विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 November 2025

पेशवे - पोर्तुगीज संबंध :

 पेशवे - पोर्तुगीज संबंध :


गोवेकर पोर्तुगीज आणि पेशवे यांचे राजकीय वैर सर्वपरिचित आहे. तथापि परस्पर देवाण घेवाण, चांगले वेयक्तिक संबंध, यांत राजकारणामुळे अडथळा आलेला दिसत नाही. पेशवा मंडळी आणि पोर्तृगीज डॉक्टर यांतील सामंजस्य, डॉक्टरांनी केलेले वैद्यकीय उपचार यांच्या काही नोंदी ..!!


सन १७२४ मध्ये थोरल्या बाजीरावांनी गोळीची जखम बरी करणारा डॉक्टर गोवेकरांकडे मागितला होता. सन १७४७ मध्ये सदाशिवरावभाऊ पेशव्यांसाठी व्हाईसरायने कोस्मि पितु हा दिवाडी येथे राहणारा गोवेकर ख्रिस्ती डॉक्टर पाठवलां होता. सरदार अर्जोजी यादव याला कोणीतरी विष पाजल्यामुळे २६ एप्रिल सन १७४७ रोजी एका पत्राने पेशव्यांनी गोवेकरांकडे एका डॉक्टरची मागणी केली आहे. त्रिंबकरावमामा पेठे फोंडे येथे डिसेंबर सन १७५६ मध्ये औषधोपचारासाठी येऊन राहिले होते. त्यांनी गोवेकरांकडे डॉक्टरची मदत मागितल्यामुळे त्यांचेकडे डॉ. कोस्मि पिंतु याची योजना करण्यात आली.


डॉ. कोस्मि पिंतु याला नानासाहेबांनी १७५७ साली गोवेकरांकडून पुण्याला बोलावून घेतले. तो पुण्याला पुढील महिन्याच्या एप्रिल अखेरपर्यंत होता. त्याच्यावहल व्हाईसरायला लिहिलेल्या २६-४-१७५८ च्या पत्रात पेशवे म्हणतात, “ कोजम वैद्य यास सरकारात कार्याबद्दल आणिला होता. त्यास याणे सरकार चाकरी बहुत उत्तम केली. हाली यांस रजा देऊन भमोहिबांकडे पाठविला आहे. तरी याचा हरएक बाबे गौर करीत गेले पाहिजे. ”


सन १७६३ च्या जानेवारीत रघुनाथरावांनी गोव्याचा व्हाईसराय कोंदि द यंग याचेकडे फिरंगी वैद्याची मागणी केली होती. सन १७६४ मध्ये रघनाथराव कोस्मि पितुचे औषध घेत असल्याचा उल्लेख मिळतो. थोरल्या नानासाहेबांच्या द्वितीय पत्नी राधाबाई ( वाखरे ) यांना डॉ. मान्‌यल फ्रांन्सिस्कु गोंसाल्विस हा ऑक्टोबर सन १७७१ मध्ये औषध देत असे. थोरल्या माधवरावांच्या आजारपणात फ़ंईल्यिंद्रु द माद्रि द देऊस हा गोवेकर डॉक्टर औषध देत असे.  थेऊरला माधवराव वारले. सौ.रमाबाई सती गेल्या त्या वेळी हा हजर होता. या डॉक्टरांना पेशव्यांनी पालखी दिली होती. डॉ. मानयल फ्रान्सिस्कु गोंसाल्विस यांचे माधवरावांना उपचार चालू असत...!!!


( संदर्भ : पेशवा घराण्याचा इतिहास या पुस्तकातून ) 

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...