विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 February 2026

*बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररी पँरिस, फ्रान्स मध्ये संग्रहीत केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रं*

 





*बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररी पँरिस, फ्रान्स मध्ये संग्रहीत केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रं*

इटालियन प्रवासी निकोलाओ मानुची याने तयार करवून घेतलेल्या चित्रांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक चित्र आहे. मानुचीचा हा अल्बम पँरिस मधील बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररीच्या संग्रहात आहे.
अलीकडे काही लोक मीर मुहम्मदाने काढलेल्या या चित्रात दिसणाऱ्या दाढीवाल्या सैनिकांवरुन शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान होते अशी तथ्यहीन विधानं करत असतात.
यासंदर्भात १९७६ साली प्रकाशित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथामध्ये थोर इतिहास संशोधक श्री ग.ह.खरे यांनी लिहिलेला "शिवाजी महाराजांची चित्रे" हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दिसणाऱ्या दाढीवाल्या शिपायांबद्दल श्री खरे यांचा अभिप्राय पुढील प्रमाणे आहे.
"या शिपायांपैकी आठ जणांना दाढी आहे. तरीही त्यातील निदान पाच जणांच्या कानांत एकेक मोती घातलेली बाळी आहे. शिवाय अनेक जणांच्या कपाळास गंधाचे वाटोळे टिळे असून काहींच्या कपाळावर उभी आडवी गंधे असल्याचाही भास होतो. यामुळे बहुतेक शिपाई हिंदू , पण थोडेसे मुसलमानही आहेत असे वाटते."
श्री ग.ह.खरे यांनी त्या काळी हे चित्रं भिंगाच्या साह्याने काळजीपूर्वक पाहून ही निरिक्षणे नोंदवली आहेत.
आता अधुनिक काळात हे चित्र ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे आणि झूम करुन पाहता येत असल्यामुळे श्री खरे यांनी त्या काळात नोंदवलेले , "काहींच्या कपाळावर उभी आडवी गंधे असल्याचाही भास होतो." हे विधान किती अचूक होते हे वाचकांना तपासून पाहता येईल, कारण आताच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने झूम करून पाहिले असता ती उभीआडवी गंधच आहेत हे स्पष्टपणे दिसून येते !
शिवाय मी हे संपूर्ण चित्र झूम करून पाहिले असता एकूण एक शिपायांच्या कानात बाळ्या आणि बहुतांश शिपायांच्या कपाळावर गंध रेखाटलेले आहे असे मला आढळले.
मुसलमान लोकांमध्ये कान टोचत नाहीत त्यामुळे त्यांना 'अविंध' असे म्हणतात.
बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररी पँरिस, फ्रान्स येथे संग्रहीत चित्र

No comments:

Post a Comment

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...