विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 April 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 79

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग  79

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,खर्ड्याची लढाई खर्ड्याची लढाई ही ...
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
 बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------5
 अपमानाबद्दल शिक्षा. महाराजपुरची लढाई झाल्यानंतर बायजाबाईसाहेब नासिकाहून ग्वाल्हेरीस गेल्या. नंतर बरेच दिवस त्या लष्करामध्ये फुलबागेत राहत असत. त्यांच्या तैनातीकरितां तेथे कांटिन्जन्ट फौजेपैकी थोडेसे लोक (a guard of honour) त्यावरील एक नेटिव अधिकारी असे ठेवण्यांत आले होते. त्यांनी बायजाबाईच्या स्वारीबरोबर हरहमेषा राहावे त्यांची स्वारी कोठे बाहेर जाईल त्या वेळी त्यांस सलामी द्यावी, असे त्यांच्याकडे काम होते. एके प्रसंगी बाईसाहेबांच्या स्वारीची प्रतीक्षा करीत, हे लष्करी लोक फुलबागेसमोरील मैदानांत उभे राहिले; परंतु त्यांच्या स्वारीस वेळ लागल्यामुळे, त्यांच्यावरील सुभेदारसाहेब कंटाळले, आणि विश्रांतीकरितां एका खुर्चीवर जाऊन बसले. बायजाबाईसाहेबांनी चिकाच्या पडद्यांतून ही गोष्ट पाहिली; आपली स्वारी निघण्याचे शिंग झाले असतांना, हे सुभेदारसाहेब बंदूक घेऊन सलामी देण्याकरितां तत्परअसावयाचे सोडून, आपल्यासमक्ष खुर्चीवर बसले, हे त्यांस पसंत पडले नाही. त्यांनी लगेच तीच खुर्ची त्यांच्या डोक्यावर आपटण्याचा हुकूम दिला ! ही गोष्ट एका एस्कॉर्ट ऑफिसरने लिहिली आहे. राजकारणचातुर्य किंवा मुत्सद्दीपणा. बायजाबाईसाहेबांच्या ठिकाणीं राजकारणचातुर्य किंवा मुत्सद्दीपणा हा गुण पूर्णपणे वसत असे. ह्या गुणाची उणीव मोठमोठ्या राजांमध्ये देखील असते, परंतु ती ह्या राजस्त्रीच्या ठिकाणीं बिलकूल नव्हती. ह्या गुणावरून ह्या स्त्रीचे बुद्धिवैभव स्वाभाविक शहाणपण हैं। दिसून येते. ह्याच विशिष्ट गुणामुळे ही स्त्री राज्यकारभार वाहण्यास पूर्णपणे पात्र समर्थ झाली होती. हिच्या राजकारणचातुर्याच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीं ग्वाल्हेर दरबारचे पूर्ण माहितगार युरोपियन गृहस्थ डा० होप ह्यांनी जी गोष्ट आपल्या पुस्तकांत दिली आहे, ती येथे सादर करण्यासारखी आहे. ती येणेप्रमाणेःह्या स्त्रीच्या हातीं ग्वाल्हेरचा सर्व राज्यकारभार असतांना, ब्रह्मी  लोकांशीं भरतपूरची गादी अन्यायाने बळकावणाच्या राजाशी आमची अनेक युद्धे झाली. ह्या युद्धांमुळे मार्किस ऑफ हेस्टिग्ज ह्या गव्हरनरजनरलसाहेबांच्या काटकसरीच्या कारकीर्दीमध्ये कलकत्याच्या खजिन्यांत जो अतिशय द्रव्यसंचय झाला होता, तो सर्व संपून गेला. त्यामुळे गव्हर्नरजनरल लॉर्ड आह्म ह्यांस कोठून तरी कसे तरी द्रव्य लवकर मिळविले पाहिजे, अशी जरूरी वाटू लागली. अयोध्येच्या नबाबाजवळून पैसा मागतां येईना. त्याने ५०॥६० लक्ष रुपये नुकतेच उसने दिले होते, त्याबद्दल नेपाळ संस्थानांकडून मिळालेला थोडासा प्रांत त्यास मोबदला दिला होता. तेव्हां कलकत्त्याच्या एका लोहचुंबकाच्या (द्रव्याकर्षण करणा-या गव्हरनरजनरलसाहेबांच्या) मनांत अशी कल्पना आली की, आपण शिंद्यांकडून काय मिळते ते पहावे. मराठे लोक हे फार कृपण आहेत, त्यांचे यजमान शिंदे सरकार ह्यांच्या खजिन्यांत दोन तीन कोटी रुपये पुरून ठेविलेले आहेत, असे ह्मणतात. तेव्हां बायजाबाई ह्या कंपनी सरकारास दहापांच लक्ष रुपये कशावरून . सहज देणार नाहींत ? ह्याप्रमाणे गव्हरनर जनरलसाहेबांच्या मनांत विचार आला; तो त्यांनी युक्तीने सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला. ह्या वेळी शिंद्याच्या दरबारी कर्नल स्टुअर्ट हे फार हुशार राजकारणी गृहस्थ रेसिडेंट होते. त्यांच्याकडे महाराणी बायजाबाईसाहेबांकडून हे द्रव्य उकळण्याचे नाजूक काम गुप्त रीतीने सोपविण्यांत आले. |

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...