मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 8
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
महादजी शिंदे ह्यांनी दिल्लीच्या बादशाहाकडून वकिलमुतालकीची वस्त्र
पुण्यास आणली. त्या वेळीं जो समारंभ झाला त्याचे वर्णन आणि त्या संबंधानें
तत्कालीन मुत्सद्यांचे अभिनंदन
पर उद्गार वाचण्यासारखे आहेत. ते !! एकत्र नमूद असलेले परशरामभाऊ पटवर्धन
ह्यांचे एक पत्र उपलब्ध झाले आहे, तेच येथे सादर करितों. हे पत्र
इतिहासदृष्ट्या मनोरंजक व वाचनीय असून, ह्यावरून पाटीलबावाविषयींचे समकालीन
मुत्सद्यांचे मतही व्यक्त होण्यासारखे आहे. राजश्रियाविराजित राजमान्य
राजश्री नाना स्वामींचे सेवेसी:- पोा परशराम रामचंद्र कृतानेक साष्टांग
नमस्कार विनंति उपरी येथील कशल ताा छ जिल्काद जाणोन स्वकीय कुशल लिहीत असले
पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री महादजी शिंदे
पाटीलबावा यांच्या भेटी जाहल्या. नंतर दुसरे दिवशीं सरकार वाड्यांत येऊन
त्यांणीं, पादशाहाकडून वकिलमुतलक व अमीरल-उमराव व बक्षीगिरीचा बहुमान घेऊन
आलो आहे; श्रीमंतांनी घ्यावा; याप्रमाणे विनंति केली. त्याजवरून सातारियास
महाराजांस || caaविनंति लेहून, तेथील आज्ञापत्र आणवून, सदर्दू बहुमान
घ्यावयाचा निश्चय करून !! आषाढ शुद्ध त्रितीयेस फर्मान बाडी केली.
श्रीमंतांनी वकिलमुतलक व अमीरल-उमरावची खिलत च्यारकुबचा व जिगा व सरपंच व
परीदा कलगीमय लटक, व माळा मरवारी व कलमदान व ढालतरवार व मोरचेल१२ व नालकी व
झालदार पालखी व शिकेकटार व माहीमरातीब व तमनतोग हत्ती व घोडा आदिकरून
पादशाहाकडून आले होते, ते बहुत आदरेकरून घेतले. श्रीमंतांनीं नजर एकशेंएक
मोहरा पादशाहास ठेविली. पाटीलबावांनी एकावन्न मोहरा डेन्यांतच श्रीमंतांस
नजर करून आदब बजाविली. तेथे तोफा वगैरेंच्या सलाम्या होऊन, श्रीमंत
वाड्यांत आल्यावर सर्वत्रांनीं नजरा करून आदब बजाविली. समारंभ चांगला
जाहला. ह्मणोन विस्तारे लिहिलें. ह्याजवरून बहुत संतोष जाहला. श्रीमंतांचा
प्रताप थोर. ताळे शिकंदर. पाटीलवावा यांणीं गुलामकादर याचे पारिपत्य करून
पादशाहाची मर्जी खुश केली. त्यांणीं श्रीमंतास बहुमान पाठविला. समारंभ बहुत
चांगला जाहला. ह्या मोठ्याच गोष्टी आहेत. मुख्य गोष्ट श्रीमंतांचा प्रभाव.
त्या योगेंकरून पाटीलवावांनी त्या प्रांतीं नक्ष केला. त्याप्रमाणेच
हुजूरही पादशाहाची मर्यादा रखून बहुमान घेतले. त्याचप्रमाणे समारंभ जाले. व
श्रीमंत वाडियांत आल्यावर दोहों पदांचीं पादशाहाकडील मुतालकीची वस्त्र
श्रीमंतांनी पाटीलबावांस खासगीचा पोशाख व जेगा, सरपेच कंठी व ढालतरवार, व
नालकी व हत्ती घोडा याप्रमाणे दिल्हे. त्याची नजर पाटीलवावांनी श्रीमंतांस
पन्नास मोहरा करून आदब बजाविली. हे पाटीलवावांची सरफराजी चांगली जाहली.
उत्तम आहे. हीं पदें भलत्यास प्राप्त व्हावयाचीं नाहींत. रा० पाटीलबावा
यांणीं त्या देशांत बहुत कष्ट मेहेनत करून शत्रू पादाक्रांत केले.
