विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

 


गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

"वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून सुरक्षित ठेवण्याचे कारण दाखवून मसालेही गोव्याला आणिले आहेत. शिवाजी महाराजांच्या धामधुमीमुळे आमच्या गलबतावरील काहीच माल खपला नाही. शिवाजी महाराजांनी हुबळी व इतर बरीच सधन शहरे वसूल करुन बरेच प्रमुख व्यापाऱ्यांना कैद केल्याची खात्रीलायक बातमी आली. त्यामुळे कारवारच्या बाजूने बाजार तसेच मंदीचे असणार. तो पुढे कोठे जाणार हे नक्की समजले नसले तथापि आमचे कारवारचे दोस्त शिवाजीराजें संनिध येताच माल हलविण्याची तयारी करित आहेत. १७ दिवसांपूर्वी दिसलेल्या धूमकेतूचे परिणाम काय होतात याबद्दल कित्येकांची मने चूर होऊन गेली आहेत. आम्ही कारवारला असताना आमचे गलबत राजापुरास नेऊन लाविल्यास तेथे काही विक्री नक्की होईल असे रावजी पंडिताचे पत्र आले...
“हुबळीला देखील शिवाजी महाराजांचे भय आहे अशी पत्रे आली आहेत. हुबळी किंवा कारवार यापैकी कोठेच सुरक्षितपणा नसून आम्ही बंकापूरला सरसुभेदार शेरखान याचा कौल घेऊन जाऊन रहाणार आहोत, कारण (१) शेरखान वचनाला जागतो अशी त्याची कीर्ति आहे. (२) तो पैसा देण्यात चोख आहे अशीही त्याची ख्याती आहे. (३) आणि बंकापूर मोठे मजबूत स्थान असून तेथील अधिकारी बहलोलखान हाही सर्व राज्यात महाप्रबळ सरदार आहे...”
————————————

महादजी शिंदे यांचेसाह्यकर्ते


 महादजी शिंदे यांचेसाह्यकर्ते

---------------------------------------------------------------------
महादजींच्या कार्याचा व्यापच एवढा मोठा होता की,त्यास जिवास जीव देणारे शेंकडों साह्यकर्ते निर्माण करावे लागले. राणेखानभाई , त्यांचा जावई साहेबखान टोका,अंबुजी इंगळे व त्याचे कनिष्ठ बंधु विठूजी,व बाळोजी इंगळे वगैरे,खंडेराव हरि व त्यांचा मुलगा,बाळोजी व भगीरथ सिंदे, रवळोजी व देवजी गौळी,हैबतराव फाळके,लालाजी बल्लाळ कोटेकर पंडित, रायाजी पाटील सिंदे,बाळाराव गोविंद, व त्याचा आप्त बाळाजी जनार्दन जांबगावकर, रामजी पाटील जाधव,लाडोजी देशमुख शितोळे,जावई बहिरजी ताकपीर,बळवंतराव धोंडदेव, आबा चिटणीस व बंधू गोपाळराव व कृष्णोबा,
शिवाजी विठ्ठल विंचुरकर,माधवराव गंगाधर चंद्रचूड,जिवाजी बल्लाळ बक्षी व बंधु शिवबानाना आणि मुलगे,नारायण जिवाजी व यशवंत जिवाजी,तसेंच जीवबादादाचे तिघे चुलत बंधु जगनाथ राम उर्फ जगोबा बापू,व बाळाजीराम आणि राघोराम,सदाशिव मल्हार उर्फ भाऊ दिवाण आणि बंधु राघो मल्हार व बापूजी मल्हार,बाळाजी अनंत पिंगे उर्फ बाळोबा तात्या पागनीस,लक्ष्मण अनंत लाड उर्फ लखबादादा, तसेच अनुपगीर व उमरावगीर गोसावी,इत्यादि अनेक नांवें महादजींच्या मंडळींत येतात,त्यांच्या हकीकती इतिहासोपयोगी बनल्या आहेत,
या यादींतील सारस्वत वीर व मुत्सद्दी यांचा पराक्रम विशेष आहे.महादजींच्या हस्तकांची नुसती नावानिशी व संख्या भनांत आणिली तरी पेशव्यांच्या सरदारांप्रमाणेच महादजींचा व्याप केवढा मोठा होता हे दिसून येते. त्यांच्या फौजेतील युरोपियन अंमलदारांची यादीच दोनशेची असून जीवबा बक्षीच्या चरित्रांत पृ . २८२ वर सुमारे अडीचशे हिंदी सरदारांची नावांनिशी दिलेली आहे. बाळाराव गोविंद हा पुष्कळ दिवस महादजींचा कारभारी व सल्लागार असून मोठया नेकीनें काम करणारा हुशार असा गणला जात असे.त्यास प्रचारात रावजी असे म्हणत, प्रथम त्याचा वडील बंधु चिमणाजी गोविंद यास पेशव्यांनी पाटण ( राजपुताना ) येथे कमवीसदार नेमिले, त्याच्या वेळीं लालजी बल्लाळ यास कोट्यास नेमीलें
रायाजी पाटील सिंदे हा महादजींचा अत्यंत विश्वासांतला शूर योद्धा असून त्याच्याच पागेत रामजी पाटील जाधव हा आरंभीं बारगीर आणि पुढे महादजींच्या तर्फे पुण्यास वकील असे. ही दोन नांवें भिन्न व्यक्तींचीं होत,
मराठ्यांनी व मुख्यतः सिंदे घराण्याने उत्तर हिंदच्या विस्तृत क्षेत्रांत कारभार केला त्याची दृश्य स्रारकें ठिकठिकाणी नजरेस पडतात,अजमेरच्या भुईकोटाजवळ सिद्यांच्या कोणी सरदाराने एक शिवालय बांधिलेले आहे,नागोरजवळ ताउस सरोवराच्या काठी जयाप्पांची छत्री त्यांच्या दहनभूमीवर बांधलेली असून,शिवाय त्यांच्या अस्थि पुष्करास आणिल्या तेथेही त्यांची एक छत्री व त्यास लागून एक विस्तीर्ण घांट दक्षिणी पद्धतीचा आहे.
पुष्कर गावांत शिरतांनाच एक मोठा घाट लागतो,त्यावर अहल्याबाईंचे अन्नछत्र असून त्यास लागूनच सर्जेराव घाटग्याची बायजाबाईंने बांधलेली छत्री आहे..छत्रीच्या खर्चास दोन गांव इनाम आहेत. पुष्करास ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्धार गोकळ पारख म्हणून सिंद्याचा एक सावकार होता त्याच्या करवी केला,
गौघांटावर एक संगमरवरी छत्री आहे ती संतूजी वाबळे याची असून,या वाबळे घराण्याचा सिंद्यांचे पदरी उदय झाला.इस्माईल बेग गंगाराम भंडारी, खुशालीराम बोहरा, जयपुरचे कारभारी भीमसिंग हळदया वगैरे पुरुष,रणजितसिंग जाठ,गोहदकर राणे,राघवगडकर चव्हाण,काशी नरेश चेतसिंग,हिंमतबहादर गोसावी व त्याचा परिवार,प्रतापसिंग माचेडीवार , जयपुर,जोधपुर,उदेपुर,कोटा,बूंदी वगैरे ठिकठिकाणचे राजे व कारभारी यांचे उद्योग त्या त्या भाषांत उपलब्ध असतील उदेपुरचे कारस्थान मुख्यतः जालीमसिंग कटेकराच्या हातचे असून, तो व लालाजी बल्लाळ यांनी जी कारस्थाने केली,
त्यांचे उल्लेख गुलगुले पंडितांच्या दप्तरात सापडतात,मेडता पाटनच्या लढाया, अजमीरचा वेढा व रजपुतांशी झालेले महादजींचा तह,या सर्व गोष्टी सिनद्यांचे स्मरण ताजे ठेवतील,बुल्यम टोन व ब्राउटन यांच्यासारख्यांनी लिहुन ठेवलेल्या हाकिकती मराठेशाहीच्या निकृष्टावस्थेतल्या होत्या त्यांची दुसरी उज्ज्वल बाजू आपणांस मराठी कागदात मिळते,शिंदे घराण्याने व एकंदर मराठ्यांनी उत्तरेत चांगल्या गोष्टी काय केल्या,देवस्थानांची व धर्माची स्थापना कशी केली,अन्याय व अंदाधुंदी मोडून राज्याची व्यवस्था व लोकांची नीतिमत्ता कशी सुधारली,या गोष्टी बाहेर येऊन इतिहासाची पूर्तता झाली पाहिजे,अभ्यासकांस अद्यापि विपुल क्षेत्र आहे
संदर्भ-मराठी रियासत खंड ७ सरदेसाई.

