⛳सरदार दाभाडे घराणे.
च-होली बु पुणे जिल्ह्यात भोसरी आळंदी रस्त्यावर सुमारे 25 किलोमीटर अंतरावर च-होली बुद्रुक हे ऐतिहासिक खेड आहे च-होली हे जुन्या बाजारपेठेचे गाव असून येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे येथे भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते अशा या च-होली बुद्रुक येथील दाभाड्यांच्या दुसऱ्या शाखेचे संस्थापक सोमाजीराव दाभाडे होय बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय च-होली येथील सोमाजी दाभाडे यांना स्वतंत्र जहागिरी मिळालेली होती त्यांना बारा गावच्या जहागिरीचे वतन छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मिळाले.
त्यांना दोन पुत्र होते थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमधून उल्लेख आढळतो राधाबाई ही त्याची पत्नी व सोमाजी दुसरे आणि यशवंतराव आशी त्यास मुले होते १७०७ मध्ये खंडेराव दाभाडे (तळेगाव ) याबरोबर कृष्णाजी बिन सोमाजी दाभाडे यासही मौजे येलबेली मौजे नीवखडे आणि मौजे वडवाधार येथील पाटील क्या देण्यात आल्या होत्या श. ना. जोशींच्या मते कृष्णाजीस बाबुराव नावाचा भाऊ देखील होता सगुणाबाई ही त्याची पत्नी व सवाई बाळ हा त्यांचा मुलगा होता दाभाड्यांच्या शिलालेखातून यासंबंधी माहिती मिळते कृष्णाजी च्या तीन मुलांपैकी यशवंतरावांचे नाव बारामतीच्या वेढ्यात व येते.
बारामतीच्या वेड्यात ते मारले
गेल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी कृष्णाजीस उदरनिर्वाहासाठी इनाम दिले
त्या विषयी पत्र पेशवे दप्तर खंड ३०.३१. मध्ये उपलब्ध आहे येसुबाईंच्या
सुटकेसाठी १. ऑगस्ट १७१८ खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली जी सरदार
मंडळी दिल्ली ला गेली होती यात कृष्णाजी दाभाडे यांचा उल्लेख आढळतो व
बाजीराव पेशव्यांच्या जंजिरा मोहिमेतील २४. मे.१७३३ रोजी अंबाजीपुरंदरे
यांना लिहिलेले पत्रात सरलष्कर कृष्णाजी दाभाडे यांना रवाना केले असा
उल्लेख मिळतो सोमाजीराव दाभाडे यांचे कर्तबगार सुपुत्र सुभेदार कृष्णाजीराव
दाभाडे यांच्या महान पराक्रमाने मराठेशाहीतील च-होली गाव येथे दाभाडे
घराण्याचे वर्चस्व अबाधित राहिले.कृष्णाजी दाभाडे यांच्या कारकिर्दीत
गावची भरभराट होती मोठ-मोठाले वाडे मंदिर उभारली ही कामे पूर्ण झाली
ग्रामदैवत वाघेश्वर महाराज या मंदिराच्या दर्शनी भागावर दगडामध्ये कोरलेले
लेखात कृष्णजी दाभाडे यांचा स्पष्ट उल्लेख आहे त्यांनी स्वकर्तुत्वावर
वाघेश्वर मंदिर उभारले व खोलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि दाभाडे
वाडा व कुलकर्णी वाडा या दोन वास्तू उभारल्या याविषयी सविस्तर माहिती
ग्रामदैवत वाघेश्वर आणि खोलेश्वर स्वतंत्र प्रकरणात दिलेली आहे श्रीमंत
सुभेदार कृष्णाजी दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने च-होली गावचा इतिहास
उज्वल केला.
साभार
लेखन : श्री सागर दाभाडे 🙏
च-होली
संदर्भ अशी आमची च-होली
No comments:
Post a Comment