विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 18 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 6


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 6
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे ह्यांच्या सोनपतपानपतच्या मोहिमेमधील शौर्यकथा श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामींचे सेवेसी:- | विनंति सेवक जनकोजी शिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान तागायत छ २ मोहरम मु।। नागोर स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष:-आज्ञापत्र पाठविलें तें पावले. तेथे आज्ञा, जयाजी शिंदे...... निधन पावले, हे वृत्त ऐकून अंत:करण परम विक्षेपाते पावले. दुःखाचा कल्पांत झाला. विवेकेंकरून झाल्या श्रमाचे परिमार्जन करणे. ईश्वरतंत्रास उपाय नाही. या गोष्टीचा खेद करीन म्हटल्यास साध्य नाहीं. तरी तुह्मीं सर्वांचे समाधान करून, बहुत सावधपणे राहून, राजश्री दत्तवाचे आज्ञेत राहत जाणे. तुह्मी आह्मांस लेकाप्रमाणे आहांत. सर्वही कुशल ईश्वर करील” ह्मणोन आज्ञा. ऐसियास तीर्थरूप कैलासवासी जाले, या दुःखास पारच नाही. परंतु शत्रु संनिध असतां दुःखार्णवीं पडलिया परिणाम नाहीं. स्वामीसेवेसी अंतर पडते. याजकरितां आज्ञेप्रमाणे दुःखपरिहार करून स्वामीसेवेसी तत्पर असो. आमचे छत्र तरी स्वामीच आहेत. स्वामींची आज्ञा व तीर्थरूप राजश्री पाटीलबावांची आज्ञा वितरिक्त वावगी वर्तणूक होणेच नाहीं. तीर्थरूप कैलासवासींचे हातून सेवा वेतली, त्याप्रमाणे अभिमान पुरस्सर आह्मां लेकरांपासून सेवा घेऊन अधिकोत्तर ऊर्जित करणार स्वामी समर्थ आहेत. आह्मी स्वामींचे आज्ञाधारक सेवक आहोत. आज्ञेप्रमाणे सेवा करावी हेच उचित आहे. कैलासवासी तीर्थरूपांचा संकल्प सिद्धीस पाववणार व शत्रूचें यथास्थित पारपत्य करणार स्वामी थणी समर्थ आहेत. येथील वृत्त आलाहिदा पुरवणीपत्र लिहिले आहे. त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. केवळ अपूर्व आहेत. त्या वेळी प्रत्यक्ष वीररसाने त्यांच्या अंगीं मूर्तिमंत । संचार केला होता की काय, असा भास होतो.
दत्ताजी शिंदे रणांत घायाळ होऊन पडले, त्या वेळीं रोहिल्यांचा सरदार कुतुबशाह ह्याने दुष्टबुद्धीने त्यांस विचारिलें कीं, “पटेल, हमारे साथ तुम् और लड़ेंगे ??? त्या वेळी ह्या मर्द पुरुषाने उत्तर दिलें कीं 4 निशा अकताल्ला ! बचेंगे तो और बी लढेंगे. अर्थात् अशा महारथी योद्ध्याचा रणोत्साह पाहून प्रत्यक्ष रणदेवतेस देखील कौतुक वाटेल, मग इतरांची . ती गोष्ट काय ? दत्ताजी शिंदे यांचा कुतुबशाहाने शिरच्छेद करून त्यांचे शीर अहमदशाह आबदल्लीकडे नजर पाठविले. ते शीर परत मिळविण्यास मराठ्यांस, अयोध्येचा नबाब सुजाउद्दौला ह्यास मध्यस्ती घालावे लागले; व त्याकरितां तीन लक्ष रुपये बादशाहास खंडणी/?? द्यावी लागली!! नुसत्या गतासु कलेवराच्या शिरास जर तीन लक्ष. रुपये किंमत द्यावी लागली, तर प्रत्यक्ष त्या वीराची किंमत काय असेल ? अर्थात् असा अमूल्य मोहरा हरपल्यामुळे महाराष्ट्राचे अत्यंत नुकसान झाले ह्यांत शंका नाहीं.
| दत्ताजी शिंदे ह्यांचा अंत झाल्यानंतर मराठ्यांचे व गिलच्यांचे शेवटचे तुमुल युद्ध झाले. त्यांत जनकोजी शिंदे ह्यांनी भारतीय युद्धांतील धृष्टद्युम्नाप्रमाणे पराक्रम गाजविला. त्यांस तोफेचा गोळा व भाल्याची जखम लागून ते रणांगणीं पडले; व शत्रून त्यांचा विद्ध देह पाडाव केला. त्यांस जिवंत सोडविण्याकरितां सुजाउद्दौल्याचा वकील पंडित काशीराज ह्याने फार खटपट केली. परंतु ती निष्फल होऊन अखेर त्यांचा पाषाणहृदयी व कपटपटु नजीबखान रोहिल्याने निर्दयपणाने वध केला. ह्याप्रमाणे राणोजी शिंद्याचे वीरपुत्र एकामागून एक धारातीर्थी पतन पावले. राणोजीस जयाजी व दत्ताजी ह्यांशिवाय जोतिबा ह्या नांवाचा तिसरा पुत्र होता. तोही बुंदेलखंडांतील वोढसेप्रांतीं बैरवासागर गांवीं स्वामिकार्यावर लढत असतां मृत्यु पावला. ह्याप्रमाणे राणोजीच्या औरस संततीपैकीं तिन्हीं पुत्रांचा निकाल लागला. त्याशिवाय त्यास तुकोजी व महादजी असे दोन राखेच्या पोटचे पुत्र होते. ते दोन्ही | पानिपतच्या युद्धामध्ये हजर होते. त्यांपैकीं तुकोजी त्याच युद्धांत मृत्यु ) पावला. बाकी फक्त महादजी राहिला. तो मोठ्या शर्थीने जीव बचावून परत आला. त्याने पुढे आपल्या तरवारबहादुरीने पानिपतच्या युद्धांत गत झालेली मराठ्यांची अब्रू परत मिळविली; व आपल्या शौर्याचा कीर्तिध्वज सर्व हिंदुस्थानभर फडकत ठेविला. |

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...