"#श्रीछत्रपतींची_अष्टसुत्री"


 "#श्रीछत्रपतींची_अष्टसुत्री"

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाने कौतुक करावे, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, सर्वांना आपलेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजीराजांचे केवळ नाव ऐकले, घेतले तरी अभिमान वाटतो, गर्वाने मान ताठ होते. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी 'रयतेचं स्वराज्य' असाच शब्द वापरत. स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सांगता येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाची ही अष्टसुत्री कालातित असून, आजच्या काळातही प्रेरणादायक आहे, जाणून घेऊया महाराजांची अष्टसूत्री...!
१. जिद्द आणि बुद्धिमत्ता
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडचणींवर मात करूनच शिवाजी महाराज पुढे गेले. समस्या आहेत, अपयश आले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत. तर जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. मोहिमा आखताना छत्रपतींनी बुद्धिचातुर्याचा चलाखीने उपयोग करून त्या फत्ते करून दाखवल्या. सूरत मोहीम, आग्रा मोहीम, अफजलखान वध अशी अनेक उदाहरणे महाराजांच्या बुद्धिचातुर्याची देता येतील.
२. आपलेपणा आणि माणुसकी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात जादू होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला हसत हसत आनंदाने सामोरे जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना 'मानकरी', भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा 'भालेराव' अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होऊन चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. स्वराज्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचा ते सन्मान करायचे. एखादा मावळा धारातिर्थी पडला की, कणखर आणि अविचल असलेल्या महाराजांच्या डोळ्यात पाणी यायचे. या आपलेपणामुळेच महाराजांच्या एका शब्दासाठी मरायला आणि मारायला मावळे तयार व्हायचे.
३.कणखर आणि दूरदृष्टी
छत्रपती शिवाजी महाराज कणखर होते. त्यांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. खंबीर आणि अविचल असणाऱ्या महाराजांना समृद्धीचा नियम माहिती होता. शत्रुला लुटून त्याच्याच साधनांनी त्याला मात दिली. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे छत्रपती राजाराम दक्षिणेत सुखरुप राहू शकले. शिवाजी महाराजांच्या अभेद्य किल्ल्यामुळे राजाराम महाराज शत्रूला झुजवत ठेवू शकले.
४. भयमुक्त आणि व्यवस्थापन
आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला छत्रपती शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द शिवाजी महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन एकदम चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळत गेले. आग्र्याहून सुटका ही मोहीम याचेच चपखल उदाहरण म्हणावे लागेल.
५. तणावमुक्त आणि सकारात्मकता
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक आख्यायिका आहे, असेच कायम भासते. महाराजांची प्रत्येक योजना सकारात्मक होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता महाराजांनी असे पराक्रम करून दाखवले आहेत, जे केवळ ऐकल्यामुळे अनेकांच्या भुवया आजही उंचावतात. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली, तरी त्यांनी शांत राहून त्यातून मार्ग काढला. सकारात्मक गोष्टींचा आग्रह धरला. शिवाजी महाराजांची देवावर अगाध श्रद्धा होती. पण अंधश्रद्धा नाही! त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळत असे. पन्हाळगडाहून आणि आग्र्याहून सुटका हे याच सकारात्मकतेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
६. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
छत्रपती शिवाजी महाराजांची राहणी एकदम साधी होती. स्वारीला गेल्यावर महाराज साध्या तंबुत राहत होते. एवढे अधिकार, एवढे वैभव असूनही महाराज साधेपणाने वागायचे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज प्रोत्साहन द्यायचे, त्यांचे मनोबल वाढवायचे, त्यांना प्रेरित करायचे, त्यांचा उत्साह वाढवायचे. शिवाजी महाराज कधीही चिंतेत राहायचे नाहीत. सकारात्मकतेचा प्रेरणास्त्रोत असलेल्या महाराजांमुळे सर्वांमध्ये एक वेगळी उर्जा यायची. प्रत्येक मावळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते.
७. संयम आणि सुरक्षितता
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी संयमाने वागायचे. शिवराय विवेकी होते. शत्रूने कितीही मोठे सैन्य घेऊन स्वारी केली, तरी संयमितपणे, सारासार विचार करूनच ते आपल्या मोहिमा आखायचे. रयतेप्रमाणे मावळ्यांच्या सुरक्षिततेलाही त्यांनी प्राधान्य दिले. आपल्या मावळ्यांसाठी महाराजांनी विटा नावाचे एक हत्यार बनवले. विटा म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येईल असा भाला. हे हत्यार वापरून फक्त तीनशे मावळ्यांनी एक प्रसंग आपल्या रक्ताने इतिहासात कोरून ठेवला, तो म्हणजे पावन खिंडची घटना.
८. दुर्गम गड-किल्ले आणि गनिमी कावा
गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडावच केला. शिवाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय होते. तरी त्यावर पाय रोवून उभे राहत महाराजांची स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे जवळपास ४०० गड-किल्ले होते, असे सांगितले जाते.
।।जय शिवराय।।🚩

बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द ...!

