विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 6 August 2026

संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले असे म्हणणे कितपत योग्य आहे?

 


संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले असे म्हणणे कितपत योग्य आहे?

संभाजी महाराजांनी बलिदान दिले का नाही याची उहापोह करण्या आधी औरंगझेबाच्या कारकीर्द पहा. गैर मुस्लिमांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून त्यांनी काय काय केले ते.
१)आज तुम्ही जिथे पाय पडत ते काशीचे मंदिर नाही . मूळ मंदिर ला पाडून औरंगझेबाने मशीद बनवली आज सुद्धा जिथे आपण त्याच्या शेजारी हि ग्यानवापी मशीद आज हि दिमाखात उंभी आहे (हो हो आजसुद्धा .....)आपण पाय पडतो ते मंदिर मागाहून बांधले आहे.
२) मथुरा केशवदेव कृष्णा मंदिर सुद्धा औरंझेगझेब ने १६७० मध्ये पडले.नुसते मंदिर पडले नाही तर तिथे मशीद बनवली
३) जिझिया कर : अकबर ने रद्द केलेला हा जिझिया कर औरंगझेबाने १०० वर्षांनी पुन्हा चालू केला. जिझिया कर हा फक्त गैर मुस्लिम साठी असतो आणि त्याचा उपयोग फक्त हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारावा याच साठी होता.
४)काश्मिरी पंडित चे इस्लाम धर्मात होण्यास विरोध केला म्हणून औरंगझेबाने शिखांचे नववे गुरु गुरु तेघ बहादूर सिंग याना दिल्ली मध्ये १६७५ ला चौकात मुंडके उडवले . याच तेग बहादूर सिंग चे चिरंजीव गोविंदसिंग यांनी या इस्लामीकरणाला विरोध केला म्हणून त्याची एक पाच वर्षाचे आणि एक आठ वर्षाच्या मुलाला जिवंत जमिनीत पुरून मारले .
फेब्रुवारी १६८९ संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये पकडले गेले. त्यांना मुकर्रब खान आणि इखलास खान ने प्रचितगड मार्गे कराड ते बहादूर गड पर्यंत नेले. हि आनंदाची खबर औरंगझेब ला ब्रम्हपुरी ला मिळाली . तो बहादूरगड ला परत आला . तिथेच त्याची अन शंभू महाराजांची गाठ पडली .त्याने मूल्ह्यतः दोन प्रश्न विचारले कि (१)स्वराज्याचा खजिना कुठे ठेवलाय ? आणि (२)मुघल सैन्येतले गद्दार कोण आहे ? संभाजी महाराजांनी सांगण्यास नकार दिला .औरंगझेबाने धर्मबदलण्याचे आमिष दाखवले पण महाराज बधले नाहीत .दि. १२ फेब्रुवारी राजारामाचे मंचकारोहण होताच ता. १७ फेब्रुवारी रोजी औरंगजेबाने संभाजीचे डोळे काढले व दुसऱ्या दिवशी कलशाची जीभ तोडली. १७ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत औरंगने संभाजी - कलशसह त्यांच्या दहा - अकरा साथीदारांचा छळ करून ११ मार्च १६८९ रोजी त्यांना ठार केले. मग त्यांचे वाघ नखाने अंग सोलण्यात येते . त्यांचे हाथ कापण्यात येते . पाय कापण्यात येते . पण ते दयेची ची भिक मागत नाही .एवढे अत्याचार सहन करून ही संभाजी राजेदयेची ची भिक मागत नाही.आणि ते आपला देह सोडतात . ते शहीद होतात. आपल्या राष्ट्रसाठी ,आपल्या भूमीसाठी .
शंभू महाराजणांनी औरंगझेब च्या मुलगी चा हात मागितला हि दंत कथा असली पाहिजे. कारण मुघलांच्या मुलीचे लग्न लावत नाही याची शंभू महाराजांना कल्पना होती शिवाय त्यावेळी औरंगझेबाच्या धाकट्या मुलीचे वय त्या वेळी ४६ होते.
शंभू महाराजांना अश्या रीतीने हत्या करून औरंगझेबाने स्वतःची कबर इथेच खणून घेतली. या बलिदानाने मराठ्यांना संतापाचा भडका उठला आणि त्यांनी पुढील काळात म्हणजे १६८९ पासून १७०७ पर्यंत औरंगझेबाला त्याच्या पाच लाख सैन्य सहित झुंजावे लागले आणि इथेच त्याचे थडगे बनले.
तळटीप
1.मराठ्यांच्याया इतिहासाची साधने
2. संभाजी (बेंद्रे )

No comments:

Post a Comment

आंगरे घराण्याची वंशावळ

  आंगरे घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणे तुकोजी सेखोजी संकपाळ आणि त्यांच्या पत्नी अंबाबाई यांचे चिरंजीव कान्होजी जे पुढे सरखेल कान्होजी आंग्रे...