एकापेक्षा एक बलाढ्य सरदार पदरी असल्यामुळे शाहू महाराज स्वतः जास्त मोहिमेवर जात नसत. बाजीरावासारख्या पेशव्यास त्यांनी थोडे स्वातंत्र्य दिले असले तरी त्यास पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवले होते. दक्षिणेत मोहीमेवर ( चित्रदुर्ग मोहीम ) असताना बाजीराव पेशवा यांनी काही पत्र व्यवहार केला नाही म्हणून त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी कडक शब्दात फटकारले होते. शाहूंनी पेशवा बाजीराव व चिमाजी आप्पा ह्या दोन्ही बंधूंस त्रिंबकराव दाभाडे यांच्या खुनाबद्दल त्यांची विधवा आई उमाबाई यांच्या पायावर लोटांगण घालून क्षमा मागायला लावली होती. कारस्थाने करणाऱ्या बाळाजीस बडतर्फ केले होते. यावरून मृत्यूपर्यंत शाहू महाराज किती प्रभावशाली होते हे स्पष्ट होते. आपल्या ४२ वर्षाच्या कारकिर्दीत चिमुकल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडवून आणले ही शाहू महाराजांची महान कामगिरी म्हणावीच लागेल. उदात्तता हा शाहू महाराजांचा एक मोठा गुण होता.
#जय_शाहू
#सरदार
🙏🏻🚩🚩
#जय_शाहू
#सरदार
🙏🏻🚩🚩

No comments:
Post a Comment