 


बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द ...!

हि कथा आहे शिवकाळातील....!!
बाजी प्रभू देशपांडे.हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी.
बापजादे नावाजलेले पैलवान ,घरची परंपराच मुळी कुस्तीची .गावात बाजींचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती..
पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती.
शिवरायांनी मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात बाजी सुध्दा सामील झाले होते,पण त्या आधी बाजी बांदल देशमुख सरकारांचे दिवान म्हणून होते,राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोर्यांना ठार केले तेव्हा त्यांना बाजीप्रभू देशपांडे हे सोन सापडलं,पण बाजी मनोमनी म्हणत असत कि राजे हे सोन आधी मातीमोल होत..
तुमचा स्पर्श झाला आणि जीवनाचे सोने झाले.राजाना तर रायरी जिंकल्यापेक्षा 'बाजी'मिळाल्याचा आनंद झाला होता..!!
बाजी स्वत पहाटे ३ वा.
उठत असत.पूर्वीचे लोक भल्या पहाटे आपला दिवस सुरु करत असे म्हणजे दिवसभराच्या कामाला जास्त तास मिळत असे.
पशुपक्षी बघा आपला दिवस कसा भल्या पहाटे सुरु करतात अगदी तसेच.
बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती.सर्वजन कसलेले पैलवान हो..
सर्वच लढतीला उठत असत पहाटे...!
बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी.
३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!!
तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!!
बाजी स्वत लढत करत असत ,नंतर ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत ,तद्नंतर २ तास हात्यारांचा सराव.मग अंघोळ पाणी ..
तद्नंतर शंभू-भवानीची यथासांग पूजा झाली कि मग २ शेर तुपातील शिरा न्याहारीला यायचा.
त्यानंतर ५ शेर दुध पिउन मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत...!
एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक ..?
मग काय ..
बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो,त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता ...
माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..!सकाळचा व्यायाम,खुराक,पूजा झाली आणि दिवसभराचे राजकारण संपवून सायंकाळी सुध्दा कुस्ती खेळल्याशिवाय अन्नाचा कण मुखात जात नसे..!
आणि एके दिवशी ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या राजांनी तांबड्या मातीत रंगलेली बाजींची फौज घेवून सिद्दीच्या वेढ्याबाहेर उडी मारली ..!
आणि रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले..
८ तास चिखल वाटेने ,भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून .
बाजी-फुलाजी या सख्या भावांनी राजांसाठी, माय्भूसाठी स्वताच्या देहाची चाळण होऊन सुध्दा ती खिंड सोडली नव्हती...
तोफेंचे बार ऐकूनच तो देह ठेवला..
हि रग,हि जिद्द,हि तळमळ,हि रक्ताची उसळी ..
हि मातृभूमीवर मरायची आग फक्त तांबडी मातीच देवू शकते..
त्याचसाठी हा आजच लेख....!
हे जे बाजी-फुलाजी किंवा अन्य मराठेशाहीचे असे मरायला तयार होत होते हि खरी शिवरायांच्या कार्याची पावती आहे.शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे.
कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो ...
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो ..
तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान हि शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!
जय शिवराय
जयोस्तु महाराष्ट्र...
नरवीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांना विनम्र अभिवादन..
सहजा सहजी ही पोस्ट शेअर होणार नाही
!! राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळं !!

#खूबलढा_मरहाट्टे....

 


#खूबलढा_मरहाट्टे....

🚩
डिसेंबर १७६४
वारंवार कुरापती काढणाऱ्या हैदरचा पुरा बंदोबस्त करावा म्हणून मराठा फौज कर्नाटकात उतरली धुळपांचे मराठा आरमारही मदतीस बोलावले गेले. हैदरचे बळ या मराठा फौजेपुढे कमी होते समोर समोर हैदर लढाई करतच नव्हता...
मराठ्यांचा गनिमी कावा जणू त्याने अंगीकारला होता बंकापुर, सावनुर येथेही चकमकी झाल्या शेवटी सारी मराठा फौज धारवाडच्या किल्ल्या समोर आली दोन महिने नेटाने वेढा चालवून अखेर मराठ्यांनी शेवटी धारवाडच्या किल्ल्यावर मराठ्यांचा ध्वज फडकला हैदरच्या सैन्याला धर्मवाट देण्यात आली...
धारवाड घेतल्यावर मराठा फौज हनगळास आली. १ डिसेंबर १७६४ रोजी हैदरच्या अनवडी येथील छावणीवर मराठ्यांनी हल्ला चढवला तुफान कापाकापी झाली मराठ्यांनी बेजरब घोडी चालवून झाडीत शिरून गारद्यांचे बुरुज फोडून हजार बाराशे कापून काढले. पाच सातशे धरून आणले. चहूकडून सारे उठले पाच सातशे तोफा होत्या त्याही आणल्या थोडेसे मैदान असते तर खास हैदर धरला असता. झाडीने त्याला वाचवले आमचे फौजेत २५ ते ४० माणूस व ७५ घोडे पडले असेल मुरारराव घोरपडे यांनी मोठी मर्दुमकी केली...
● मुरारराव घोरपडे म्हणजे कर्नाटकातील मराठेशाहीचा मूर्तिमंत इतिहास होय...!
मुराररावांच्या शंभर घोडेस्वारांचा एकही अधिकारी असा नव्हता की जो सर्व लष्कराचे सेनापतीपद करू शकत नसे. पण एवढे मोठे कर्तृत्व अंगी असूनही आपल्याला जे स्थान मिळाले आहे ते समाधानी मनाने आणि निष्ठेने सांभाळण्यात तो आपले कर्तव्य मानीत असे. त्यांचे अधिकारी एकमेकांशी अत्यंत आपलेपणाने वागत असत. आणि आपल्या प्रमुखाची आज्ञा पालन करण्यात ते यत्किंचितही कसूर करीत नसत. अशा विविध गुणांमुळे मुराररावांचे सैन्य भारतात त्या काळी असलेल्या इतर कोणत्याही देशी सैन्यापेक्षा निरपवाद उत्कृष्ट होते. मराठा माणसात जे 'गुण असतात ते सर्व गुण तर मुराररावांच्या सैनिकात होतेच, उदाहरणार्थं चपलता, शिस्त, घोड्यांची निगा राखण्यात आणि त्यांचा उत्तम उपयोग करण्यात आपुलकी, इत्यादी. पण या सर्व गुणांशिवाय मुराररावांच्या सैन्यात आणखी काही गुण होते. युरोपियनांशी लढण्याचे प्रसंग आल्यामुळे मुराररावांच्या सैन्याने बंदूका व तोफा चालवण्याचे अद्वितीय कसब आत्मसात केले होते..”
राजकारणात वेळप्रसंगी बाजू बदलाव्या लागतात. तात्पुरते डावपेच म्हणूनही असा बदल केला जातो. मोठ्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी काही वेळा असे धोरण स्वीकारण्यात राजकीय डावपेचांच्या संदर्भात गैर मानले जात नाही. मुराररावांनीही दक्षिण भारताच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्या धोरणात बदल केलेला आहे शत्रू- मित्रांच्या बाबतीत प्रसंगानुसार भूमिकाही बदलली आहे. पण असे करीत असताना त्यांनी अतिशय सावधगिरी घेतली आहे. हैदराएवढा विश्वासघातकी दुसरा शत्रू नाही अशी त्यांची पक्की धारणा होती. मराठ्यांच्या हितसंबंधांना दक्षिणेत धक्का पोहोचू नये अशीही मुराररावांची दृष्टी होती...
या अनवडी लढाईत हैदरअलीचा मोठा पराभव झाला तो जीव वाचवून कसाबसा पळून गेला...

