विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 February 2026

स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई

 


स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई

, भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई हि स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई असेल. स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई असेलच.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. व
जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.
तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.
विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
आदिलशहाने शहाजी राजांना कपटाने कैद करून शिवाजी राजांवर फतेहखानास पाठविले होते, बंगरुळास थोरले बंधू संभाजीराजांवर पण विजापुरी फौजा चालून गेल्या होत्या, राजकारणाचे धडे ज्यांच्या हाताखाली गिरवले होते ते दादोजी कोंडदेव मृत्यू पावले होते.
अशा या संकटकाळी मनाचे स्थैर्य ढळू न देता शिवाजी राजांनी खळद- बेलसर येथील फतेहखानाच्या छावणीवरच हल्ला करण्याचा बेत आखला.
या तुकडीचे नेतृत्व होते एका साठ वर्षाच्या तडफदार तरुणाकडे ते म्हणजे "बाजी पासलकर".
"फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता."
छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एकारात्रीत गड सर केला तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.
बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.
दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.
मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.
या लढाईत विजापुरी फौजेशी मावळ्यांनी कडवी झुंज दिली पण विजापुरी फौजेच्या रेट्यापुढे मावळ्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईत बाजी पासलकरांनी पराक्रमाची शर्थ करून रणदेवतेला आपल्या प्राणाची आहुती दिली.
बाजी पासलकरांचा देह पडताच मराठा स्वारांचा जमाव फुटला. मराठ्यांच्या निशाणाचे पथक मुख्य फौजेपासून अलग पडले. निशाणाच्या तुकडीस यवनांच्या सैन्याचा गराडा पडला, एक एक स्वार कापू जाऊ लागला. निशाणाची होऊ घातलेली दुर्दशा पाहून एक मराठा स्वार विजेच्या चपळाईने त्या गर्दीत आपली तलवार चालवत घुसला.
एकाच झटक्यात पाच सहा शत्रू कापत त्याने निशाणाचा स्वार मोकळा केला आणि आपल्या बरोबर चालविला, एवढ्यात निशाणाच्या स्वारावर शत्रूचा घाव बसून तो घोड्याखाली आला.
हे पाहताच त्या निशाणाच्या स्वारास आपल्या घोड्यावर बसवून निशाणाचा भाला आपल्या खांद्यावर टाकून तो शूर पुरंदरास सुखरूप परत आला. या लढवय्याचे नाव होते बाजी जेधे. हे बाजी जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र आणि बाजी पासलकर यांचा नातू (मुलीचा मुलगा). याच लढाईत आणखीन एका बाजीने पराक्रम गाजविला होता ते म्हणजे बाजी नाईक बांदल, बांदलांच्या जमावाने मोठा पराक्रम गाजवत विजापुरी सैन्याचा मुकाबला केला होता, या लढाईत बांदलांचे सुमारे अडीचशे लोक कामाला आले.
या तिनही वीरांचा यथोचित सत्कार शिवाजी राजांनी पुरंदरची लढाई संपल्यावर केला.
बाजी पासलकरांच्या धाकट्या बंधूंना मोसे खोऱ्याची देशमुखी देऊन “सवाई बाजी” हा किताब दिला.
बाजी जेधे यांना “सर्जेराव” हा किताब देऊन वस्त्रे आणि दोन तेज तुर्की घोडे बक्षीस दिले.
बाजी नाईक बांदल यांना शिवाजी राजांनी मौजे भाणसदरे व पऱ्हर खुर्द या गावचे महसूल इनाम म्हणून दिले.
स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या लढायांमध्ये खळद-बेलसरची लढाई हि एकमेव लढाई असेल ज्या लढाई मध्ये एक नाही, दोन नाही तर तीन तीन बाजींनी आपल्या प्राणांची “बाजी” लावून स्वराज्याठाई आपली निष्ठा दाखवून दिली होती.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
अशाप्रकारची माहितीप्रमाणे याबद्दल सांगता येईन.
🚩 हर हर महादेव 🚩
🚩🚩🚩जय भवानी, जय जिजाऊमाता , जय शिवाजी!!!🚩🚩🚩🚩🚩
वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏.

संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला

 




संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला

संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौलवी नि औरंग्याला कळवले की संभाजी महाराजांचे काही केले नाही तर आम्ही शुक्रवारचा नमाज बंद करू.
शिवाजी महाराजांनी दक्षिणे कडे जिंजी पर्यंत स्वराज्य भक्कम केले , राज्याभिषेक होऊन संभाजी महाराजांनी १५ दिवसात स्वराज्य ची उत्तरेची बाजू म्हणजे नाशिक बागलाण साल्हेर रामशेज अहिवंतगड त्र्यंबक हि बाजी भक्कम करायची ठरवली. आणि त्यांनी थेट बुऱ्हाणपूर या दख्खन चे द्वार असलेल्या श्रीमंत शहरावर हल्ला करून लुटायचे ठरवले . कदाचित औरंग्या आज किंवा उद्या स्वराज्यावर चालून येणार त्याची त्यांना कुणकुण लागली असावी. आग्रा आणि दिल्ली नंतर बुऱ्हाणपूर सगळ्यात मोठी होती. बाजारपेठ पण मोठी आणि लष्कराचे मोठे ठिकाण होते . त्यामुळे मुघलांच्या इथला सुभेदार हे बादशहाच्या जवळच्या नातलग असणे गरजेचे होते . खांजहाँ बहादूरखान कोकलताश हा औरंगझेबाचा दुध भाऊ होता आणि त्याची कडे जबाबदारी होती
या बहादूरखान कोकलताश च्या पुतण्याचे लग्न होते म्हणून तो औरंगाबाद ला निघून गेला होता .बुऱ्हाणपूर हुन निघताना आपल्या ८००० फौजे पैकी ३००० फौज घेऊन लग्नात मिरवायला निघून गेला . त्याच्या माघारी नायब काकारखान आता बुऱ्हाणपूरच मालक होता . काकारखान हा त्यावेळी हिंदूंची वाकडे घेयातल्यामुळे खूप कुप्रसिद्ध होता त्यामुळे त्यांनी २०० सशस्त्र रक्षकांचा स्वतःचा पहारा होता . बुऱ्हाणपूर मध्ये १७ पुरे होते (आहे) नावाबपुरा , करणपूर , शहाजहान पुरा आणि खुर्रमपूर असे बादशहाच्या नावावर अनेक पुरे आहे . सुरत अहमदाबाद सारखे अनेक श्रीमंत व्यापारी होते . मराठ्यांनी हल्ला करताना आपण आता सुरत वर चालून जाणार अशी आवई उठवली . मराठ्यांची हि तिसरी सुरतची लूट अशी अफवा मुघलांच्या पसरली .
त्यामुळे या काकारखान कडे मुघलांचे सुरतेहून दूत धावून आले आणि हि बातमी दिली . त्यामुळे काकारखं वैतागला .काकारखानाने १००० फौज ठेऊन राहिलेली ४००० फौज सुरत कडे पाठवून दिली .
४००० पथके निघून गेल्यावर ३१ जानेवारी ला १६८१ ला संध्याकाळी काही दुतानी खबर दिली कि मराठे बुऱ्हाणपूर जवळ दिसले आहे . नुकतीच दहा दिवसापूर्वी मी,अराठयांचा राजा संभाजी महाराजांनी राज्यभिषेक करून घेतला हि बातमी माहित होती तेंव्हा मराठ्यांचं कोणता सरदार येणार नाही असाच त्याला वाटले . मात्र व्यापारी गडबडून गेले . तो पर्यंत रात्री बातमी आली कि स्वतः सेनापती हंबिराव हंबीरराव आलेत . आधीच थंडीचे दिवस . आणखी जुने सैनिक आणि पहारेकरी व १०००० हजारांची फौज घेऊन काकरक्षण निघाला . पण समोर चित्र भयानक होते . स्वतः हंबिराव होते पण हंबीर राव आधी पुढे शम्भू महाराज आले आणि ५ दिवसात संभाजी महाराजांनी दौड करून हंबीर राव यांना मिळाले होते . आता काकारखं ला समोर छत्रपती संभाजी महाराज आणि हंबीरराव यांच्याबरोबर मराठा सैनिक घेऊन होते . स्वतः संभाजी महाराज बरोअबर असताना या मराठा सैन्याला खूप जोर होता . ते पाहून ककारखान आता सरकून दरवाजा बंद केला . पण तिथे महाद्वाराला युद्धाचे नाटक दुसऱ्या दरवाजाने आत शिरून बुऱ्हाणपूर लुटायला चालू केले .
दोन दिवस बुऱ्हाणपूर लुटल्यावर बहादुरशहा ला हि बातमी काळजी आणि तो औरंगाबाद वरून निघाला .शंभू महाराज आणि हंबीरराव परत रायगडाला निघाले . वाटेत बहादुरशहा आडवा येईल अशी शक्यता होती .. आणि बरोबर प्रचंड दौलत . हि लूट साल्हेर च्या किल्ल्यावर ठेवायचे ठरले . वाटेत जाताना चोपडा आणि धरणगाव ची वाट होती आणि तिथे बहादूरखान असणार हे राजांनी गृहीत धरले .
चोपडाच्या जंगलामध्ये बहादुरशहा दडून बसला होते . तिथे काही मराठ्यांची फळी चालली होती पण त्यांनी सांगितले कि आम्ही वकील आहोत .बहादुरशाहने संभाजी महाराजांच्या विषयी विचारले तेंव्हा अशी उत्तरे मिळाली कि तुम्ही याच भागात आहेत तर शंभू महाराज असे कसे येतील ?
बहादुर्शहाला पण हे पटले . बहादुरशहा ५००० ची फौज घेऊन तिथून निघून गेला आणि त्या जंगल लपून असलेली मराठ्यांची फौज खजिन्यासहित आरमत निघून गेली .
साल्हेरला येताना संभाजी महाराजांनी वाणी चे देवीचे दर्शन घेतले . अशी युक्तीने आणि कमी किंमतीने मराठ्यांनी मुघलांची प्रचंड दौलत लुटली .

