म्हैसूरवर स्वारी
● या संदर्भात एडवर्ड स्कॉट वेयरिंग लिहितो :
“SambhajiMaharaj in 1686, was engaged against the forts and districts belonging to Bijapur government in the Karnataka...”
औरंगजेब विजापूर घेण्याच्या तयारीत असतानाच संभाजी महाराजांनी चिक्कदेवराय व मुघलांना शह देत कर्नाटकातील गड घेण्यास सुरूवात केली. मार्टीनच्या डायरीत एका घटनेचा उल्लेख आहे. तो प्रवासात असतानाच संभाजी राजांनी आपले मेहूणे हरजीराजे महाडिक यांची जिंजी प्रांताचे प्रशासक म्हणून नेमणूक केली. या नेमणुकीत संभाजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. जिंजीस पोहोचल्यानंतर हरजीराजे यांनी तामिळ प्रांताचा बंदोबस्त भक्कम केला. मुघलांशी संगनमत करू पाहणाऱ्या म्हैसूरच्या निजामाला त्रिचनापल्लीच्या मोहिमेत धूळ चारली. गोवळकोंडा राज्य मुघलांनी जिंकल्यानंतर मुघलांचे तामिळ नाडूमधील आक्रमण त्यांनी शर्थीने थोपवून धरले. १६८९ पर्यंत म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत मराठे म्हैसूर प्रांतात आणि तामिळनाडूच्या उत्तर अर्काट प्रांतात मुघलांशी निकराने लढत होते. याचे सर्व श्रेय हरजीराजे महाडीक यांना जाते.हरजीराजे महाडिक जिंजीत ठाण मांडून राहिले. त्यामुळे दक्षिणेत चाल करून येणाऱ्या मोगलांना मोठा अडथळा उभा राहिला. १७०२ पर्यंत मराठे तामिळनाडूमध्ये ठाण मांडून बसले होते आणि मुघलांशी झुंज देत होते. जिंजीची बळकटी आणि हरजीराजे यांची नेमणूक या घटना संभाजीराजांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतात...
छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिम आखून स्वराज्याचा विस्तार जिंजी किल्ल्यापर्यंत केला. संभाजी महाराजांनी सुद्धा महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून हरजीराजे महाडिक, केशव त्रिमल यांच्या मदतीने स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत पहिल्यापेक्षा अधिक केला. त्यामुळेच हा दक्षिण प्रांत मराठ्यांच्या ताब्यात राहीला. पुढे मुघलांविरूद्ध मराठ्यांना दक्षिण भारतात भक्कम संरक्षक फळी उभारता आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर याच दक्षिण प्रांताचा छत्रपती राजाराम महाराजांना उपयोग झाला. मुघली आक्रमणापासून हा प्रदेश बराच दूर असल्याने छत्रपती राजाराम महाराजांना जिंजी किल्ल्यावरून समर्थपणे राज्यकारभार करता आला. त्यामुळे मराठा राज्य ताबडतोब जिंकण्याच्या औरंगजेबाच्या सर्व योजना लांबणीवर पडल्या नव्हे पूर्णपणे संपल्या...

No comments:
Post a Comment