मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 3
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
शाहू महाराजांचे कारकीर्दीतील अव्वल राजकारणप्रसंगांत वेळोवेळी दृष्टीस पडते. त्यावरून हा महाराष्ट्रवीर समरभूमीवर बरीच वर्षे चमकत असावा असे वाटते. थोरले राजाराम महाराज ह्यांचे कारकीर्दीत जे लोकोत्तर स्वदेशभक्त निर्माण झाले, व ज्यांनी जीवादारभ्य श्रमसाहस करून स्वराज्य रक्षण केले, त्या परम वंदनीय वीरमंडलामध्ये नरसोजी व जिवाजी पाटील शिंदे तोरगलकर पागनीस ह्या दोघांची नावें अंतभूत आहेत. ह्यावरून शिंदे घराणे हे पूर्वीपासून विख्यात आहे, असे ह्मणण्यास हरकत नाहीं । शिंदे घराण्याच्या थोरपणाबद्दल आणखी एक दाखला सांपडतो. औरंगजेब बादशाहाने, आपल्या पदरचे सरदार कण्हेरखेडेकर शिंदे ह्यांच्या कन्येशी शाहू महाराजांचे लग्न इ. स. १७०६ साली लावून दिले, ही गोष्ट इतिहासांत प्रसिद्धच आहे. ह्या मुलीचे नांव सावित्रीबाई असे होते. ही इ. स. १७१० मध्ये वारली. अर्थात् छत्रपति शाहू महाराज ह्यांच्या क्षत्रियकुलावतंस व सर्वश्रेष्ठ महाराष्ट्रकुलाशीं ज्या घराण्याचा शरीरसंबंध जडला होता, ते घराणे हीन ज्ञातीचे असेल हे संभवनीय दिसत नाहीं. क्याप्टन क्ल्यून्स ह्यांचेही असेच मत आहे. | प्रकृत चरित्रनायिका श्रीमती महाराणी बायजाबाईसाहेब ज्या शिंदे घराण्यांत प्रसिद्ध झाल्या, त्या घराण्याचा मूळ पुरुष राणोजी शिंदे हा होय. ह्याची माहिती देतांना, मध्य हिंदुस्थानचे इतिहासकार सर जॉन मालकम ह्यांनी असे लिहिले आहे कीं, शिंदे ह्यांचे घराणे मूळचे शुद्र जातीचे असून त्यांचा मूळ पुरुष राणोजी हा होय. हा मूळचा कण्हेरखेडचा पाटील होता. तो प्रथमतः बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्यांच्या पदरीं नौकरीस राहिला. त्या वेळी त्याजकडे खिजमतगाराचे ह्मणजे हजयाचे काम होते. पुढे तो बाजीराव बल्लाळ पेशवे ह्यांचे कार ईकीर्दीत हुजन्याच्या जागेवरून पागेचा शिलेदार बनला. ह्या संबंधाने अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, बाजीराव साहेब एके वेळीं शाहू महाराजांस भेटण्याकरिता राजवाड्यांत गेले. त्या वेळी त्यांचा हुजच्या राणोजी हा, नेहमीप्रमाणे त्यांच्या चर्मपादुको हातीं घेऊन, दाराशीं बसला. तितक्यांत त्यांस आकस्मिक निद्रा लागली. बाजीराव साहेब छत्रपतींची भेट घेऊन दाराबाहेर आले; तों, त्यांचा स्वामिनिष्ठ सेवक त्यांच्या चर्मपादुका उराशीं घट्ट धरून बसलेला त्यांच्या नजरेस पडला. अर्थात् हुजन्याची स्वामिभक्ति पाहून त्यांस आश्चर्य वाटलें व फार संतोष झाला. नंतर त्यांनी लवकरच त्यास आपल्या पागेमध्ये शिलेदाराची जागा दिली. येणेप्रमाणे राणोजीचा भाग्योदय झाला. ही मालकम साहेबांनी दिलेली आख्यायिका खरी आहे. ह्यावद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट क्याप्टन स्टुअर्ट यांनी चौकशी-अंतीं खात्री करून घेतलेली आहे. ह्या आख्यायिकेच्या पुष्टिकरणार्थ त्यांनी आणखी असे लिहिले आहे कीं, राणोजीने ह्या पेशव्यांच्या जुन्या चर्मपादुका आपल्या भाग्योदयाचे मूळकारण आहेत असे समजून, त्या नीट जतन करून ठेवल्या होत्या; व त्याविषयीं तो फार पूज्यभाव बाळगीत असे. राणोजीची ही स्वामिनिष्ठा पाहून कोणाचे हृदय आनंदाने उचंबळणार नाहीं बरं ? असो. राणोजीच्या उदयासंबंधाने सर जॉन मालकम् ह्यांनी जी दंतकथा • दिली आहे, तिच्यावरून राणोजी प्रथमतः हलक्या दर्जाचा नोकर होता असे दिसून येते. तथापि त्यामुळे शिंद्यांचे घराणे कमी योग्यतेचे होते, असे मात्र मानितां येत नाहीं. राणोजीचा चरित्रवृत्तांत फार मनोरंजक व वीररसपरिप्लुत असा आहे. तो समग्र दाखल करण्याचे हे स्थळ नाहीं. तथापि त्याच्या व त्याच्या वंशजांच्या कारकीर्दीचे अत्यल्प सिंहावलोकन ह्या भागांत सादर करणे अवश्य आहे

No comments:
Post a Comment