“सेनापती धनाजी जाधव शिवसैन्यात”...
लेखन :गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
सभासदाने आपल्या बखरीमध्ये शिवरायांच्या घोडदळातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत. त्यात आनंदराव, उदाजी पवार, गणोजी शिर्के, संताजी घोरपडे, संताजी जगताप, नेताजी पालकर, परसोजी भोसले, हंबीरराव मोहिते, सावजी मोहिते, मानाजी मोरे, यमाजी काटकर या पराक्रमी सेनानींबरोबरच धनाजी जाधवांचाही नामोल्लेख केलेला आढळतो...!
छत्रपती शिवरायांच्या घोडदळाचे बारगीर (पागा) व शिलेदार असे दोन प्रकार होते :
२).शिलेदार : शिलेदाराला स्वतःचे युध्द साहित्य आणावे लागत असे. हा विभाग स्वतःचे घोडे व हत्यारांच्या साह्याने सरकारी चाकरी करणाऱ्यांचा होता. बारगीर (पागा) व शिलेदारांच्या घोडदळाची रचना व त्यांचे वेतन पुढील प्रमाणे होते :
◆ दर घोडेस्वारास (१ बारगीर.), (वेतन-९ होन वार्षिक रु.)
◆ २५ घोडेस्वारास (वेतन-२ ते ५ होन द.म.), (१ हवालदार.), (वेतन-१२५ होन द.म.)
◆ ५ हवालदार (१ जुमलेदार.), (वेतन-५०० होन वार्षिक रु.)
◆ १० जुमलेदार (१ सुभेदार/हजारी.), (वेतन-७ होन वार्षिक रु.)
◆ ५ सुभेदार/हजारी (१ पंच हजारी.), (वेतन-२ हजार होन वार्षिक रु.)
◆ ५ पंच हजारी (सेनापती/सरनौबत.), (वेतन-१० हजार होन वार्षिक रु.)
या सर्वांना पगाराची रक्कमही रोख दिली जाई. घोडदळाची मुख्य हत्यारे तलवार व भाला ही होती. शिवाय बंदुका व पट्टे वगैरे हत्यारेही असत. शिवरायांचे सैन्य हे स्वराज्याचे सैन्य होते. त्यांनी सर्व जातींना आपल्या सैन्यात स्थान दिले होते. अशा रीतीने शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये वरिष्ठ व कनिष्ट लोकांचा मोठा सहभाग होता. पुढे प्रसिद्ध घराण्यातील तरुणही स्वराज्याच्या सेवेत उतरून शिवरायांचे विश्वासू सहकारी बनले. शिवरायांच्या उत्तर आयुष्यात नावारूपास आलेल्यांमध्ये प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, खंडेराव दाभाडे, रूपाजी भोसले, नेमाजी शिंदे व धनाजी जाधव यांचा समावेश शिवरायांच्या तरुण सरदारामध्ये होतो..
नंतरच्या पिढीत यापैकी काहींची नावे विशेषत्वाने गाजली. खंडेराव दाभाडे व परसोजी भोसले यांनी गुजरात व वऱ्हाडात मराठ्यांच्या सत्तेचा पाया घातला. तर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी केला. सेनापती संताजी घोरपडे व सेनापती धनाजी जाधवांसारखे शेकडो चेले शिवरायांनी निर्माण केले. एखाद्या परीक्षकाने कोळशाच्या खाणीतून हिरे काढावेत त्यांना पारखून पैलू पाडावेत तसे शिवरायांनी सह्याद्रितील दऱ्याखोऱ्यातून नवीन नेतृत्व निर्माण केले. नवीन माणसे व नवीन घराणी पुढे आणली. त्यापैकी धनाजी जाधव हा एक होय. अशारीतीने धनाजी जाधव प्रतापरावांच्या हाताखाली युध्द कलेत तरबेज होऊन त्यांना लष्करी मोहिमेत मोलाची मदत करू लागलेला दिसतो...
――――――――――――
चित्रकार : राम देशमुख
No comments:
Post a Comment