अपरिचित इतिहास..........🙏🚩
मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या विरपत्नी
*द्वारकाबाई संताजीराव घोरपडे*
.
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाई दुसर्या
द्वारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे
पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहिते की, "संताजीच्या
निधनानंतर पुढे ५ -६ वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी
निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत तो आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे
होता. त्यावरुन १७०१ ते१७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी गाजवून सोडलीे
होती.
.
सन १७०२ मध्ये कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदनगढीला
मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडरविरूध्दच्या लढाईत राणोजींना बंदुकीच्या
गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले. राणोजींना पुत्र संतती नव्हंती.
त्यांच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी घोरपडे
हिंदूराव यांच्याकडे गजेंद्रगड येथे राहत होत्या.त्यांच्या नेमणुकीस
बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही
गावे लावून दिली होती. राणोजींच्या पत्नी संतूबाई होत. त्या राणोजींच्या
निधनानंतर त्यांना कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून
दिले होते. त्या संताजीची द्वितीय पत्नी द्वारकाबाई जवळ राहत होत्या.
राणोजीच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडेच्या घराण्यावर आलेलेल्या
संकटातून बाहेर काढले ते सरसेनापती संताजींच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई
साहेब यांनी.
.
अशा अवघड प्रसंगी त्यांना साथ दिलीे ती संताजींचे
मानसपुत्र नारो महादेव घोरपडे (जोशी) यांनी होय. छत्रपती राजाराम महाराज
यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजी (दुसरे) यांना रणराणी, महाराणी ताराबाई
साहेब यांनी गादीवर बसवून स्वतः महाराणी ताराबाई साहेब यांनी राज्यकारभार व
सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली वर सेनापती पद अनुभवी व पराक्रमी धनाजीराव
जाधवराव यांना दिले. ते योग्य सुध्दा होते. सेनापती राणोजींचा, सेनापती
धाकटा भाऊ पिराजी यास द्या हि मागणी द्वारकाबाई साहेब यांनी केली पण पिराजी
हा नेणता (लहान) होता म्हणून शक्य झाले नाही परंतु महाराणी ताराबाई साहेब
यांनी इ. सन १७०३ मध्ये पिराजीच्या नावे वडिलोपार्जित सरंजामदार चालु
ठेवण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी नवा जाबता मातोश्री द्धारकाबाई साहेब
घोरपडे यांनी करुन घेतला.
.
पण त्यांना सेनापती पद दिलो नाही. याची रुखरुख द्वारकाबाई साहेब यांना लागून राहिली.
त्यांच्या अकाली निधनामुळे त्या खचून गेल्या नाहीत. आपल्या नातवाला राणोजी
(२) घोरपडेला सेनापती पद मिळावे म्हणून पुन्हा एकदा चिकाटी ने प्रयत्न
केले. त्या वेळी देखील राणोजी नेणता होता त्याचे वय पाच वर्षे पेक्षा जास्त
नव्हंते प्रथम साताराकर छत्रपती शाहू महाराज थोरले व नंतर कोल्हापूरकर
संभाजीराजे कडे सातत्याने प्रयत्न करून मातोश्री द्वारकाबाई साहेब यांनी
कोल्हापूरच्या छत्रपती कडून पाच वर्षे वय असलेल्या नातू राणोजी ला सेनापती
पद मिळवून दिले यावरून मराठ्यांच्या राजकीय ठेवपेचात किती यशस्वी झाल्या
आहेत. हे लक्षात येईल हे शक्य झाले दोन गोष्ट मुळे एक कायम आपल्या सरंजामात
लढवय्ये फौज उभी केली व सरंजामाचा कारभारी स्वतः बंदोबस्तात ठेवले होते
त्यांचे अनेक न्यायनिवाडा ही उपलब्ध आहेत.
.
मराठ्यांच्या
इतिहासातील मातोश्री जिजाऊ साहेब, महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई,
यांच्या खालोखाल सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या पत्नी द्वारकाबाई
साहेब यांचा उल्लेख कर्तृत्ववान स्त्री असा गौरवपूर्ण उल्लेख केला तर वावगे
ठरणार नाही. त्या मे महिन्यात १७६२ मध्ये निधन पावल्या. त्यांची कपशी
सेनापती जाहागिरीत साध्वी म्हणून ख्याती होती. निधनानंतर त्यांच्या
दहभूमीवर त्यांच्या पादुका स्थापन करून समाधी बांधण्यात आली. त्यांचे निधन
वैशाख शुद्ध द्वावदशी रोजी झाल्यानंतर सेनापती कापशी येथे दरवर्षी
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाच दिवस उत्सव मोठ्या प्रमाणात समारंभापुर्वक
आज पण साजरा केला जातो. द्वारकाबाई साहेब यांना जर या अथक प्रयत्नाने साथ
दिली असेल तर तो सेनापती संताजीराव याचा मानसपुत्र नारो महादेव याने होय।।
द्वारकाबाई साहेब यांना पण संताजी नंतर नारो महादेव यास आपल्या पतिंच्या
इच्छानुसार जहागिरीतील भाग दिले पुढे घोरपडे हे आडनाव पण दिले कारण नारो
महादेव आडनांव जोशी होते. ते ब्राम्हण होते देवगड तालुक्यातील वरघडे गावचे
होय, सलाम या माऊलीच्या कर्तृत्व व नेतृत्व यांस आपले।।।
.
