विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

मराठेशाहीतले लढवय्या सरदार "संभाजी हैबतराव देशमुख"...

 रायगड जिल्ह्यात किल्ले सुधागड हस्तकगत करण्याचा पराक्रम


मराठेशाहीतले लढवय्या सरदार "संभाजी हैबतराव देशमुख"...

🙏🚩
सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांच्या पराक्रमासंदर्भातील पहिला उल्लेख सन १९०३ साली अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या भोर संस्थानचा इतिहास या ग्रंथात खालील प्रमाणे :
सुधागड किल्ला बिकट, चढून जाऊन एकदम हल्ला करण्यास मार्ग नाही असे पाहून त्यांच्या धारकऱ्यांनी तो युक्तीनेच छापा घालून घेण्याची खटपट केली आणि तो शेवटासही गेली. “साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. तेव्हा संभाजी हैबतराव, राघोजी गौळी, गणजी शिंदे न्हावी, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण, गंगाजी शिंदे वगैरे मुख्य धारकरी असून त्या सर्वांचा सरदार मालोजी भोसले नावाचा होता. त्याच्या हाताखाली जाधव सरनाईक आणि काळू हे दोघे होते. हे तिघेजण प्रथम माळ लावून किल्ल्यावर रात्रीं चढले. या शिवाय किरकोळ मंडळी होती. या धारकऱ्यांस उभे करुन त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढें जाऊन साखरदऱ्याचे माथा गेले. तो गस्त उजवा घालून गेली. तेव्हा संभाजीरावाने पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली व बोकडसिलेचा पाहारा मारला आणि मागे फिरले, तो मागून बाबाजीराव आले तेव्हा त्यांची हटकाहटक होऊन हाणाहाण झाली तेव्हा राघौजी गौळी यांनी हाती चांगला भाला होता तो खलवलविला...
तेव्हा असतील तेव्हा हटकाहटक झाली. तेव्हा एकमेकांची ओळख निघाली. एक जागा होऊन पुढें श्री भोराईच्या टप्प्यावरी गेले आणि तेथे जाऊन उभे राहिले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावून आले. तेथे त्यांची यांची हाणाहाण जाहली. ते समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली...
सदर उल्लेखासंदर्भातील कालखंडासंदर्भात लेखकाने कोणत्याही विशिष्ट अशा कालखंडाचा शकाच्या माध्यमातून उल्लेख केलेला नसून सदरचा पराक्रम हा मोगलांनी सुधागड किल्ला घेतला त्यावेळेचा असून सुधागड तालुक्यातील किल्ले सुधागड या किल्ल्याशी निगडीत आहे...
मौजे तिवरे, सुधागड येथे राजमहामार्गावर शिव मंदिराशेजारी सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी आहे...
अभ्यासक संदीप मुकुंद परब.

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...