"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया"

 


"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया"

अशी ख्याती असणारा हा गड ज्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी अवघ्या १८ दिवसात तो गडघेतला.पानिपतानंर मराठ्यांस गतवैभव अन मानाचे स्थान ज्यांनी मिळवून दिले ,प्रथम इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांना सळो कि पळो करून
सोडणारे,दिल्लीच्या तख्तावर सलग २५वर्षे भगवा फडकावून थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर
माधवराव सिंदे (महादजी शिंदे ),थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्णकरणाऱ्या या महान सरदारास मानाचा मुजरा .......
रियासतकारांनी महादजी शिंदे यांविषयी म्हटले आहे कि शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि महादजी शिंदेंनी तिच्यावर कळस चढवला..
महादजींची लष्करी प्रतिमानेपोलीयानाहून
कमी नव्हती,नेपोलियन एका लष्करी साम्राज्याचा एका बलाढ्य देशाचा प्रमुख होता.
महादाजींकडे यांपैकी काहीच नव्हते ..त्याना आयुष्यभर स्वकीयांच्या विरोधास सामोरे जावे लागले तो विरोध मोडून काढून त्याना त्यांचा मार्गकाढावा लागला..
त्यांनी जिंकलेला प्रदेशनेपोलीयानाने जिंकलेल्या परदेशाहूनवेगळा नव्हता..
महादजी जर युरोपात जन्माला आले
असते तर त्यांची प्रतिमा नेपोलियनहून थोर झाली असती..
त्यांच्या अलौकिक कारकिर्दीचे वर्णन करणारी कित्येक पुस्तके लिहिली गेली असती..
महादजी शिंदेंचा आंग्ल चरित्रकार कीन याने त्याना अठराव्या शतकात आशिया खंडात होऊन गेलेला सर्वात मोठा पुरुष
म्हणून संबोधले आहे.
आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे ह्या महान लष्करी नेत्याच्या आणि थोर मुत्साद्द्याच्या जीवनावर विशेष साहित्य उपलब्ध नाही..
महादाजींच्या शंभराव्या पुण्यतिथी दिनी बेळगावचे नातू प्रकाशित केलेले चरित्र यांनी लिहिलेले चरित्र हे मराठी साहित्यातील महादजींचे एकमेव
चरित्र आहे..
पानापाताच्या लढाईत महाराष्ट्राची एक संपूर्ण पिढी गारद झाली,महाराष्ट्रात एक लक्षबांगड्या फुटल्या.,पण शिंदे घराण्याला या लढाईचा जबरदस्त तडाखा बसला.,
महादजी शिंदे यांचे एक बंधू तुकोजी आणि पुतण्या जनकोजी हे दोघे पानिपतावर कामी आले,
बंधू दत्ताजी शिंदे हे अगोदर नजीबाच्या कट कारस्थानाला बळी पडलेहोते..आणि वडील बंधू जयाप्पा राजपुतांकडून दगाबाजीने मारले गेले होते..
नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंशकरायची शपथ घेतली आणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त
केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत हावेत भीरकावले. नजीबाचा नातू गुलाम कादर ह्यालाही महादजींनी यातनामय मरण देऊनत्याचा निर्वंश केला..
महादजींनी मराठ्यांच्या इतर शत्रुनासुद्धा चांगलेचवठणीवर आणले..
दिल्लीच्या बादशाहाला नामधारी बनवून
सगळ्या सत्तेची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली..
देशातील सर्व सत्तांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याच्या कल्पनेचे ते जनक होते.,
यांच्याबाबत म्हणताना कर्नल म्यालेसन(malleson) म्हणतो..
It must never be lost sight of that great dream
of Mahadaji Sindia;s life was to unitew all the
nation powers of India in one Great Confedaracy
against The English. In this respect he was the
most far sighted statesman that India has ever
produced...
It was grand idea capable of realization by
Mahadaji but by him alone...
महादजींनी पानपताचा कलंक धुऊन
काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..
ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानातकित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीं सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून
जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही.
त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली.तसाही त्या तथाकथितमुत्सद्द्यांनी पानपताचा पराभव गंभीरपणेमनाला लावून घेतलाच कुठे होतां.??
पानपतावरील सदाशिवभाऊंचे आणि विश्वासरावांचे रक्त वाळते ना वाळते तोच पुणे दरबाराने अब्दालीकडे मैत्रीचा तह केला..
१७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलातपुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..
त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त
ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल
ह्यांच्या नावे सनदा काढल्या:
" गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उटे व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले
आहेत..
त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे
"
पुणेदरबाराने
अब्दालीच्या माणसांची चांगली सरबराई
केली शिवाय भद्रगज नावाचा हत्ती अब्दालीसनजर केला...त्याबद्दलची सनद
"गणेश विठ्ठल याचे नावे सनद कि, किले
अहमदनगर इथे भद्रगज हत्ती आहेव तो अब्दाली शाहास देविला.तरी राजश्री पुरुषोत्तम महादेव वकील यांजकडील कारकून येईल त्याचे स्वाधीन करून
पावालीयाचे काबाज घेणे म्हणून सनद
संदर्भ (सनदा , पत्रे आणि याद्या माधवराव पेशवे १)
असा नामुष्कीजनक समजौता जगात कोणीच केला नसेल ..मराठ्यांनी पानिपतावर स्वत:चे कपाळ फोडून घेतले असले तरी गिलच्याला सुद्धा त्यांनी गुडघ्यावर आणले होते..अब्दालीची ग्वाल्हेरमध्ये उतरायची हिम्मत
नव्हती..मग पुणे दूरच राहिले असते.पानापाताच्या पराभवानंतरही माळव्यात मराठ्यांच्या मजबूत शिबंद्या तळ ठोकून होत्या पानापातावरून जीव
वाचवून परत आलेल्या मराठा सैनिकांना त्यांनी सामावून घेतले होते...त्यांचा धाक अब्ब्दालीला होताच .शिवाय शिखानीही अब्दालीच्या परतेच्या वाटेवर जागोजागी अडथळे आणून त्याच्या नाकी नऊआणले
होते..पण पुणे दरबारातील तथाकथित
मुत्सद्द्यांना अब्दालीशी तह करण्याची घाई झाली होती, म्हणून त्यांनी हा अपमानास्पद तह केला...
असे स्वाभिमानाशुन्य आणि अदूरदर्शी धोरण पुणे दरबारानेमराठ्यांच्या इतर शत्रूंशीही ठेवले ..नजीबनेमराठ्यांचा सर्वनाशकरायची प्रतिज्ञा केली होती त्या नजीबाशीही पुणेदरबाराने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले..नजीबामुळे शुक्रतालावर
दत्ताजीची जशी कोंडी झाली होती..तशी दुआबात मराठ्यांची कोंडी करण्याचा नजीबाने घट घातला पण महादाजींच्या दक्षतेमुळे तो डावमराठ्यांनी हाणून पाडला...
पुणे दरबाराने केलेल्या घोडचुका निस्तरता निस्तरता महादजीच्या नाकी दम आला पण पुण्यातील मुत्सद्द्यांनी कधीच
स्वत:ची चूक मान्य केली नाही आणि त्यांचा पदोपदी अपमान केला ..
पुणे दरबाराच्या ह्या मत्सरग्रस्त वृत्तीवर
सर जदुनाथ सरकार यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत..
"These records prove that in establishing
Maratha control over The Imperial Government
of Delhi and wiping off the disgrace of Panipat,
Mahadaji Sindia Had to Labour alone, nay in the
teeth of pin-pricks and covert opposition by the
court of poona.. and armed help in his sorest
need and insulted him in public..He was called
in Poona Governments letters a cheat, a disloyal
Governments letters a cheat,a disloyal servant, a
selfish upstart....All this Mahadji bore with
infinite patience, just he broke through the
successive nets of intrigue woven around him by
his foreign enemies and nominal allies .He
triumphed in the end....
He Towers over Maratha History in solitary
grandeur a ruler of India, withought any ally,
withought a party, without even able and
reliable civil and diplomatic service..."
जदुनाथ सरकार म्हणतात :"
नाना फडणीसांनी ज्याना त्यांचे चाहते
मराठी Machiavelli म्हणतात त्यांनी Machiavelli चा अर्धा देशाभिमान दाखवून महादजी शिंदे यांना मदत
केली असती महादाजींची पदोपदी अडवणूक केली नसती तर महादजींनी ५ वर्ष अगोदरच दिल्लीवर कब्जा केला असता...आणि इंग्रजाना कलकत्त्याच्या समुद्रात लोटले असते... तसे झाले असते तर महादजी अजून काही वर्षे जगले असते आणि इंग्रजांचे राज्य ह्या देशावर कधीच आले नसते...
पण नाना फडणीसांनी मत्सरी वृत्तीने
महाद्जींच्या मार्गात अडथळे निर्माण केले.."
संदर्भ :- १)सनद १ (सातारा महाराज व
पेशवा दैनंदिनी )
२)सनदा , पत्रे आणि याद्या माधवराव पेशवे

