विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 1 April 2020

राठोड राजपुत /, महाराष्ट्रात राष्ट्रकुट/ राजेघाटगे

राठोड राजपुत /, महाराष्ट्रात राष्ट्रकुट/ राजेघाटगे
घराण्याच्या शाखा आहेत..पण राठोडवंशी शाखेचे कोल्हापूरकर आहेत व तसेच त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे , विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी (ई स वी सन 1200व शतक )राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.
घाटगे उर्फ घाड‌‌‌गे हे नाव कसे पडले ? सूर्य वंशीय क्षत्रिय घराण्याची एक शाखेचा मुळं षुरूष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमनी कारकिर्दीत गाजवली.फेरिस्ती इतिहास संशोधकांनी म्हटले आहे की कामराज ह्यापुरूषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेल्या घाट हा कोलट्या उड्या मारीत तो घाट वाजवला होता अजिंक्य आश्या पराक्रम बेदरच्या व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशुराला तो घाट वाजवता आला नव्हता.आसा तो उंच असलेल्या अजिंक्य घाट ह्या कामराज ह्यापुरूषाने पराक्रम पुर्वक वाजवुन दाखवून दिला. त्यामुळे बादशहा ने खुश होऊन त्यास घाटगे ही पदवी देऊन गौरव तरकेला.आणी उच्च प्रति ची मनसब त्यास बहाल केली.व वंशपरंपरागत" सैन्यात उच्च अधिकारी "असा ,, अधिकार बहाल केला.ह्या कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती. अनेक युध्दात आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता.बहमनी संस्थापक हसन गंगो बामनी ब्राह्मणी बहमनी ह्या बादशहा ने कामराज घाटगे यांचे खुप कौतुक केले होते.ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महलाची देशगत होती. मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी लाऊन दीला होता.हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले. मनसबदार कामराज घाटगे यांच्या पुढें त्यांना सहा पुत्र होते. ह्या सहा पुत्रापासुन महाराष्ट्र देशा तील सर्व घाटगे उर्फ घाडगे घराने महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभाग ले जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहीमाच्या निमित्ताने दुर दुर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड व इंदोर व बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले . असलं तरी सर्वांचा मुळ पुरुष हे मनसबदार कामराज घाटगे(१३६१) यांचे वंशज आहेत.ह्याच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जाहगिरी वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.कागलचे संस्थान आज ही उभं आहे.छ.शाहु राजेभोसले हे मुळचे घाटगे होय.आसे म्हटले जाते.छ.शाहु हे घाटगे घराण्यातुन दत्तक घेण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थाने घेतला होता. संदभ छं.शाहु ह्या पुस्तकात वरील संदर्भासाठी पाहु शकता.
जैतपाळनाक बगडनाक लोकनाक नयननाक लोहनाक परसनाक ही काम राज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे ह्या सहा मुला पासुन पुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे विस्तार पावले असुन ह्या सर्वांचा मुळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हे होय. लेखन: नितीन घाडगे 8888494588

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...