विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 18 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 4

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 4
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
अठराव्या शतकाच्या प्रारंभीं, मराठी राज्याच्या अभ्युदयार्थ जे पराक्रमपटु व शौर्यशाली वीरपुरुष अवतीर्ण झाले, त्यांमध्ये राणोजी शिंदे व मल्हारजी होळकर हे दोघे प्रमुख होत. इ. स. १७२५ सालापासून ह्या उभय वीरांच्या मर्दुमकीस प्रारंभ झाला, व छत्रपति शाहू महाराज व पेशवे ह्यांच्याकडून त्यांच्या रणशौर्याचे अभिनंदन होऊन, त्यांस जहागिरी व सरंजाम बक्षीस मिळू लागले. राणोजी शिंदे ह्यास छ ५ मोहरम सीत अशरीन ह्या तारखेस सरदारी व पालखीचा सरंजाम मिळाला, व तेव्हांपासून त्याचा उत्कर्ष होत चालला. ह्याने बाजीराव पेशवे ह्यांच्या निरनिराळ्या मोहिमांमध्ये पराक्रमाचीं अलौकिक कामे करून मराठी राज्यास उत्कृष्ट मदत केली; व दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकवून, पुष्कळ प्रांत व चौथ सरदेश"}, मुखींचे हक्क मराठ्यांस प्राप्त करून दिले. दिल्लीकडील इ. स. १७३६ सालच्या स्वारीमध्ये राणोजीने ८००० मुसलमान स्वारांशीं टक्कर देऊन व त्यांची वाताहत करून जो विजय मिळविला, तो फार प्रशंसनीय होता. ह्याने निजामावरील मोहिमांमध्यें व वसईच्या स्वारीच्या वेळी आपलें शौर्यतेज चांगलें प्रकाशित केले. हा रणशूर सरदार इ. स. १७४७ चे सुमारास सुजालपूर येथे मृत्यु पावला. मरणसमयीं ह्याजकडे एकंदर ६५ लक्षांचा प्रांत होता. जो पुरुष प्रारंभीं एक लहानसा हुजच्या होता, तो पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने व मर्दुमकीने इतका ऐश्वर्यसंपन्न बनला; हे लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे स्वतःच्या कर्तृत्वाने मनुष्यास आपला कसा अभ्युदय करून घेता येतो, हे चांगले शिकण्यासारखे आहे. असो. राणोजीची छत्री उत्तर हिंदुस्थानांत सुजालपूर ह्या गांवीं असून तेथे राणेगंज ह्या नांवाची पेठ वसली आहे. सुजालपूर हा गांव पेशव्यांकडून छ १ रजब समान आबैन ह्या तारखेस राणोजीच्या छत्री १ ता० २९ जून इ. स. १७४७ रोज सोमवार. करितां इनाम देण्यात आला असून, अद्यापि तो छत्रीच्या उत्सवाकडे चालत आहे. राणोजीस मैनाबाई नामक लग्नाच्या बायकोपासून जयाजी ऊर्फ जयाप्पा, दत्ताजी, व जोतिबा ऊर्फ जोत्याजी असे तीन पुत्र, व चिमाबाई नामक राखेपासून महादजी व तुकोजी असे दोन पुत्र, मिळून एकंदर पांच पुत्र होते. हे एकापेक्षा एक पराक्रमी व कर्तृत्ववान् निपजून, त्यांनी आपल्या देशभूमीची अप्रतिम सेवा बजाविली; व इतिहासांत आपली कीर्ति अजरामर करून ठेविली.Image may contain: 1 person, close-upImage may contain: 1 person

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....