सरदार साबाजी शिंदे

 


सरदार साबाजी शिंदे

अटकेचा विजय हा मराठ्यांच्या उत्तरेकडील मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. २० एप्रिल १७५८ रोजी सरदार साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, खंडोजी कदम आणि मराठा सैन्याने अटकेचा किल्ला जिंकला. या विजयामुळे मराठ्यांचा झेंडा पहिल्यांदाच अटकेपार फडकला आणि पुढे “अटकेपार झेंडा रोवणे” ही म्हण प्रचलित झाली.
इ.स. १७५२ ते १७५६ दरम्यान अफगाणिस्तानचा अहमदशहा अब्दाली उत्तर भारतात वारंवार स्वाऱ्या करत होता. त्याने लाहोर आणि मुलतान हे प्रांत जिंकले आणि मथुरा-वृंदावनसारखी पवित्र स्थळे लुटली. हे प्रकार मराठ्यांना मान्य नव्हते. बादशहाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने आणि अब्दालीला थोपवण्याची आवश्यकता असल्याने मराठ्यांनी मोठी मोहीम काढण्याचा निर्णय घेतला.
मराठा सैन्याने दिल्लीकडे वेळ न घालवता थेट पंजाबकडे मार्गक्रमण केले. सरहिंद येथे अब्दालीचा सेनापती समदखान पराभूत झाला. त्यानंतर मराठ्यांनी लाहोर आणि मुलतान हे दोन्ही महत्त्वाचे प्रांत आपल्या ताब्यात घेतले. या मोहिमेत मराठा सैन्याने रावी, बियास, सतलज आणि चिनाब अशा मोठ्या नद्या पार केल्या. मानाजी पायगुडे लाहोरकडे गेले असता, तेथील शत्रू सैन्याने थेट संघर्ष न करता माघार घेतली आणि लाहोर मराठ्यांच्या हातात सहज आला.
या सर्व मोहिमेचा शेवट आणि सर्वोच्च टप्पा म्हणजे मराठे सिंधू नदीपर्यंत पोहोचणे. सिंधूपर्यंत मराठ्यांचे सैन्य जाणे ही त्या काळातील अत्यंत मोठी कामगिरी होती. याच दरम्यान अटकेचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. हा दक्षिणेतून गेलेल्या कोणत्याही सत्तेचा पहिला अटकेपर विजय होता. या विजयामुळे मराठ्यांची सीमा प्रचंड पुढे सरकली आणि पंजाब-पंचनंद प्रदेशावर मराठ्यांचे नियंत्रण दृढ झाले.
या काळात इराणच्या शाहाकडून मराठ्यांना पत्रे आली. अब्दालीला थोपवण्यासाठी मराठ्यांशी मैत्री ठेवण्याची त्याची इच्छा होती. याचा अर्थ त्या प्रदेशात मराठ्यांची सत्ता मान्य केली जात होती. मराठ्यांनीही काबुल–कंदहारपर्यंत प्रभाव वाढवण्याची तयारी दर्शवली होती.
अखेरीस मराठा फौजा मूळतान आणि अटकेपर्यंतचा मोठा प्रदेश काबीज करून परतल्या. या मोहिमेत साबाजी शिंदे, तुकोजी होळकर,खंडोजी कदम आणि मानाजी पायगुडे यांचे विशेष योगदान होते. संपूर्ण मोहिमेत मराठ्यांनी अब्दालीला उत्तरेतून खऱ्या अर्थाने रोखून धरले आणि मराठा सामर्थ्य अटकेपर्यंत पोहोचवले.

तिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हर्णे बंदर. ह्याच हर्णे गावाजवळ सागरी किल्ला “सुवर्णदुर्ग”...

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ऐ


तिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हर्णे बंदर. ह्याच हर्णे गावाजवळ सागरी किल्ला “सुवर्णदुर्ग”...

सुवर्णदुर्ग किल्ला व्ही आकाराच्या खडकावर वसला आहे या किल्ल्याचा आडोसा हा बंदरातील बोटींना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित निवारा देण्याचे ठिकाण आहे. हर्णे बंदरासाठी प्रस्तावित असलेली जेटी सुवर्णदुर्ग ते भुईकोट किल्ला अशी बांधणे आवश्यक असल्याचे मत येथील जाणकार व्यक्त करतात हर्णे बंदरात पूर्वी साध्या होड्यांनी मस्त्य व्यवसाय चालत असे...
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा आरमाराचा दरारा कायम होता. संभाजीराजें सातत्याने युद्धात गुंतले असताना सुद्धा सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज या सागरी प्रबळ सत्तांना मराठ्यांचे जलदुर्ग जिंकून घेता आले नाहीत. उलट संभाजीराजेंनी सिद्दीच्या उंदेरीवर दोन वेळा हल्ला केला. जंजिऱ्याच्या खाडीत सेतू बांधण्याचा प्रयत्न करत संभाजी महाराजांनी सिद्दीला अक्षरशः जेर करून टाकले. अंजदिव बेटावर, कल्याणच्या खाडीच्या मुखाशी पारसिक डोंगरावर, चौलजवळ किल्ले बांधण्याचा प्रयत्न करून त्यांनी पोर्तुगीजांना हवालदिल करून सोडले. इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी संभाजी महाराजांनी एलिफंटा जवळील बेटावर सुद्धा किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला...
● किल्ले सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे यांचा उदय :
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सुवर्णदुर्ग वर अचलोजी मोहिते नावाचे किल्लेदार होते. इसवी सन १६८८ मध्ये भर समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यास सिद्दीने वेढा घातला. सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूने आरमार व जमिनीच्या बाजूने सैन्याची भलीमोठी फळी उभारून सिद्दीने सुवर्णदुर्गाची नाकेबंदी केली. सिद्दीने राजकारण करून सुवर्णदुर्गच्या किल्लेदारालाच आपल्या बाजूने वळवून घेतले. किल्लेदार फितुर होऊन सुवर्णदुर्ग सिद्दीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यातील कान्होजी आंग्रे नावाच्या तरूणाला मान्य नव्हती. त्याने रातोरात सुवर्णदुर्गावरील आपल्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदारालाच कैद करून गडाचा ताबा आपल्याकडे घेतला...
यानंतर कान्होजींनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्दीवर हल्ला चढवला. दुर्दैवाने तो फसला आणि कान्होजी आंग्रे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह सिद्दीच्या कैदेत सापडले. परंतु कान्होजींनी सिद्दीच्या कैदेतून शिताफीने आपली सुटका करून परत मराठ्यांच्या या चिवट लढ्यामुळे अखेर सिद्दीला माघार घेऊन वेढा उठवावा लागला. सुवर्णदुर्ग गाठला. गडावर येताच कान्होजी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवत राहिले कान्होजींच्या या पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली. पुढे हेच कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे सरखेल बनले...

मराठ्यांची इतिहासातील सेनापती धनाजी जाधवांचे स्थान...

 


मराठ्यांची इतिहासातील सेनापती धनाजी जाधवांचे स्थान...

