१८ नोव्हेंबर १६७८ च्या बटेव्हियाहून आलेले पत्र...
● डच लोकांच्या वृत्तांतातही याबद्दल माहिती मिळते, 'गोवळकोंड्याजवळ ९ मैलांवर शिवाजीराजेंचे सैन्य असताना डचांनी त्यांना १००० फ्लोरिनचा व तेथील सुभेदार मादण्णा यांनी २००० होनांचा नजराणा दिल्यानंतर हे सैन्य निघून गेले. १८ नोव्हेंबर १६७८ च्या बटेव्हियाहून आलेल्या पत्रात 'शिवाजीमहाराज गोव्याकडे काही जुलुमजबरदस्ती चालवीत असे. परंतु त्यांचे पूर्वीचे बेत आता त्याचा ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज अंमलात आणतात...' असा उल्लेख देखील आपल्याला आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला घेतल्यानंतर त्या अखत्यारीत येणारी ६० गावे सोडून देण्याचे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कळवले होते. वरील सर्व उल्लेख पाहता, युवराज संभाजीराजांनी आपल्या पहिल्याच स्वारीत बरीच भरपाई स्वराज्यास मिळवून दिली व कुतुबशाही मादण्णाशी दोस्ती घडवून एकार्थाने शिवरायांचे दक्षिण दिग्विजयाचे एक द्वार जिंकले. सन १६७६ च्या अखेरीस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघाले तेव्हा संभाजीराजांवर करवीरप्रांत, राजापूर, विशाळगड, रांगणा, बावडा इ. किल्ल्यांच्या देखरेखीची जबाबदारी देऊन युवराजांस त्यांनी शृंगारपूरी ठेवले...
सन १६७५ अखेरीस सॅम्युअल ऑस्टीन हा राजापुर वखारीच्या लुटीच्या भरपाई मागणीसाठी रायगडावर आला होता. त्यावेळी संभाजीमहाराज, शिवाजी महाराजांच्या बाजुला बसले होते आणि इतर अधिकारी उभे होते असे लिहुन ठेवतो. इंग्रजांसोबतच्या या वाटाघाटी बऱ्याच दिवस सुरु होत्या. सन १६७७ च्या सुरवातीस इंग्रजांनी राजापूर वखार बंद करून तेथील लोकांना सुरतेस परत बोलवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळल्यानंतर इंग्रजांची ही तक्रार मिटवण्याची जबाबदारी त्यांनी संभाजीराजांवर सोपवली होती. छत्रपती संभाजीराजांचे तत्कालीन स्वराज्याच्या राज्य कारभातील स्थान त्यांच्या कार्यकुशल कारभारामुळे वाढतच होते याला दुजोरा देणारे इंग्रजांचे एक पत्र उपलब्ध आहे...

No comments:
Post a Comment