विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

‘महान दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रे’... 🚩

 छत्रपती शिवरायांचे आरमारी वर्चस्वाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे, सलग तिन दशके समुद्रावर हुकूमत गाजवणारे


‘महान दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रे’...

🚩

छत्रपती शाहू महाराजांनी त्यास एका प्रबळ सत्तेचे 'सरखेल' पद देऊन त्यांची प्रतिष्ठा वाढविली व त्यांनीही या पदाचा मान राखला. शाहू महाराजांनी त्यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक केले होते. एका छत्रपतींकडून झालेली ही प्रशंसा म्हणजे कान्होजींना मिळालेले सर्वश्रेष्ठ प्रशस्तीपत्र होते...

● कान्होजींच्या कार्याचे मूल्यमापन करताना डॉ.सेन लिहितात,
"Kanhoji Angre Occupies a Unique Position in the History of the Country. For four Decades a Terror of the Maritime Powers of the Western Coast, he led this Sailers from Victory to Victory and raised the Naval Prestige of Maharashtra to an Unprecedented height. Yet we know little or nothing about his early Career...

कान्होजींनी १७१७ ते १७२२ पर्यंत इंग्रजांचे नंतर इंग्रज व पोर्तुगीजांचे हल्ले निकामी केले. १७१४ साली डचांनी विजयदुर्गावर आक्रमण केले. पण, कान्होजींनी सर्वांना पराभूत केले. यावरून कान्होजी प्रबळ होते हे सिद्ध होते...

● सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा :
“शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा
कान्होजी सरखेलस्य मुद्री येकम विराजते”...

पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले. जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले...

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #सरखेल_कान्होजी_आंग्रे
#छत्रपतीशाहूमहाराज #जलदुर्ग_विजयदुर्ग
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #मराठा_आरमार

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...