मराठे पानिपतचे युद्ध हरण्यामागे काय कारणे होती?-------------------------------4
४. अन्नधान्याचा तुटवडा :अब्दालीने यमुनेच्या किनारी मराठ्यांची कोंडी केली होती आणि रसद पुरवठ्यात खोडा घातला होता. जेव्हा अन्नधान्य संपुष्टात आले तेव्हा मराठ्यांनी विचार केला की उपासमारीने मारण्यापेक्षा युद्धात मरणे चांगले आहे. प्रत्यक्ष कृतीदिनी अनेक मराठे उपाशीपोटीच लढले.५. युद्धनीतीतील दुमत :होळकर आणि शिंदे गनिमी काव्याने युद्ध करण्याच्या बाजूने होते, पण आसपासचा मैदानी, सपाट मुलूख लक्षात घेता इथे मराठ्यांचा गनिमी कावा चालणार नाही, हे ओळखून इब्राहिम खान आणि सदाभाऊ यांनी तोफखाना पुढे ठेवून त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत शत्रूवर हल्ला करायचा अशी योजना आखली. पण अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती. प्रत्यक्ष मैदानात मराठ्यांच्या काही तुकड्या गोल मोडून रोहिल्यांच्या दिशेने धावल्या. तोफखान्यासमोर आपलंच सैन्य आलेलं बघून इब्राहिमखानाला तोफखान्याचा मारा बंद करावा लागला. याचा फायदा अब्दालीने घेतला आणि उंटांवरच्या आपल्या हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं.६. प्रत्यक्ष युद्धभूमीतील चुका :हत्तीवर बसलेल्या विश्वासरावांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले, हे पाहून सदाशिवराव भाऊ अंबारीतून उतरले आणि त्यांनी घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि सैन्याने कच खाल्ली.युद्ध चालू असताना होळकरांनी काढता पाय घेतला, तसेच राखीव दलाचे नियोजन करणे सेनापतींना जमले नाही. अब्दालीने मात्र दहा हजारांचं राखीव दल ठेवलं होतं. मराठ्यांचं पारडं जड झाल्यावर त्याने अचानक हे दहा हजार सैनिक रणात उतरवले. दमलेल्या मराठ्यांना या ताज्या दमाच्या सैनिकांचा मुकाबला करणं कठीण गेलं.
पानिपतच्या
युद्धानंतर मराठ्यांचा उत्तरेकडचा दबदबा अचानक नाहीसा झाला. पण एखाद्या
विजयालाही लाजवेल असं तुफान शौर्य यौवनातल्या रणबहाद्दर मराठ्यांनी दाखवलं.
त्या वीरांच्या स्मृती निमित्त १४ जानेवारी हा शौर्य दिवस म्हणून साजरा
केला जातो.
छायाचित्र : Pinterest - India
रणांगणावर देह वाहिला भारत भू तुजसाठी ! रक्षावया तुज कधी न हटलो, ही मराठ्यांची ख्याती !!
धन्यवाद.. !!
संदर्भ :
पानिपत - विश्वास पाटील
No comments:
Post a Comment