विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

॥ छत्रपति थोरले शाहू महाराज ॥

॥ छत्रपति थोरले शाहू महाराज ॥
१२ जानेवारी १७०८ ते १५ डिसेंबर १७४९ हा प्रदिर्घ कालखंड शाहूपर्व म्हणुन प्रख्यात आहे . १२ जानेवारी १७०८ या दिवशी थोरले शाहू हे छत्रपति जाहले . ४१ वर्षांच्या राजकीय कार्यकाळात शाहूंनी ज्याप्रकारे मराठा स्वराज्याचे रुपांतर मराठा साम्राज्यात केले व इंग्रजी सत्तेचा हिंदुस्थानाच्या राजकारणातील वर्चस्व किमान ५० वर्ष पुढे ढकलले . त्या अनुंशगाने हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल .
शिवाजी महाराज आणि थोरले शाहू या आजोबा - नातवात एक साम्य आढळते . ते म्हणजे शिवाजी महाराज हे मावळ्यांना स्वःता समान बनवु पाहत होते . तर थोरले शाहू समस्त मराठ्यांना "शिवाजी" बनवु पाहत होते .
शाहूपर्वात ज्या मराठा दौलती उदयास आल्या व नंतरच्या पन्नास वर्षात त्यांच्या दैदीप्यमान पराक्रमामुळे हिंदुस्थानचा इतिहास उजळुन निघाला .
त्या मराठा दौलती म्हणजे .... १) तळेगावचे ( महाराष्ट्र ) दाभाडे २) पुण्याचे ( महाराष्ट् ) पेशवे ३) ग्वाल्हेरचे ( मध्यप्रदेश ) शिंदे , ४) इंदौरचे ( मध्यप्रदेश ) होळकर , ५) धारचे ( मध्यप्रदेश ) पवार ६) नागपूरचे ( महाराष्ट् ) भोसले ७) वाघोलीचे ( महाराष्ट्र ) जाधवराव ८) बडोदा चे ( गुजरात ) गायकवाड ९) अक्कलकोट चे ( कर्नाटक ) भोसले
ही फक्त ठळक नावे
वरील मराठा दौलती शाहू पर्वात उदयास आल्या . अशी असंख्य हिरे , मानिक , मोती अजुन इतिहासात आहेत . शाहूंनी प्रत्येकाच्या प्रराक्रमाला वाव दिला . मुत्सद्धी शाहूंचे यश म्हणजे शाहूंच्या नंतर पुढील पन्नास वर्षात मराठ्यांनी पराक्रमाची सर्वोच्च सिमा गाठली . मराठा साम्राज्याच्सा वटवृक्षाचा विस्तार हिंदुस्थानभर केला . याची पायाभरणी शाहूंनी अतिशय योग्यरित्या केली .
रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उत्कर्षाकडं एक जैविक विकास म्हणून पाहतात, त्यासाठीच ते वृक्षाच्या रूपकाची योजना करतात.
तो महावृक्ष म्हणजे वटवृक्ष असणार, हे उघड आहे. इतर वृक्षांपेक्षा वडाचं झाड हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते, ते त्याच्या विस्ताराच्या विशिष्ट पद्धतीमुळं. वडाच्या झाडाच्या फांद्यांना पारंब्या फुटतात. त्या पारंब्यांची वाढ वरच्या दिशेनं होण्याऐवजी खालच्या दिशेनं म्हणजे जमिनीच्या रोखानं होते. जमिनीच्या दिशेनं खाली वाढलेल्या पारंब्या चक्क जमिनीत घुसतात आणि जमिनीतला जीवनरस शोषून घेऊन त्या प्रत्येक पारंबीलाच जणू एक स्वतंत्र वृक्ष उगवतो. वडाच्या पारंब्यांपासून उगवलेल्या वृक्षांची वाढ इतकी होते, की कालांतरानं मूळचं झाड कोणतं, पारंब्या कोणत्या आणि पारंब्यांना जमिनीतून फुटलेले नंतरचे वृक्ष कोणते, हे ओळखणं कठीण होऊन जावं.
१२ जानेवारी १७०८ ते १५ डिसेंबर १७४९ हे " शाहूकाळ " म्हणुन ओळखला , अभ्यासला जावा .एवढीच या शिलेदाराची प्रांजळ इच्छा आहे . #शाहूपर्व #जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...