🙏🚩
आतापर्यंत आपण मराठ्यांच्या इतिहासातील अभ्यासाच्या दृष्टीने उपेक्षित असणाऱ्या धनाजी जाधवांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यावरून धनाजी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाईसाहेब (शिवाजीराजे दु.) यांची कारकीर्द आपल्या कर्तृत्वाने गाजविली...
मराठ्यांच्या बाजूने मोगलांशी सतत २६/२७ वर्षे लढा देणारा धनाजी जाधव हे, एकमेव सेनानी होते. त्यांचे इतिहासातील स्थान त्यामुळे आगळे-वेगळे ठरते. यादवांची महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर रामदेवरायाच्या काळात त्या सत्तेचा उत्कर्ष झाला, परंतु अल्लाऊद्दीन खिलजीच्या आक्रमणाने हे शेवटचे हिंदू राज्य रसातळाला गेले. पुढे लखुजीराजे जाधवांनी सिंदखेडचे वतन स्वपराक्रमाने आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या पश्चात जाधवांच्या घराण्यात लखुजीराजेंच्या तोडीचा एकही पराक्रमी पुरुष निपजला नाही. सन १६५० ला मिळवून धनाजी जाधवांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या सामर्थ्याने स्वतःचे मराठ्यांच्या इतिहासात निर्माण केले. त्यामुळे जाधव घराण्याला पुन्हा प्रतिष्ठान मानसन्मान मिळाला. स्वराज्यस्थापना, स्वराज्यरक्षण व स्वराज्यसंवर्धनात ज्या ज्या मराठा घराण्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यामध्ये जाधव घराणे आघाडीवर होते. हा नावलौकिक धनाजी जाधवांमुळेच प्राप्त झाला...
विजापुरी सरदार युसुफखान व हुसेनखान मियाना या बंधूनी स्वराज्यातील जनतेला त्रास द्यावयास सुरुवात केली तेव्हा साजरा-गोजरा किल्ल्याच्या परिसरातील जनतेने सेनापती हंबीररावांकडे तक्रार केली, अशा वेळी त्यांनी मियाना बंधूवर स्वारी करून विजापुरी सैन्यास पळवून लावले. हंबीरराव यांच्या सोबत या सावनूरच्या युद्धात धनाजी जाधव होते. सावनूर विजयानंतर धनाजी जाधव शिवरायांना रायगडावर भेटले. तेव्हा धनाजी जाधवाची तारीफ करताना शिवराय उद्गारले :
“ही मनुस्ये प्रतिसृष्टी निर्माण करतील. आम्ही नसता बादशहाशी स्पर्धा करून मुलूख घेऊन गर्वरहित केला. आमच्या साह्यार्थ हे देवलोकीहून मनुस्यरूपी निर्माण झाले असे वाटते...”
सेनापती धनाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या इच्छेप्रमाणे औरंगजेबाला पराभूत करून स्वराज्य वाचविले. ही प्रतिसृष्टीच त्यांनी निर्माण केली. मोगलांनी जो मुलूख गिळंकृत केला होता, तो मुक्त केला ही महान कर्तबगारीच होती. स्वराज्य संस्थापकाने जो विश्वास धनाजींवर टाकला होता तो त्याने अशा प्रकारे खरा करून दाखविला. मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजास स्वराज्याचे छत्रपतीपद मिळू नये म्हणून राणी सोयराबाई, त्याबरोबरच त्यांनी थोर स्वामी निष्ठाही जोपासली. छत्रपती शिवरायांच्या अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, हिरोजी फर्जद ही मंडळी कार्यरत होती. या कटापासून सेनापती हंबीरराव मोहिते व धनाजी जाधव ही नव्या दमाची मंडळी अलिप्त होती. त्यांना स्वराज्याचा कायदेशीर वारस शिवपुत्र संभाजी महाराजच मान्य होते, म्हणून संभाजी महाराजांच्या विरोधकांना त्यांनी हाणून पाडले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचा कारभार रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपविला गेला. याही काळात शत्रुशी संघर्ष देऊन स्वराज्याचे रक्षण धनाजींने केले. छत्रपती राजाराम महाराजांनी जो विश्वास या कर्त्यामंडळीवर टाकला होता, तो विश्वास खरा करून दाखविला. ताराबाईसाहेबांच्या काळात सेनापती या नात्याने धनाजी जाधवांनी अव्याहत मोगलांशी संघर्ष दिला. छत्रपती शाहूमहाराज आगमनाने तर त्यास छत्रपतीपद मिळवून दिले. ही सर्व धनाजींची स्वामीनिष्ठाच होती. त्यांच्या समस्त आयुष्यात स्वराज्य व स्वामीद्रोह घडला नाही...!
म्हणूनच त्यास मराठेशाहीचा खरा व यशस्वी सेनापती म्हटले पाहिजे. मोगल-मराठा संघर्षात सतत विजेसारखा चमकणारा व ठिकठिकाणी मोगलांना पराभूत करणारे धनाजी जाधव हे मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानायक होय. छत्रपती शिवरायांपासून ते महाराणी ताराबाईसाहेब काळापर्यंत धनाजींने मोगलांशी शेकडो लढाया दिल्या. औरंगजेब अगदी हताश अवस्थेत अहिल्यानगरला २० फेब्रुवारी १७०७ मध्ये मृत्यू पावला, तेव्हा मराठ्यांचे गेलेले सर्व किल्ले त्यांनी परत जिंकून घेतले. लोदीखानाचा पराभव करून पुणे-चाकण मुक्त केले. नर्मदेपासून कर्नाटकापर्यंतचा सर्व मुलूख काबीज करून मराठेशाहीची पुन्हा स्थापना केली. मोगल-मराठा संघर्ष औरंगजेबाच्या मृत्यूने संपला. मराठ्यांना हा शेवट फायदेशीर ठरला. या काळात मराठ्यांचे नेतृत्व धनाजी जाधवांनी करून अंतिमतः मराठ्यांना विजय मिळवून दिला. मोगल सैन्य निमूट पणे उत्तरेची वाटचाल करू लागले. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी झाले. याचे सर्व श्रेय धनाजी जाधव यांच्याकडे जाते...
पंचवीस वर्षे, जवळ जवळ पावशतक औरंगजेब मराठ्यांशी लढाया करीत होता. त्यात त्याला काय मिळाले या बाबत स्मिथ म्हणतो, "महाराष्ट्राने औरंगजेबाच्या देहावरच थडगे रचले नाही तर त्याच्या साम्राज्यावरही..."
तर जदुनाथ सरकार म्हणतात, "महाराष्ट्राने केवळ औरंगजेबाचेच कार्य नव्हे, तर त्याच्या पूर्वजांचे कार्यही शून्यवत करून टाकले..." या पाठीमागे मराठा योद्धा सेनापती धनाजी जाधवरावांची तडफदार कामगिरी होती...!
तसेच धनाजी जाधवराव मराठ्यांच्या इतिहासातील एक मुरब्बी राजकारणी होते. मोगल-मराठा संघर्षात धनाजी जाधवरावांनी बादशहाशी लढताना कधीही शरणागतीचा विचार मनात येऊ न देता मोगलांवर धाडसी हल्ले केले. मोगलांच्या अफाट सैन्याशी धानजींनी शेकडो लढाया दिल्या. त्यातील बहुतेक लढाया मैदानात दिल्या. यावरून ते केवळ असामान्य सेनानीच नव्हते ते मुरब्बी राजकारणी होते. हे स्पष्ट होते. सन १७०३ व १७०६ मध्ये बादशहाने धनाजी जाधवांशी कामबक्ष व जुल्फिकारखानाच्या पुढाकाराने तहाचा प्रस्ताव मांडला पण दोन्ही वेळा वेळकाढूपणाने बादशहास झुलवीत ठेवण्यात त्यांनी मोठी मुत्सद्देगिरी दाखविली आणि मोगलांचे अंकित होण्याचे नाकारून आपला वेगळाच ठसा मराठ्यांच्या इतिहासात उमटविला. या शिवाय एक व्यक्ती म्हणून धनाजी सहिष्णुतावादी होते. हे खालील उदाहरणाने सिध्द होईल..
