संगमेश्वर तालुक्याच्या ‘शृंगारपूर’ या ऐतिहासिक गावाजवळ रत्नागिरी व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली अभ्यारण्यामधील "किल्ले प्रचितगड"...
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणुन नेमणुक केली. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांनी याच गावात वास्तव्यात "बुधभूषणम" हा संस्कृत ग्रंथ लिहिला नायिकाभेद, नखशिक, सातसतक हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले...
स्वराज्याची धामधूम तळकोकणात सुरु झाली वास्तविक विजापूरकरांच्या मालकीचा हा प्रदेश परंतु जर्जर झालेल्या विजापूर दरबारात एकाही बडा सरदार येथे स्वराज्याविरुद्ध लढण्याच्या तोडीचा नव्हता. अखेर
शृंगारपूरच्या सुर्वे या मांडलीकासचं राजांचा बंदोबस्त करण्यास सांगितले महाराज राजापूर मुक्कामी असतना सूर्यरावास आदिलशाहचा हा निरोप मिळाला. याच वेळी संगमेश्वरी तान्हाजी मालुसरेंच्या पायदळाला महाराजांनी रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी ठेवलेले होते. या सैन्यावर सूर्याजीरावच्या पायदळाने अकस्मात हल्ला केला सुर्वे यांचे सैन्य तसे बरेचं त्यात आकस्मात हल्ला या गोष्टीमुळे मराठे पहिल्यांदा गोंधळले. त्यातच मराठा सरदार पिलाजी निळकंठराव सरनाईक घाबरून मैदान सोडून पळून जाऊ लागले असता खुद्द तान्हाजी मालुसरेंनी त्यांना पकडून एका दगडाला बांधून ठेवले आणि स्वतः शत्रूवर तुटून पडले, या गोष्टीमुळे इतर मावळ्यांमध्ये सुधा कमालीचा चेव चढला आणि शर्थीने लढाई सुरू झाली...

रात्रभर लढाई सुरूच होती नंतर सूर्याजीरावांचे सैन्य माघार घेऊ लागले आणि अखेर अवसान गळून शत्रूसैन्याने पळ काढला. राजापूरहून माघारी आल्यावर महाराजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी तान्हाजींचा यथोचित सत्कार केला परंतु सुर्यरावाचा हिसाब चुकता करण्याचे राहिलेच. तेव्हा थेट पुढे सूर्यराव सुर्वेवर म्हणजे शृंगारपुरावर स्वारी निघाली...
महाराजांची स्वारी अकस्मात व गुप्तपणे आलेली होती त्यामुळे सूर्यरावास युद्धार्थ सैन्य गोळा करायलाही अवकाश मिळाला नाही हेरांकरवी जेव्हा त्याला महाराज शृंगारपुरा नजीक आल्याचे समजले तेव्हा तो खिन्न होऊन बसला अखेर काहीच मार्ग नसल्याने आत्मरक्षणार्थ तो पळून गेला. वास्तविक सह्याद्रीचे पाठबळ दुर्गम आरण्य यांच्या पाठबळा वर वास्तविक सूर्यराव या प्रांती शिरजोर होताच परंतु सह्याद्रीने आसरा दिला तो केवळ एकच वाघास त्यामुळे पळून जाण्याखेरीज सुर्यारावाकडे दुसरा मार्गच नव्हता राजांच्या पालखीने शृंगारपूरच्या झाडीत प्रवेश केला. मावळ्यांनी शृंगारपूर व्यापले होतेच महाराज सुर्यारावाच्या वाड्यात शिरले समोर असलेले सूर्यरावाचे सिंहासन महाराजांनी ठोकरून लावले. प्रभावळी प्रांताची सुभेदारी त्र्यंबक भास्कर यांच्याकडे सोपविली शृंगारपूर जवळील एक गड ताब्यात घेऊन त्यास नाव ठेवले “प्रचितगड”...
शृंगारपूर स्वराज्यात दाखल झाले ती तिथ होती, श्रीनृपशालिवाहन शके १५८३ प्लव नाम संवत्सराची वैखाश शु. ११ म्हणजे सोमवार दिनांक २९ एप्रिल १६६१..
इतिहासकार : वा.सी.बेंद्रे.

No comments:
Post a Comment