पादशाहीचा बंदोबस्त करून पादशाहांस बहुत खुश केले. त्याचे येथे कोणी सरदार
राहिला नाहीं. बाहेरील सरदार येऊन बंदोबस्त केला. तेव्हां सहजच देणे
प्राप्त जाहलें. आपण दुरंदेशी चित्तांत आणून, महाराजांची आज्ञा आणवून, बहुत
(बहुमान ?) घेतले ही मोठी थोर गोष्ट केली. आजपावेतों कोठेही व्यंग पडलें
नाहीं. पुढे दिवसेंदिवस श्रीमंतही थोर जाहले; आणि आपली निष्ठा श्रीमंतांचे
ठायीं. तेथे विस्तार काय ल्याहावा ? तसेच पाटीलवावांनी तिकडे मेहेनत करून
पदें वगैरे मिळविली, ती सर्व एकनिष्ठपणे श्रीमंतांस प्रविष्ट केली; हे
त्यांचे निष्ठेस योग्य. दुस-याकडून व्हावयाचें नाहीं. पाटिलांप्रमाणे
निष्ठा कोणाचीही पाहिली नाहीं. कोठवर वर्णना ल्याहावी ? श्रीमंतांचा प्रताप
थोर. मोठी कामें सहजांत घडतात. बहुत काय लिहिणे, कृपा करावी हे विनंति. १३
आपला शौर्यवैभवाचा कळस करून सोडला. थोरले माधवराव पेशवे । ह्यांनी,
जयाप्पाचे पुत्र जनकोजी शिंदे ह्यांजकडे जी सरदारी व जो सरंजाम होता, तो
त्यांच्या पश्चात् पाटीलबावांस छ० २९ जमादिलावल सुदूर सन आब सितैन ह्या
सालीं दिला. त्या दिवसापासून छ० ३० रजब आर्बा तिसैने पर्यंत, महादजी शिंदे
ह्यांनी शुक्लेंदूप्रमाणे आपल्या भाग्यचंद्राची वृद्धि केली; व त्याच्या
प्रकाशाने मराठ्यांचा शौर्यमहिमा | १ ता० ५ दिसेंबर इ. स. १७६३ रोज सोमवार.
२ ता० ३ मार्च इ. स. १७९४ रोज सोमवार. ३ महादजी शिंदे ह्यांनी उत्तर
हिंदुस्थानांतल्या स्वान्यांमध्ये क्रोडो रुपयांचा प्रांत जिंकून घेतला;
त्याचप्रमाणे संपत्तिहि पुष्कळ मिळविली. ह्या संपत्तीची एक यादी पुढे
लिहिल्याप्रमाणे आहे. ती पाहिली असतां शिंद्यांचे वैभव केवळ पराक्रमाच्या
जोरावर कसे वाढले ह्याची कल्पना करितां येईल:- याद पाटील यांणीं
हिंदुस्थानांतून घेतले बितपशील:- नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. राणा
गोहदकर याची जप्ती ३२०० ००० मामलत मिर्जा शफीखां । ३३००००० ० जप्ती
अफरासियाबखां ४०००००० ५७० शुजाऊतदीलखां व वजीर अफरासियाब खानाचे सासरे व
जहां गीरखां त्याचा भाऊ ४००००० राजे नारायणदास अफरासियाब खानाचा दिवान ।
३००००० महमदबेगखां हमदानी याची जप्ती ६००००० रणजीतसिंग जाट याची मामलत ।
१२००००० मामलत राजे जयनगरकर दोन वेळ ८५००००० मामलत पिटाला ( पतियाला )
६००००० ० ० ० ० ० ०अखंड प्रज्वलित केला. ह्यांच्या कारकीर्दीचा वृत्तांत हा
स्वतंत्र इतिहा साचा भाग असल्यामुळे तो येथे दाखल करणे अप्रासंगिक आहे.
तथापि, एवढे सांगणे जरूर आहे कीं, सांप्रत पाटीलबावांच्या चरित्राची जी
माहिती उपलब्ध झाली आहे, त्यापेक्षाही अधिक कागदपत्र जेव्हां प्रसिद्ध
होतील, तेव्हां ह्या थोर पुरुषाचे चरित्र फारच विचारार्ह व गंभीर आहे असे
दृष्टीस पडेल.

No comments:
Post a Comment