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांच्या बद्दल
सोशल मीडियावर पोस्ट नाही हि पहिली पोस्ट आहे यांची नोंदी घ्यावी.
.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे.
पण या काळात औरंगजेब बादशहा इरेला पेटला होता व मराठ्यांच्या अंत्यत
आणीबाणीच्या कालावधीत द्वारकाबाई साहेब यांनी सेनापती पदाचा विचार सोडून
मानसपुत्र नारो महादेव जोशी यांच्याकडे सैन्य देऊन औरंगजेब विरोधात
महाराणी ताराबाईसाहेब यांना साथ दिली. व सरंजामाचा कारभार आपल्या हातात
घेऊन योग्य उत्पन्न मिळत ठेवले कारण सैन्यात पगार वगैरे वेळेवर देऊन
औरंगजेब विरोधात जोरदार लढाईत पुढाकार घेतला. तसेच बहिर्जी घोरपडे
याच्याशी समजूतशीर भूमिका घेतली. महाराणी ताराबाई साहेब यांना भेटून
छत्रपती घराण्यावर निष्ठा कायम ठेवत असे आशिर्वाद घेतले. १७१० नंतर
छत्रपतीच्या दोन गादी निर्माण झाल्या.
.
सातारा व कोल्हापूर.
महाराणी ताराबाई साहेब यांना पिताजी घोरपडे हे ११ - १२ वर्षेचा आहेत म्हणून
सेनापती पदी बहिर्जी घोरपडे गजेदगडकर यांचा पुत्र शिदोजीराव घोरपडे
यांच्या कडे दिले कापशीकर घराण्यातील सेनापती पद घोरपडेंच्या दुसऱ्या
शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्वारकाबाई साहेब या नाराज झाल्या. पण आपल्या
सरंजामचा कारभार करताना स्थानिक लोकांना मदत करून न्यायनिवाडे दिले. विविध
धार्मिक उत्सव साजराकरण्यासाठी आर्थिक मदत केली. आपल्या जहागिरी मध्ये
लोकांच्या अडचणीत धाऊन येणे, अाशा पध्दतींन सरसेनापती संताजींराव घोरपडे
यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांना लोक ओळखले जाऊ लागले इकडे दोन्ही
छत्रपती घराण्याकडे पिराजीसाठी सेनापती मिळवे म्हणून मातोश्री द्वारकाबाई
साहेब यांनी प्रयत्न व चिकाटी सोडले नाहीत पण पिराजी हे आपल्या पराक्रमाने
१७१५ साली सेनापती पदी नियुक्ती झाली
.
पिराजीला प्रांत मिरजची
देशमुख वतन ५फेब्रवारी १७१५ अशी तारीख दिलेली असून त्यात राजश्री पिराजी
घोरपडे सेनापती असा उल्लेख आहे पुढे १७२८ ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील
छत्रपतींना पाळेगराचा त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी गेलावर तेथील देशमुखशी
लढाईत पिराजी वीर झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा राणोजी (२)यांस
सेनापतीपदी नियुक्त केले. संताजींची द्वितीय पत्नी द्वारकाबाई या त्या
काळातील कर्तबगार व दूरदृष्टी असलेले स्त्री होत्या. हे त्रिकालाबादी सत्य
आहे.
संताजीच्या निधनानंतर त्यांनी ६० वर्ष घोरपडे घराण्यांची
प्रतिष्ठा आणि लौकिक टिकवून ठेवला. इतकेच नाही तर त्यांच्या चिकाटीमुळे
सेनापती पद पुन्हां कापशीकर घोरपडे घराण्याकडे आले.
.
औरंगजेबाच्या
कालखंडातील आणीबाणीच्या प्रसंगात आपल्या कुळाचा मोठेपणा व कर्तत्वांवर झळ
पोहचू दिली नाही. प्रथम आपल्या नेणत्या पिराजीची सेनापती पदीवर नेमणूक
व्हावी यासाठी प्रयत्न केले त्याची कारकिर्द यशस्वी केली.🙏🚩
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...

No comments:
Post a Comment