विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

शाहू छत्रपती आणि मराठवाडा : जिल्हा उस्मानाबाद

शाहू छत्रपती आणि मराठवाडा : जिल्हा उस्मानाबाद
छत्रपती शिवरायांनी स्थापलेले हे स्वराज्य पाहता-पाहता शाहू महाराजांच्या काळामधे अवघ्या देशभरात व्यापले.उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत मराठ्यांच्या घोड्याच्या टापा धूळ उडवत होत्या..तो तो भाग मराठा साम्राज्याला जोडत होत्या..अशावेळी,मराठवाड्यामधे मराठ्यांचा इतिहास घडला नसेल,तर नवल….अशाच शाहूकालीन मराठवाड्याचा दुर्लक्षित इतिहास आज आपन पाहनार आहोत..
मराठवाड्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे उस्मानाबाद.आदिलशाही,काही काळ मुघल आणि नंतर निजामशाहीच्या अंमलाखाली राहीलेला भाग.याच शहरातील एक घराणे म्हणजे ‘राजे निंबाळकर घराणे’.या घराण्याचा मूळ पुरुष यमाजी..पण मुघल बादशाह जहांगीर याच्या फ़ौजेमधे याच घराण्यातील रघुनाथ निंबाळकर असल्याचे उल्लेख मिळतात. मध्यांतरी,उस्मानाबादचे इतिहास संशोधक प्रा. सतीश कदम सर यांना निंबाळकर घराण्याकडे इ.स.1720 ची एक सनद सापडली.निंबाळकर घराण्यातील राधाबाई यांना शाहू महाराजांनी चोळी-बांगडी साठी उस्मानाबादची जहागिरी दिली होती.आणि या सनदेवर शाहू छत्रपती आणि बाळाजी विश्वनाथ यांचे शिक्के आहेत.हे घराणे शिवरायांच्या घराण्याशी थेट वैवाहिक संबंध राखून होते,असे सांगितले जाते..या संबंधी पुरावे मात्र आढळत नाहीत.पण शाहू छत्रपतींचे मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांच्या घराण्याशी या निंबाळकर घराण्याचे थेट वैवाहिक संबंध होते.या घराण्यातील पराक्रमी पुरुष म्हणून ओळखले जाणारे कृष्णराव निंबाळकर यांची मुलगी मालोजीराजे भोसले यांच्याशी झाल होता (अक्कलकोटकर) तसेच याच कृष्णारावांच्या नातूची मुलगी ही मालोजीराजेंच्या पुत्राला दिली होती.यावरून या घराण्याचे त्याकाळात असणारे वजन आणि प्रतिष्ठा लक्षात येते. तसेच,उस्मानाबाद येथील एका इसमाला शाहू महाराजांनी पाटीलकीची सनद दिली होती..
शाहू काळात पराक्रम गाजवलेल्या अनेक पराक्रमी सरदारांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे सरदार ‘जानोजीराव नाईक बावणे’..!! जानोजीरावांचे वडील हे मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत महाराष्ट्रात पहिल्यांदा आले..त्यांचे पूर्वज हे जहांगीरच्या सैन्यात काम करत होते.तेव्हा,त्यापैकी एकाने शाहजहानच्या कारकिर्दी मधे 52 दिवसात 52 किल्ले जिंकले म्हणून त्यांना शाहजहान ने ‘बावणे’ हे नाव दिले. या घराण्याला, जहांगीरने ‘राव’, शाहजहानने ‘सुजानराव’ औरंगजेबाने ‘नाईकराव’ अशा पदव्या दिल्या होत्या..वडिलांच्या मृत्युनंतर जानोजीराव हे शाहू छत्रपतींना मिळाले.शाहू महाराज यांनी त्यांना आजच्या लातूर जिल्ह्यातील (तेव्हाचे उस्मानाबाद) गिरवली आणि तांदूळजा येथील जहागिरी दिली..आणि हे घराणे तांदूळजा येथे स्थायिक झाले. या घराण्यातील जानोजीरावांनी फार पराक्रम गाजवला..निजामासोबत मराठ्यांनी खरडा,राक्षसभुवन,उदगीर येथे केलेल्या लढाईमधे या जानोजीरावांनी आपली तलवार गाजवली..तसेच,इ.स. 1760 ला उदगीर येथे सदाशिवराव भाऊ यांनी निजामाचा जो पराभव केला,त्यात मोलाचा वाटा या जानोजीरावांचा होता..आणि तेव्हा मराठे-निजाम यांच्यात जो तह झाला होता,तो तह याच बावणे सरदारांच्या तांदूळजा येथील गढी मधे झाला होता.. यावेळी,60 लक्ष उत्पन्नाचा जो प्रदेश निजामाने मराठ्यांना दिला,त्याचा उल्लेख त्याने 'मराठी भाषिकांचा वाडा' असा केला. फार्सी भाषेत वाडा म्हणजे प्रदेश. बहुदा मराठवाडा या नावाची उत्पत्ती इथुनच..!!
शाहू छत्रपतींनी दिलेल्या अनेक सनदा या घराण्याकडे आहेत.. या घराण्याचे थेट वैवाहिक संबंध फत्तेसिंह भोसले यांच्याशी होते..व्यंकटराव नाईक बावणे यांची मुलगी गजराबाई ही फत्तेसिंहबाबांना दिली होती..आणि शाहू महाराजांच्या काळात,उस्मानाबादसारख्या दुर्लक्षित ठिकाणी राहूनही,आपल्या तलवारीने पराक्रम गाजवला.
उस्मानाबाद येथील राजेनिंबाळकर घराणे आणि तांदूळजा येथील सरदार बावणे घराणे यांच्यात बऱ्याच समानता आहेत..म्हणजे,ह्या दोन्ही घराण्याचा शाहू महाराजांशी संबंध होता..तसेच,कृष्णराव निंबाळकर यांच चित्र बावणे घराण्याच्या कागड़पत्रांमधे सापडले होते.दोघांनाही शाहू छत्रपतींनी सनदा दिल्या होत्या..दोन्ही घराण्याचे विवाहसंबध होते..आणि फत्तेसिंह भोसले यांच्या घराण्याशी त्यांचे असणारे विवाहसंबध आणि फत्तेसिंह बाबा हे शाहू छत्रपतींचे पुत्र होते,त्यामुळे त्यांची त्याकाळात असणारी प्रतिष्ठा,बावणे सरदारांनी उदगीरच्या लढाई मधे केलेला पराक्रम आणि निजामाच्या मुलुखाच्या इतक्या जवळ असूनही शाहू छत्रपतींविषयी त्यांची असणारी निष्ठा हे त्यांच्या त्याकाळातील महत्त्व दर्शवते….
माहिती व संदर्भ : रियासत,प्रा.सतीश कदम सर यांचे संशोधनात्मक लेख,osmanabad Gazetteer,राजेनरेश जाधवराव आणि ओंकार नायगावकर.
फोटो : 1 - राजेनिंबाळकर घरान्याचे मूळ पुरुष यमाजी राजे निंबाळकर.(फोटो मधे दर्शवल्याप्रमाणे सोबत चालनारे सेवक,त्यांचा राजपेहराव आणि मोर्चेल आदी गोष्टींवरून ते नक्कीच एखादी मोठी असामी असावे,हा अंदाज बांधता येतो.) सौजन्य राजसिंह राजेनिंबाळकर.
#शाहूपर्व #दुर्लक्षित_इतिहास #जागर_इतिहासाचा #आम्हीच_ते_वेडे

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...