थोर सेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू अश्या दुर्दैवी पद्धतीने का झाला?
यास कारणीभूत आहेत खालील गोष्टी
संताजी घोरपडेंनी दूरचा विचार करून रसद आणायला निघालेल्या झुल्फिकारखानास जिंजीचा मार्ग मोकळा करून दिला व जिंजीचा वेढा उठवण्याचे वचन घेतले ज्याने छत्रपती राजाराम महाराज चिडले.
छत्रपतींंनी आपला राग व्यक्त केला तेव्हा संताजींनी त्यांना आमच्यामुळे आपण टिकून असल्यासारखे उद्दाम उत्तर दिले.
त्यावेळी राजाराम महाराज हे विशेष अनुभवी नव्हते व त्यांना एखादा उत्तम सल्लागार मिळणे गरजेचे होते कारण जोपर्यंत प्रल्हादपंत प्रतिनिधी जिवन्त होते तेच छत्रपतींंचे मार्गदर्शन करत ( १६९४ पर्यंत ) तोपर्यंत सर्व नीट सुरू होते.
प्रल्हादपंत प्रतिनिधींनंतर हा सर्व प्रकार घडल्याने छत्रपतींंना योग्य निर्णय घेणे कठीण झाल्याने त्यांनी संताजींना त्यांच्या उर्मटपणामुळे , व त्यांचे बंधू बहिर्जी उर्फ हिंदुराव घोरपडे नायक राजास मिळाल्यामुळे संताजीस सेनापती पदावरून पदच्युत करून त्यांचे प्रतिस्पर्धी धनाजी जाधवांना सेनापती केले ( अर्थात धनाजीही तेवढे सक्षम होते ).
छत्रपती दूर जिंजीस होते , त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी ही रामचंद्रपंत , शंकराजीपंत , परशुरामपंत , संताजी व धनाजींकडे होती व त्यात रामचंद्रपंत व परशुरामपंत यांचे विशेष जमत नव्हते ज्यात संताजींनी परशुरामपंतांची तर धनाजींनी रामचंद्रपंतांची बाजू उचलली.
धनाजी हे जिजाऊंच्या माहेरचे , रामचंद्रपंत पिढीजात निष्ठावंत म्हणून त्यांचा पगडा छत्रपतींवर भारी झाला व संताजींकडे छत्रपतींचे दुर्लक्ष झाले.
संताजी बंडखोर व दिद्रोही लोकांना हत्तीच्या पायी देत , त्यातच त्यांच्या हाती त्यांच्यावर चालून आलेल्या धनाजींंचा माणूस अमृतराव निंबाळकर सापडल्याने त्याची ही हीच गत झाली ( १६९६ ) ज्याने त्याचा मेहुणा नागोजी माने संताजीवर नाराज झाला.
यात संताजींंवर छत्रपतींनी धनाजींना पुन्हा चाल करून जाण्यास सांगितले व संताजी त्यात १६९७ मध्ये दहीगावास हरले.
यामुळे संताजी आता दोन्ही घरचे पाहुणे उपाशी झाल्यासारखे झाले ( २ घर मुघल व मराठे ).
तरीही शंकराजीपंतांच्या प्रयत्नांनी शेवटी दोन्ही पक्ष एकत्र आले पण तोपर्यंत उशीर झाला होता.
आता करखेलीत संताजी आपल्या छोट्या सैन्यासह असताना नागोजी मानेने अचानकच त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले ज्याने एका विराचा असा दुःखद अंत झाला

No comments:
Post a Comment