विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 18 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 5


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 5
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।


राणोजी मृत्यु पावल्यानंतर त्याची जहागीर व सरदारीची वस्त्र जयाजीस मिळाली. हा जयाजी मराठ्यांच्या इतिहासांत जयाप्पा ह्या नांवाने फार प्रसिद्ध आहे. ह्याने आपल्या वडिलांप्रमाणे शौर्याची अनेक कामे करून, मराठ्यांची सत्ता उत्तरेकडे वृद्धिंगत केली. ह्या पुरुषाच्या पराक्रमकथा फार आल्हाददायक असून, त्यांत मराठ्यांचे शौर्य, मरा ठ्यांचा अभिमान, मराठ्यांची कर्तृत्वशक्ति आणि मराठ्यांचे ओज इत्यादि प्रशंसनीय गुण ओतप्रोत भरले आहेत. ह्याने ज्या वेळीं रोहि। त्यांचा पराभव करून अयोध्येचा नबाब सफदरजंग ह्यास वजिरी प्राप्त करून दिली, व मराठ्यांच्या यशोवैभवाचा झेंडा रोहिलखंडांत नेऊन उभारला; त्या वेळी बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी त्याचा जो गौरव केला आहे, तो केवळ अपूर्व आहे. शाबास तुमच्या हिंमतीची व दिलेरी रुस्तुमीची; व शाबास लोकांची ! आमच्या दक्षिणच्या फौजांनी * गंगायमुनापार होऊन, रोहिले पठाणांशी युद्ध करून, आपण फत्ते पा२ वावे, हे कर्म लहान सामान्य न झाले. तुह्मीं एकनिष्ठ, कृतकर्म सेवक, या दौलतीचे स्तंभ आहां !! चित्तावर धरितां, ते घडून येते !! इत्यादि पेशव्यांचीं गौरववचने वाचून, कोणा सहृदय वीराच्या नेत्रांतून आनंदाश्रू येणार नाहींत बरें ?

जयाप्पा शिंदे ह्यांनी लढवय्या रोहिले लोकांशीं घनघोर युद्धे केलीं, व महापराक्रमी रणझुंजार रजपूत वीरांना हैं. देखील ‘दे माय धरणी ठाय' करून सोडिलें. मारवाडावरील मरा--- ठ्यांच्या स्वारीवर, राजस्थानांतील भाटांनी जीं कवित्ते रचलीं आहेत, त्यांत, जयाप्पा शिंद्याच्या रणपटुत्वाचे विस्मरण रजपूत लोकांस कधीही होणार नाही, असे ध्वनित केले आहे. असो. जयाप्पा शिंदे ह्यांचा नागोरच्या वेढ्यामध्यें जोधपुरचा राजा बिजेसिंग ह्याने अत्यंत कपटाने मारेक-यांकडून वध करविला. मृत्युसमयीं जयाप्पाचे बंधु दत्ताजी शिंदे हे जवळ होते. ते प्रियबंधूचा शस्त्रविदीर्ण व अचेतन देह अवलोकन करून शोक करू लागले. त्या वेळी हा लोकोत्तर वीरपुरुष आपल्या बंधूस हिंमत देऊन बोलता झाला कीं, ‘वैरी युद्धास आला आणि तू रांडेसारखा रडतोस ! हें क्षात्रधर्मास उचित नाहीं. आतां मजला कांहीं होत नाहीं. तुह्मीं शत्रुपराभव क- रावा. अहाहा! इतकें अलौकिक क्षात्रतेज ज्याच्या अंगीं चमकत होते, तो योद्धा मृत्यूची काय पर्वा करणार आहे ? मोरोपंतांनी झटलेच आहेः | मरण रुचे वीराला, न रुचे परि कधी अपयशे मळणें । १ टॉड साहेबांच्या राजस्थानच्या इतिहासांत पुढील पद्य दिले आहे:- याद घणा दीन आवेशी, हाप्पा वाला हेल। भागा तीनो भूपति, माल खजाना मेल ॥ १ ॥ ह्याचा तात्पर्यार्थ असा की, “आप्पाच्या रणप्रसंगाची आठवण लोकांस पुष्कळ दिवस राहील. रणांत पाठ न दाखविणारे मारवाड, बिकानीर, व रूपनगर येथील तीन भूपति देखील रणांगणांमध्ये आपले सर्व सामानसुमान व जडजवाहीर टाकून पळून गेले ! " | २ जयाप्पा शिंदे नागोरच्या वेढ्यामध्ये मारले गेले, त्या वेळीं श्री० रघुनाथराव पेशवे ह्यांनीं जयाप्पाचे चिरंजीव जनकोजी शिंदे ह्यांस जे समाधानपत्र पाठविलें, 'त्याचे उत्तर आह्मांस उपलब्ध झाले आहे. ते फार हृदयद्रावक असून त्यांतही जनकोजीचे क्षात्रतेज चमकत आहे. ह्मणून ते येथे सादर करितों:-- जयाप्पा शिंदे आपला पुरुषार्थ गाजवून इहलोक सोडून गेल्यानंतर त्यांचे बंधु दत्ताजी शिंदे व पुत्र जनकोजी शिंदे ह्यांनी अनेक युद्धांमध्ये आपल्या पराक्रमाची सीमा करून दाखविली. गिलचे व दुराणी ह्यांचा च मराठ्यांचा जो घनघोर रणसंग्राम झाला, त्यांत तर ह्या वीरपुरुषांनीं भारतीय योद्ध्यांप्रमाणे आपलें रणवीर्य व्यक्त केले

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...