी देखभाल आजही बहादूरवाडीतील घोरपडे घराणं करत आहे येथे भेट देण्याचा योग आले....
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य:- संतोष झिपरे
9049760888

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...