हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ देणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये बाबाजी ढमढेरे हे एक होते. बाबाजी ढमढेरे हे पुण्यातील शिरूर तालुक्यातील “तळेगाव ढमढेरे” या गावचे होते. अफजलखानाच्या आक्रमाणवेळी एक सुरक्षित ठिकाण म्हणून शिवरायांनी कान्होजी जेधे यांचा कुटुंब कबिला तळेगावच्या बाबाजी ढमढेरे यांच्याच घरी ठेवला होता. हे जोखमीचे कार्य बाबाजी यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
१६७७ साली शिवरायांची स्वारी दक्षिण दिग्विजयास जात असताना गोवळकोंड्यास कुतुबशहा तानाशहा यांची भेट घेतली. या प्रसंगी विश्वासू सहकाऱ्यांत बाबाजी ढमढेरे होते. दिलेरखानाच्या तावडीतून संभाजीराजे स्वराज्यात सुखरूप पोहोचले तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यास जाऊन युवराज संभाजीची भेट घेतली. यावेळी एक विश्वासू मार्गदर्शक आणि अंगरक्षक म्हणून शिवाजी महाराजांनी बाबाजींची नेमणूक केली होती . त्यांच्या वंशावळींनी देखील राजाराम राजेंच्या संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली. तंजावरकर भोसल्या विरुद्धचे बंड मोडून मराठी राज्याचे रक्षण केले. पुढे हीच ढमढेरे मंडळी पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊसोबत सामील होऊन अनेक मोठे संघर्ष यशस्वी पार पाडले.स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्याच्या अखेरपर्यंत बाबाजी ढमढेरे आणि त्यांच्या वंशजांनी स्वराज्याचे रक्षण करण्यास मोलाचे योगदान दिले.
सरदार बाबाजी ढमढेरे हे शिवरायांच्या अंगरक्षक दलाचे प्रमुख सरदार होते.
अष्टौप्रहर शिवरायांसोबत असल्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही स्वतंत्र मोहीम नाही.त्यामुळे त्यांचा इतिहास दूर्लक्षीत राहिला.
दक्षिण दिग्वीजया नंतर शिवरायांनी त्यांना संभाजी राजेंच्या जवळ पन्हाळ्यावर ठेवल्याच्या नोंदी आहेत.
दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी कूतुबशहाच्या भेटी प्रसंगी मंचावर ते उपस्थीत असल्याच्या नोंदी आहेत.
त्याच प्रमाणे शिवरायांच्या आणी शंभूराजेंच्या ऐतिहासीक भेटीप्रसंगी ते उपस्थीत असल्याची नोंद आहे.
नंतरच्या काळात छत्रपती राजाराम महारांजाचे अंगरक्षक दलाचे प्रमूख सरदार हरजी ढमढेरे होते.
राजाराम महाराज किल्ले सिंहगडावर कालवश झाले.
त्यांच्या समाधी वृंदावनाची उभारणी आणी त्याच्या देखभालीची आणी पुजाअर्चा करण्याची जबाबदारी सरदार हरजी ढमढेरे यांच्यावर वंशपरंपरागत महाराणी ताराराणी साहेबांनी सोपवीली.
त्या साठी खडकवाडी(अगळंबे)
ता.हवेली,जि.पुणे येथे
वतन देण्यात आले.आजतगायत हि जबाबदारी त्यांचे वशंज निष्ठेने पार पाडत आहेत.सिंहगड किल्ल्यावरील समाधीमंदिरानजीक असलेले ढमढेरे यांचे घर १९८० साली पडले नंतर रोजची पुजा बंद पडली.
आजही छत्रपती राजाराम महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा सरदार हरजी ढमढेरे यांच्या वशंजा वतीने साजरा केला जातो.मी स्वत: सरदार हरजी ढमढेरे यांचा वशंज आहे याचा मला
आभिमान आहे.
छत्रपती शाहु महाराजांच्या कालकिर्दीत सरदार वाकोजी ढमढेरे यांनी शाहू महाराजांच्या आज्ञेवरून ६०वर्षे मोगलांच्या ताब्यात असलेले पुणे मुक्त करून स्वराज्यात सामील केले.
पेशवाईमध्ये अनेक ढमढेरे सरदारांनी मराठा साम्राज्यासाठी बलिदान दिले
हा सर्व इतिहास जेष्ठ इतिहास तज्ञ मा.पाडुरंग बलकवडे हे लीहीत आहेत.लवकरच आम्ही तो प्रकाशीत करत आहोत.
धन्यवाद!
विजय उर्फ बाळासाहेब ढमढेरे पुणे.
No comments:
Post a Comment