विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 May 2019

हंरिपंत फडके- भाग 4


हंरिपंत फडके-
भाग 4
सन १७९१ च्या आरंभास हरीपंत फडक्याची टिपूवरील दुसऱ्या मोहिमेंत पुण्याहून रवानगी करण्यांत आली. १७९२ सालच्या फेब्रुवारीअखेर टिपूशीं तह झाल्यावर मार्च महिन्याच्या शेवटीं दोस्तांची लष्करें आपापल्या मुलुखांत जावयास निघालीं तेव्हां हरीपतंहि आपल्या फौजेसह महाराष्ट्रात यावयास निघाला व मे महिन्याच्या २५ व्या तारखेस पुण्यास येऊन दाखल झाला. या मोहिमेंतील
१७९३ सालीं महादजीनें नानाच्या कारभारांत केलेल्या ढवळाढवळीमुळें त्या दोघांमध्यें उपस्थित झालेला कलह हरीपंत फडक्यानें मध्यस्थी करून महाप्रयासानें शांत केला. हरीपंत १७९४ त वारला. हरीपंताचा मुलगा बाबा फडके हा खडर्याच्या लढाईंत जरिपटक्याचा अधिकारी होता. याची मुलगी बाजीरावाला दिली होती. हा नानाफडणवीसाच्या बाजूचा असल्यानें बाजीरावानें याचा फार छळ केला. दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धांत हा भोंसल्यांनां मदत करीत होता. पुढें इंग्रजांच्या सांगण्यावरून बाजीरावानें त्याला वसईच्या किल्ल्यात अटकेंत ठेविलें होतें. तेथेंच तो मरण पावला याचे वंशज पुण्यास आहेत.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...