विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 August 2026

श्री कालभैरव आणि शिंदेशाही पगडी..

 





श्री कालभैरव आणि शिंदेशाही पगडी..

उज्जैन ही महाकालाची नगरी म्हणून ओळखली जाते. या पवित्र नगरीचे रक्षणकर्ते आणि सेनापती म्हणून भगवान कालभैरव यांना विशेष मान आहे. मराठा ् कालखंडात भगवान कालभैरव आणि शिंदे घराण्याचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक संबंध सांगितला जातो.
तिसऱ्या पानिपतच्या युद्धानंतर मराठेशाहीवर मोठे संकट आले होते. अशा कठीण काळात महादजी शिंदे यांनी उज्जैन येथील भगवान कालभैरवांच्या चरणी आपली शिंदेशाही पगडी अर्पण करून मराठेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आशीर्वाद मागितला. युद्धात विजय मिळाल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी संकल्प केला.
भगवान कालभैरवांच्या कृपेने महादजी शिंदे यांनी उत्तर हिंदुस्थानातील अनेक मोहिमांमध्ये यश मिळवले. दिल्लीपासून आग्र्यापर्यंत मराठ्यांचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित झाला आणि पानिपतनंतर खचलेली मराठेशाही नव्या जोमाने उभी राहिली.
आपला संकल्प पूर्ण करत महादजी शिंदे यांनी भगवान कालभैरव मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून मराठा सरदारांची पगडी भगवान कालभैरवांच्या मस्तकी अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली..

No comments:

Post a Comment

देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

  देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय) 1795 च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाला मराठ्यांनी गु...