◆॥ शिवरायांचा दरारा ॥◆
संशोधकांना शिवाजी महाराजांना संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळात असलेला दबदबा लक्षात येईल. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे, ते पत्र.
Two days since we received Letters from India written by the English President residing at Suratte who acquaints us with the daily fears they have there from Shivajiraje the Rebel who having beaten the Mogul in several Battels remains almost Master of that Country.
हिंदुस्थानच्या इतिहासात सतरावे अठरावेशतक हे मराठ्यांचे शतक आहे शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्य होत्या.. उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्या मध्ये शिवरायांचा किती दरारा होता.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.
No comments:
Post a Comment