● मोगल इतिहासकार काफीखान म्हणतो :
“धनाजी जाधवांचे संताजी घोरपाड्यांवर सैन्य पाठवून त्याचा नाश केला” पण हे सर्वस्वी खोटे आहे. मल्हार रामराव चिटणीसाच्या मते, "संताजी घोरपडे हे काही कारणाने चंदीत महाराजांकडील लोकांशी तंटा करून झुंजले. यावरून त्याजवर माने सरदार पाठविले व हल्ला करविला. तेव्हा सरदार लोक यांनी बहुत रदबदली करून मातबर मानूस चाकरीवर मारावे, म्हणून राहविले, इतराजी जाहली. सेनापतीपद धनाजी जाधवास दिले..." यावरून धनाजी जाधवांनी काफीखान म्हणतो तसे “संताजीस मारविले" हे साफ खोटे ठरते. संताजींच्या विनाशामध्ये धनाजी जाधवाचे अंग नसून, उलट त्यांनीच छत्रपती राजाराम महाराजास दोन गोष्टी सांगून संताजींबद्दल रदबदली केली असेच वरील मजकुरावरून दिसते. पुढे म्हसवडकर नागोजी मानेने संताजीस ठार केले. त्याचा दोष धनाजींवर नाही. आपणास सेनापतिपद न देता ते संताजीस दिले, याबाबत धानजींनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही, अथवा आपणास महाराजांनी सेनापतिपद दिले नाही याबद्दल जसे संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांविरुध्द बंड करून उठले तसे धनाजी जाधवांनी केले नाही. यावरून धनाजी जाधव इतरांचा उत्कर्ष झाल्यास त्यात विघ्न न आणता संतोष मानणारे होते. या मधून धनाजी जाधवांची परोत्कर्ष सहिष्णुवृत्तीच नजरेस येते. या शिवाय धनाजी मराठ्यांच्या इतिहासातील एक चारित्र्यसंपन्न व्यक्ती होते...
छत्रपती राजाराम महाराजानंतर ताराबाईसाहेब-शाहूमहाराज काळातही धनाजींकडे मुलकी व लष्करी दोन्हीही खाती ताब्यात होती. तरी जहागिरीची सनद करून घेतली नाही. छत्रपती राजारामांनी बोरगाव व पाडळी ही दोन गावे सनद करून दिली होती. तसेच धानजींनी ब्राम्हण-मराठा असा भेद अंतःकरणात मुळीच बाळगला नाही. याप्रमाणे धनाजी जाधवांनी महाराष्ट्राकरिता मोठी कामगिरी करून १०/१५ लाखाचा मुलूख जहागिरी दाखल तोडून घेण्याऐवजी स्वार्थ त्याग करून फक्त दोन गावे छत्रपतींनी इनाम म्हणून दिली. त्यावरच समाधान मानले. या शिवाय एक हजार रुपये भरून पाच गावे व पुन्हा पाच हजार रुपये भरून एकशे अडतीस गावांची देशमुखी रीतसर खरेदी करून आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन करून ठेवले...
हा स्वार्थत्याग पुढे छत्रपती थोरले शाहूमहाराज कारकीर्दीत कोणत्याही शूर पुरुषांच्या चरित्रात आढळत नाही. पेशवेच स्वार्थी बनले, मग बाकीच्या सरदारांची काय कथा ! या प्रमाणे धनाजी जाधवांने आपल्या वडिलोपार्जित सिंदखेडच्या देशमुखी मध्ये वाटणी न मागता, आपल्या पराक्रमाने निराळेच वतन संपादन केले. त्या वतनाचा कारभार आपला ज्येष्ठ मुलगा सज्जनसिंह ऊर्फ संताजी जाधव याकडे सोपविला आणि आपण स्वतः व आपल्या चंद्रसेन व शंभुसिंग जाधव या मुलांच्या मदतीने स्वराज्यकार्य सुरू ठेवले. मुलकी व लष्करी दोन्ही कार्य शेवटास नेऊन स्वराज्यहित साधले...
सेनापती धनाजी जाधव एक उदार अंतःकरणाचे व्यक्ती होते. छत्रपती राजाराम महाराज नंतर सर्व राज्याच्या बंदोबस्ताचे कार्य धानजींकडेच होते. पुढे मोगलांशी लढण्याची संपूर्ण जबाबदारी धानजींवर पडल्याने सन १७०६ मध्ये त्यांनी वसुलीच्या कामाकरिता अंबाजी पुरंदरे व बाळाजी विश्वनाथ यांना आपल्या पदरी ठेवले बाळाजी विश्वनाथ हा लबाड व स्वार्थी असल्याचे चंद्रसेन जाधवांच्या नजरेस आले. त्याबद्दल त्याने वडिलास (धनाजी जाधव) हे आपल्या पदरी नसावेत म्हणून सांगितले. परंतु धनाजीने त्याकडे दुर्लक्ष केले. ते वयोवृध्द व उदार बुध्दीचे या कोकणस्थांचे गैरवर्तन त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नसावे असल्यामुळेकिंवा लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले असावे. याशिवाय धनाजी जाधवांकडून छत्रपती शिवरायांच्या धोरणाचा विस्तार झाला. शिवरायांनी अमलात आणलेल्या गनिमीकावा युध्दपध्दतीत भौगोलिक घटकांचा समन्वय, युध्दतंत्र, युध्दशास्त्र व सुरक्षा यंत्रणेशी जोडून लोकांच्या वागण्याशी सांगड घातली. परिणामतः अत्युच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या मराठ्यांची एक फळीच तयार झाली. "छत्रपती संभाजी महाराज हत्येनंतर चमकलेले सप्तर्षी” म्हणजे संताजी, धनाजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम त्र्यंबक, खंडो बल्लाळ व प्रल्हाद निराजी हे शिवरायांच्या ध्येय धोरणाचाच परिपाक होत...
शिवछत्रपतींनी स्वराज्याचा विस्तार करताना भौगोलिक रचनेचे भान ठेवून स्वराज्याकरिता प्राणाची बाजी लावणाऱ्या मराठा सेनानींची मालिकाच विकसित केली. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात बलाढ्य शत्रूसमोर स्वराज्य टिकून राहिले. याचे कारण धनाजी मराठेशाहीतील उत्कृष्ट संघटक व व्यवस्थापक होता. त्याच्या संघटन व व्यवस्थापन कौशल्याची वैशिष्ट्ये यात आहे की कधी पराजय पदरी येत असताना जनतेचा त्याचेवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. कधी त्यांच्या विरुद्ध त्याच्या सैनिकांनी बंडखोरी केली नाही. उलट सैन्यात तो प्रिय असल्याचेच मोगल इतिहासकारांचे मत आहे. जनता व सैनिक मोठ्या विश्वासाने त्याच्या सोबत व पाठीशी खंबीरपणे राहिली. मोगलांविरुद्ध आपणास निश्चित यश मिळेल ही त्यांनाही खात्री असावी. कारण अपयश आल्यास सर्वांचाच विनाश होता. त्याविरुद्ध खंबीरपणे लढण्याचा निर्धार धनाजी जाधव, त्याचे सैनिक, जनता व छत्रपतीनी केला होता. त्यात अखेर मराठे विजयी ठरले...
————————————
आर्टिस्ट : शेखर शिंदे.

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...