"Benevolent Monarch" छत्रपती थोरले शाहू महाराज प्रजाहितदक्ष राजा...
प्रजेबद्दल प्रेम असणारा हा राजा उदारमतवादी होते. माझ्या राज्यातील रयतेस त्रास होता कामा नये, अशी तळमळीने लिहिलेली अनेक पत्रे आहेत. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, ही शिवरायांची आज्ञा प्रसिद्ध आहे. तेच धोरण या नातवाने राबविले होते. अशा राजावर प्रजाही प्रेम करते. सैन्य, सरदार त्यांची आज्ञा आनंदाने सांभाळतात. भीतीयुक्त आदर आणि आदरयुक्त भीती यामध्ये मूलभूत फरक आहे. शाहू महाराज दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व होते. प्रजा आणि राजा यांच्यात प्रत्यक्ष सुसंवाद असतो, तेव्हा राज्यात आनंदी वातावरण असते. प्रजा संतुष्ट असते आणि जेव्हा प्रजेसाठी राजवाड्याचे दरवाजे बंद असतात, तेव्हा मध्यस्थांचे प्रजेवर जुलूम होत असतात. ती राजशाही जुलमी असते. त्याला Despotism म्हणतात...
● किल्ले अजिंक्यतारा जिंकण्याच्या वेडात आपलेच हजारो सैन्य मरण पावल्याचे पाहून औरंगजेब म्हणतो,
“त्या प्रेतांच्या राशी रचा व किल्ल्यावर चढा..” ही झाली जुलमीसत्ता. शाहूमहाराज मानवतावादी होते. लोक त्यांना कधीही भेटू शकत होते. आपल्या समस्या, गाऱ्हाणी, अन्याय सांगू शकत होते. त्यांना न्याय मिळत होता. दिवसातून पाचशे कागदपत्रांचा निपटारा करणारा, उत्तरे देणारा हा राजा लोकात मिसळत असे, रमत असे. म्हणून झाडाखाली बसून एका माउलीने दिलेले जेवण आनंदाने खातो. झाडाच्या मोठ्या पानावर इनामपत्र देतो. नंतर त्याला योग्य रूप देतो. म्हणून प्रारंभी लिहिलेय, “शाहूमहाराज राजापेक्षा आदर्श मानव होते...'
छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात, कार्यात काही दोष (Demerits) नव्हते असे नव्हे. काही उणिवा किंवा कमतरता (ShortComings) होत्या. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली जाते. त्यांनी युद्धात सैन्याचे नेतृत्व केले नाही. ते एक सैनिक म्हणून अयोग्य नव्हते, पण ते उत्तम सेनापती होते याला आधार नाही. त्यांनी मोहिमांमधून देशभर मार्गक्रमण केले असते तरी अजून खूप काही मिळवले असते. अर्थात त्यांना स्वतः मधील या उणिवेची जाणीव नव्हती असे नव्हे. उदा. आंग्रेनी गोवळकोंडला वेढा घातला, तेव्हा प्रत्यक्ष त्या मोहिमेत जावे अशी इच्छा त्यांनी पेशव्यास लिहिली होती. ते पत्र पेशवे दप्तर ३३ (३२४) उपलब्ध आहे. पण, तसे झाले नाही. याबाबत ते परावलंबी राहिले. हुजूर (सैन्य अगदी मोजके होते. त्यांचे धोरण समंजसपणाचे होते. सेवकावर आज्ञा पालनाची सक्ती ऐवजी मन वळविण्याचा प्रयत्न करीत. आज्ञापत्र पाठवित राहात. उदा. रघुजीराजें भोसलेंकडून आर्थिक येणे बाकी होते. त्यास वारंवार लिहीत राहिले...
राजा म्हणून कारभार करताना कठोरपणा घ्यावा लागतो. तो त्यांच्या स्वभावात नव्हता. स्वत: राजाची, राज्याची आर्थिक स्थिती खराब होती. शिवरायांच्या धोरणाशी ही विसंगत परिस्थिती होती व हा महत्त्वाचा दोष होता. शाहू महाराजांनी ठराविक पगार देण्याऐवजी काही कुटुंबांना कोणत्याही परगण्याचे महसुली उत्पन्न लावून देण्याची प्रथा सुरू केली. त्याचे दुष्परिणाम झाले. आ.पवार यांनी हा दोष स्पष्ट केला आहे. 'जुने मोडू नये, नवे करू नये' हे शाहूंचे धोरण होते. हे देखील शिवरायांच्या धोरणाला धरून नव्हते. त्यांनी अनेक क्रांतिकारक बदल घडविले. पण शाहूंनी जुने चालू ठेवणे पसंत केले. खरंतर बदल, सुधारणा हा निसर्ग नियम आहे. शाहूंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा मर्यादित होत्या. दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ व्हावे असे त्यांना वाटले नाही की जे सहज शक्य होते. उलट खिळखिळी झालेली मोगलसत्ता टिकवून ठेवण्यात धन्यता मानली...
: श्रीशंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज.
―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #छत्रपतीशाहूमहाराज
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #रणमार्तंड_मरहट्टे

No comments:
Post a Comment