विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 November 2025

पेशवाई काळातील पहिला मुद्रण प्रयोग

 


पेशवाई काळातील पहिला मुद्रण प्रयोग


पेशवाईत राज्यकारभार वाढला. पत्रव्यवहार, फर्माने, बखरी, हकूमनामे इत्यादींची निमिती कागदावरच होत असे. परंतु सर्व हस्तलिखित असे. ग्रंथ, पोथ्या, यांच्या हस्तलिखित प्रती लिहिणारे व्यावसायिक लेखक असत. हस्तलिखित पोथ्या, ग्रंथ तयार करणे हा त्या वेळचा व्यवसाय असे. हे काम करणाऱ्या मंडळींमध्ये गुजराथी व कानडी लोक जास्त असत. लिखणावळ पोथीमधील इलोक संख्येवर आधारित असे. पोथी किंवा ग्रंथ फार मोठा असल्यास सालवार पगारी लेखक नेमले जात. त्यांनी वर्षभरात ठराविक लिखित ग्रंथसंख्या पूर्ण केली पाहिजे असे बंधन असे. लेखनासाठी सामान्यतः दिव्याच्या ज्योतीवर धरणार्‍या काजळीची शाई वापरीत. १००० पृष्ठांच्या लेखनाबद्दल २-३ रुपये मोबदला मिळे.


मोठे धनिक, उमराव, सावकार, ह्यांच्या पदरी असे अनेक लेखक असंत. हिंदुस्थानात मुद्रणाचे तंत्र पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात रूढ केले होते. एका ख्तिस्ती दिल्लीपती सम्राट अकबराला बायबलची छापील प्रत भेटीदाखल पाठवली होती, हे सत्य असले तरी महाराष्ट्राला मुद्रणक्षेत्र अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत जवळ जवळ अपरिचित होते. स्वाभाविकच ज्ञानसंग्रह आणि ज्ञानार्जनपद्धती यावर अपरिहार्यपणे खूप मर्यादा येत. या काळात पाठांतरावर जोर असे तो याच कारणामुळे.


छापील पुस्तके, ग्रंथ, व्याकरणाची पुस्तके, कित्ते, शब्दकोष, अश्ली साधने अजून निर्माण झाली नव्हती. पोथीरूपातील पारंपारिक कथा-पुराणे, धार्मिक वाडमय, या खेरीज अन्य ग्रंथ नव्हते. ग्रंथ, पोथ्या, वाचण्यासाठी नसून श्रवणासाठी असतात अशी सार्वत्रिक ठाम समजूत असे. हस्तलिखिते हाच एक मार्ग असल्यामुळे ग्रंथांच्या किमती खूप असत. भारत ३६१ रु., भागवत ३६ रु., गीता २ रुपये ज्ञानेश्‍वरी २६१ रु., शारीरभाष्य १००० रु., दिवपुराण ६ रु. अशा पेशवाईच्या अखेरच्या टप्प्यातील काही नोंदी जाढळतात.


पुण्याचे तत्कालीन रेसिडेन्ट सर चार्ल्सस् मॅलेट यांच्या सहाय्याने नाना फडणीसांनी पुण्यात एक चित्रशाळा आणि शिल्पशाळा स्थापन केली. शिल्प शाळेत शिकून तयार झालेल्या एका तांबट विद्यार्थ्याकडून मराठी अक्षरांचे खिळे (टाईप) तयार करवून घेऊन भगवद्गीतेचा ग्रंथ छापण्याची कल्पना मनात आणली. पाश्चात्य देशात या वेळेपर्यंत, सुटे खिळे हे धातूचे ओतलेले असत. सुट्या खिळयांचा शोध लागण्यापुर्वी लाकडाचे टाईप कोरून ते वापरण्यात येत असत. त्यानुसारच १७८५ साली, नाना फडणीसानी लाकडी ठोकळ्यांवर अक्षरे कोरून गीता-ग्रंथ छापून घेण्याचा प्रयत्न केला होता.


परंपरेनुसार भगवद्‌गीता व इतर धा लिहवून घेत. भगवद्गीतेच्या अशा प्रकारे तयार केलेल्या वाटण्याची प्रथा होती. जयपुर, वाराणसी, मथुरा, घेतलेले, वेलब्‌ट्टींनी सजवलेले ग्रंथ विकत घेऊन ते इंग्रजी पुस्तकांप्रमाणे ठशात छापणे अधिक चांगले कुशल कारागिरांकडून ठसे करवून घेण्याचा प्रयत्न सफल झाला नाही.त्याकाळी परंपरेनुसार भगवद्गीता आणि इतर धार्मिक ग्रंथ सुंदर अक्षरात लिहून घेत. भगवद्गीतेच्या अशा प्रकारे तयार केलेल्या प्रति ब्राह्मणांना मोफत वाटण्याची प्रथा होती. जयपुर वाराणसी मथुरा येथून सुंदर अक्षरात लिहून घेतलेले सजवलेले ग्रंथ विकत घेऊन ते वाटण्यात येत असत. हे ग्रंथ इंग्रजी पुस्तकांप्रमाणे ठश्यात छापणे अधिक चांगले असे वाटून नाना फडणवीसांनी कुशल कारागिरांकडून ठसे करून घेण्याचा प्रयत्न पुण्यात केला पण तो फारसा सफल झाला नाही. 


पुण्याच्या राजकारणात १७९५ - ९६ सालापासून बेबंध शाही मजल्यामुळे मुद्रणाचा प्रयत्न अपुरा राहिला राजकीय सामाजिक अस्थिरतेमुळे पुण्यातील विविध व्यवसायातील कारागीर स्थिरचरितार्थासाठी देशांतर्गत गेले. तसेच मुद्रण तंत्र जाणणारे कारागीरही परप्रांतात निघून गेले. त्यापैकी एक कारागिराला मिरजेचे अधिपती गंगाधरराव गोविंद पटवर्धन यांनी शोधून त्याला राजाश्रय दिला.  त्या कारागीराने तयार केलेल्या मुद्रिका पाहून पटवर्धनांनी त्याच्याकडून भगवद्गीतेच्या मुद्रा तयार करून घेतल्या. त्या तांब्याच्या पत्रावर शब्द करून लाकडी दाबाने व लाखी शाईने छापून महाराष्ट्रातील देवनागरी लिपीतील हा पहिला ग्रंथ १८०५ सालि तयार केला.



No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...