छत्रपती संभाजी राजेंना पकडणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत

 




छत्रपती संभाजी राजेंना पकडणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत

"याद रखणा मुकर्रब खान ,आम्हाला हरवेल असं रणांगण नाही अन आम्हाला मारू शकेल असं मरण नाही. ठरवलं तर आम्ही या साखळदंडानी देखील लढू ,पण लढू."
हे वाक्य मुकर्रबखानाला बोलणाऱ्या संभाजी महाराजांचा शब्द ठेवला संताजी घोरपडे यांनी.ज्या संगमेश्वर वरून मुकर्रब खानने संभाजी महाराजांना पकडले त्या मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा इखलियस खानाला संगमेश्वर पासून 70 किलोमीटर वर पन्हाळ्याजवळ मारले.
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर येसूबाई यांनी असीम बलिदान करत राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले. छत्रपती राजाराम महाराज रायगडवरुन प्रतापगड, पन्हाळ्या मार्गे जिंजीला निघून गेले. येसूबाई आणि इतर लोक रायगडासहित मुघलांच्या ताब्यात गेले.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मोगलांच्या गोंधळलेल्या अवस्थेचा फायदा मराठ्यांनी घेतला.
औरंगझेबचे सर्व सरदार आणि सेना नायक गोंधळून गेले. संभाजी महाराज नंतर पूर्ण भारत आपल्या ताब्यात आला असं समजलेल्या लोकांना हा मोठा धक्का होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पकडणाच्या अगोदर स्वराज्य फक्त कोकणात शिल्लक होते. बाकीचे घाटावरच्या किल्ले आणि ठाणे मुघलांनी बेजार केलेले.
पण या एकाच चालीत मराठ्यांचे स्वतंत्र संग्राम नाशिक पासून जिंजी म्हणजे तामिळनाडू पर्यंत वाढलेले. मराठ्यांच्या फौजा चपळ तर मुघलांच्या फौजांची गती हळू. याचा फायदा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण, रुपाजी भोसले ,नेमाजी शिंदे यांनी घेतला. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, या सारखे सदरावरील अधिकारीसुद्धा आता रणांगणात उतरले.
प्रथम पाटणपर्यंतचा भाग काबिज केला, मराठे कोल्हापुर भागात पसरलेले असताना शेख निजाम अर्थात मुक़र्रबखान मराठ्यांवर चालून आला. यावेळी सेनापती संताजी घोरपडे हे पन्हाळगडावर होते ही बातमी कळताच सेनापती संताजी घोरपडे यांनी ऑक्टो-नोव्हें १६८९ मध्ये पन्हाळगड सोडला आणि कोल्हापुर भागावर चालून आलेल्या मोगल सैन्यावर हल्ला चढवला.
मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक उडाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्यानी कमी पडले. मोगल रणांगण सोडून वाट दिसेल तिकडे पळू लागले. मुकर्रबखानाला तलवार आणि भाल्याच्या जखमा झाल्या पण त्याचे नशीब तो सेनापती संताजी घोरपडे यांच्या तावडीतून कसाबसा वाचला. पुढे या मुकर्रबखानचे नाव कुठेही आढळत नाही यामध्येच लढाईत झालेल्या जखमेने त्याचा मृत्यू देखील झाला असण्याची शक्यता आहे. मुकर्रबखानचा मुलगा इखलीयास खान उर्फ खानेआलम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता. या लढाईत मराठ्यांचे ७०० तर मोगलांचे ४०० जण कामी आले पण मराठ्यांनी मोगलांचा दारूण पराभव केला.पण या खाफी खानने लिहलेले वृत्त्तात मुकर्रखान खान आणि त्याचा मुलगा पळून गेल्याचा लिहितो. पण त्यानंतर कोणत्याही कागदपत्रात या बाप बेट्यांचा उल्लेख नाही.
आकण्ण आणि मकान्न हे कुतुबशाही चे दोन मोठे वजीर. अबुहसंन कुतुब शहा याच्या मतने चालायचा. याचा राग मुकर्रबखाना ला होता. त्यांचा कट्टर विरोधक होता. औरंगझेब ने 1686 ला गोवळकोंडया ला वेढा घातला त्यावेळी हाच मुकर्रबखान उर्फ शेख निझाम औरंगझेब ला मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यावर याचा सत्कार औरंगझेब नेंकेला होता. असा मोठा सरदार अचानकपणे याच लढाई नंतर मुघलांच्या किंवा समकालीन कागदपत्रांतून गायब झाला त्यामुळे अनेक मराठी इतिहासकार च्या मते याच लढाईत या बाप बेट्याना संताजी घोरपडे ने मारले असावे.
संदर्भ -
१) महेश तेंडुलकर, रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे
२) शिवकाल ( १६३० ते १७०७ ), डॉ वि.गो.खोबरेकर

*बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररी पँरिस, फ्रान्स मध्ये संग्रहीत केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रं*

 





*बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररी पँरिस, फ्रान्स मध्ये संग्रहीत केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रं*

इटालियन प्रवासी निकोलाओ मानुची याने तयार करवून घेतलेल्या चित्रांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक चित्र आहे. मानुचीचा हा अल्बम पँरिस मधील बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररीच्या संग्रहात आहे.
अलीकडे काही लोक मीर मुहम्मदाने काढलेल्या या चित्रात दिसणाऱ्या दाढीवाल्या सैनिकांवरुन शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान होते अशी तथ्यहीन विधानं करत असतात.
यासंदर्भात १९७६ साली प्रकाशित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथामध्ये थोर इतिहास संशोधक श्री ग.ह.खरे यांनी लिहिलेला "शिवाजी महाराजांची चित्रे" हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दिसणाऱ्या दाढीवाल्या शिपायांबद्दल श्री खरे यांचा अभिप्राय पुढील प्रमाणे आहे.
"या शिपायांपैकी आठ जणांना दाढी आहे. तरीही त्यातील निदान पाच जणांच्या कानांत एकेक मोती घातलेली बाळी आहे. शिवाय अनेक जणांच्या कपाळास गंधाचे वाटोळे टिळे असून काहींच्या कपाळावर उभी आडवी गंधे असल्याचाही भास होतो. यामुळे बहुतेक शिपाई हिंदू , पण थोडेसे मुसलमानही आहेत असे वाटते."
श्री ग.ह.खरे यांनी त्या काळी हे चित्रं भिंगाच्या साह्याने काळजीपूर्वक पाहून ही निरिक्षणे नोंदवली आहेत.
आता अधुनिक काळात हे चित्र ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे आणि झूम करुन पाहता येत असल्यामुळे श्री खरे यांनी त्या काळात नोंदवलेले , "काहींच्या कपाळावर उभी आडवी गंधे असल्याचाही भास होतो." हे विधान किती अचूक होते हे वाचकांना तपासून पाहता येईल, कारण आताच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने झूम करून पाहिले असता ती उभीआडवी गंधच आहेत हे स्पष्टपणे दिसून येते !
शिवाय मी हे संपूर्ण चित्र झूम करून पाहिले असता एकूण एक शिपायांच्या कानात बाळ्या आणि बहुतांश शिपायांच्या कपाळावर गंध रेखाटलेले आहे असे मला आढळले.
मुसलमान लोकांमध्ये कान टोचत नाहीत त्यामुळे त्यांना 'अविंध' असे म्हणतात.
बिब्लिओथेक नँशनाल लायब्ररी पँरिस, फ्रान्स येथे संग्रहीत चित्र

पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध

 




पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध

18 वं शतक. छ. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं साताऱ्यात तर कोल्हापूरमध्ये ताराराणी यांचं राज्य होतं. याच शतकात पेशव्यांचा उदय, पानिपतचं युद्ध, निजामाविरुद्ध लढाया, दिल्ली, अटकेपर्यंत स्वाऱ्या झाल्या.
बहुतांश कामकाजासाठी पुण्याला महत्त्व येत गेलं आणि एखाद्या राजधानीसारखं महत्त्व या शहराला प्राप्त झालं. वेगवेगळ्या लोकांचा, विविध जाती-धर्मातील लोकांचा या काळात पुण्यात वावर आणि वस्ती वाढली. व्यापारी आले लोकसंख्याही वाढली.
पण पुण्याच्या पेशव्यांचा आणि पोर्तुगीज धर्मगुरूंचा संबंध कसा आला याची कहाणी एकदम रंजक आहे. तसं पाहायला गेलं तर पेशव्यांचा सर्व धर्मिय लोकांचा आणि त्या धर्मातील देवस्थानांचा संबंध आलेला दिसून येतो.
सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये पोर्तुगीजांनी भारतात कोचीनमध्ये आपले पाय घट्ट रोवले, मग त्या पाठोपाठ ते गोव्यात आले. त्याच्यानंतर वसई, दमण, मुंबई असे एकेक भाग त्यांनी आधी व्यापार म्हणून मग नंतर प्रशासन म्हणून काबिज केले.
सोळाव्या शतकातच वसईमध्ये, गोव्यात धर्मांतर होण्यास सुरुवात झाली होती. व्यापारासाठी पोर्तुगीजांनी वेगवेगळ्या राजवटी, संस्थानं आणि शहरांशी संपर्क ठेवला होता. त्यामुळे या शहरांशी त्यांचा संपर्क येईच आणि पाठोपाठ ख्रिश्चन धर्मही तेथे जाई.
पुणे शहरात सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, पंचहौद चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट इग्नेशिय चर्चसारखी जुनी चर्च आहेत.
पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध आलेला दिसून येतो. सैनिकी, व्यापारी आणि इतर राजकीय संबंध दोघांत असल्याचे दिसते. एकमेकांचे वकील परस्परांकडे जाणं, पत्रव्यवहार तसेच एकमेकांसदर्भातील घडामोडींवर दोघांचीही बारीक नजर असल्याचं दिसतं.
पेशवाईतील महत्त्वाचा आणि मोठा काळ नाना फडणवीसांद्वारे कारभार चालवला गेला. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांच्याशी असलेल्या संबंधांत त्यांचा मोठा वाटा होता.
डॉम मिंगेल दी नोरोन्हा हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते. गोवा आणि पोर्तुगीज प्रांतातील सैनिक या सैन्यात होते असं सांगितलं जातं.
या ख्रिस्ती सैनिकांच्या धार्मिक गरजांसाठी फादर विन्सेंट जोआकिम मेनेझिस यांची नेमणूक करण्यात आली होती.
नोरोन्हा यांनी आपल्या ख्रिस्तीबांधवांना धार्मिक कार्यासाठी आणि प्रार्थनेसाठी चर्चची गरज असल्याची मागणी केली. त्यानुसार तेव्हा कारभार सांभाळणाऱ्या सवाई माधवरावांनी नाना पेठेतील एक भूखंड या चर्चसाठी दिला.
हे चर्च नाना पेठेत आहे. ही पेठ नाना फडणवीसांनी विकसित केली होती. तिचं मूळ नाव हनुमंत पेठ असं होतं.
'पेशवेकालीन पुणे' या पुस्तकाचे लेखक अ. रा कुलकर्णी लिहितात, ‘1789 च्या सुमारास फिरंगोजी खाडे याच्याकडे या पेठेचे शेटेपण होते. या पेठेत प्रामुख्याने ठोक व्यापाऱ्यांची घरं होती, कंपनी सरकारच्या सुरुवातीच्या काळात या पेठेची वस्ती काहीशी घटली. 1819 साली या पेठेत 2742 लोक राहात होते, पण पुढच्याच वर्षी 1820मध्ये ही संख्या हजाराने कमी झाली.
कुणबी, ब्राह्मण आणि चांभार समाज यांची वस्ती येथे अधिक होती. या पेठेतील देवळांची संख्या 11 होती. मुसलमानांची घोडेपीर नावाची मशीद नथुखान या नाना फडणिसाच्या विश्वासू सेवकाने बांधली होती. नानाच्या स्मरणार्थ या पेठेतून एक ताबूतही निघत असे.’

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...