मराठे पानिपतचे युद्ध हरण्यामागे काय कारणे होती?-----------------1
'लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेल्या याची गणना नाही..…'
विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला गेल्याचं हे वर्णन आहे.
मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं.
पानिपतची
तिसरी लढाई जानेवारी १४, १७६१ रोजी अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि
महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. या युद्धात मराठा सैन्य शौर्यानं लढलं, पण
अखेर त्यांची पीछेहाट झाली, त्यांच्या घोडदौडीला खीळ बसली. पण यातही
मराठ्यांचा विजय होता. अब्दालीचं कंबरडं मोडायचं काम या मराठ्यांनी या
युद्धात केलं होतं.
युद्धाची पार्श्वभूमी :
मुघलांच्या
उतरत्या काळात मराठे अगदी जोशाने नवीन महासत्ता म्हणून उदयास आले होते.
१७१२-१७५७ या काळात मराठ्यांनी भारतातील एक महत्त्वपूर्ण भाग नियंत्रित
केला होता. १७५८ मध्ये त्यांनी दिल्लीच्या आसपासचा काही भाग काबीज केला
होता, पेशावरच्या अटकपर्यंत झेंडा रोवला, लाहोरवर हल्ला करून शहर ताब्यात
घेतले आणि शहराचा कारभार पाहणाऱ्या तैमूर शाह दुर्रानी याला हाकलून लावले.
तैमूर शाह दुर्रानी अफगान शासक अहमद शाह अब्दालीचा मुलगा होता.
मुस्लिम
धर्मगुरूंनी मराठ्यांना इस्लामवरील संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर
देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने
भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले.
अब्दालीने याचा विडा उचलला, त्याने १७५९ मध्ये बलुच, नजीब खानच्या
नेतृत्वातील पश्तुन रोहिल्ले व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील
छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड
वैर पत्करले.
अब्दालीने
दिल्लीवर स्वारी करण्याची योजना आखली, छोट्या मोठ्या हल्ल्यांच्या
माध्यमातून अब्दालीने उत्तरेतील मराठयांचे वर्चस्व मोडकळीस आणले होते,
यातीलच एका लढाईत मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची हत्या
करण्यात आली.
- मृत्यूच्या दाढेत असताना "बचेंगे.....तो और भी लडेंगे" असे म्हणून नजीब खानाला डिवचणाऱ्या दत्ताजी शिंदेंची क्रूर हत्या एक महत्वाची घटना ठरली
मराठ्यांना
याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणेही गरजेचे होते.
अन्यथा उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती.
म्हणून मराठ्यांनी पण ५०-६० हजारांची मोठी फौज उभारली व १७६० च्या
जानेवारी- फेब्रुवारी मध्ये पानिपतकडे रवाना झाले. फौजेसोबत अनेक
बाजारबुणगे देखील गेले होते. सगळ्यांचा मिळून आकडा लाख सव्वा लाखाच्या
आसपास होता.
सदाशिवराव
भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. भरतपुरचे जाट, होळकर,
शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या. या सैन्याने
दिल्ली काबीज केली.
यादरम्यान
अब्दाली व मराठे यांच्यात नियमितपणे चकमकी चालू झाल्या. भले मोठे सैन्य
आणि त्यांच्या सोबतच्या बुणग्यांमुळे रसद संपत आली होती. सदाशिवरावांनी
दिल्ली लुटायचा आदेश दिला. रसदेसाठी दिल्ली लुटायच्या बहाण्याने सदाशिवराव
विश्वासरावांना दिल्लीच्या तख्तावर बसवणार अशी भनक जाट महाराजा सुरजमलला
लागली म्हणून त्याने सदाशिवरावांना विरोध केला व तो युतीच्या बाहेर पडला.
ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्याच इतिहासकारांचे मत आहे.
No comments:
Post a Comment