विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 July 2020

🚩राजर्षी शाहू छत्रपती यांनी केला प्लेगच्या साथीशी मुकाबला 🚩

🚩
राजर्षी शाहू छत्रपती यांनी केला
प्लेगच्या साथीशी मुकाबला 🚩
postsaambhar : डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
1896सालच्या प्रारंभी भयंकर मोठी प्लेगची साथ मुंबईमध्ये सुरू झाली .ती प्लेगची साथ हळूहळू सातारा , रत्नागिरी , बेळगाव या भागामधेही पसरू लागली .या बातमीने शाहू महाराज सावध झाले. त्यांनी करवीरच्या हद्दीत प्लेगचा प्रवेश होऊ नये म्हणून राज्याच्या सीमेवरच प्रतिबंधक मोर्चे बांधले .सन 18 97 - 98 या काळात करवीर सरकारने अनेक प्रतिबंधक हुकूम काढले होते. प्लेगचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून तातडीच्या उपाययोजना अमलात आणल्या गेल्या. कोटीतीर्थ येथील प्लेग रुग्णालयाला राजर्षि छत्रपती शाहू महाराज दररोज भेट देत असत .छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या प्रजाजनांना प्लेगच्या तावडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी अविरत प्रयत्न केले .भयंकर प्लेगच्या दिवसात शाहूमहाराजांनी स्वस्त धान्याची दुकाने उघडली. शिवाय काही अनाथालय सुद्धा उघडली. प्लेगच्या काळात शेतकऱ्यांना तगाई मंजूर केली .या दिवसात खेड्यापाड्यात स्वच्छता राखली. पिण्याचे पाणी दूषित होऊ नये म्हणून खबरदारी घेतली. अनेक गावांचे पाण्याच्या ठिकाणी स्थलांतर केले. लोकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी सरकारने फुकट औषध उपचार केले. अनेक ठिकाणी सुसज्ज दवाखाने सुरू केले. लसीकरण सक्तीचे केले ,.प्लेग उपायुक्त ,म्हणून भास्करराव जाधव यांची नेमणूक केली. अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी होऊनच त्यांना प्रवेश दिला जाऊ लागला. लोकांमध्ये प्लेग म्हणजे देवदेवतांचा कोप अशी अंधश्रद्धा होती. ती नष्ट करण्यासाठी महाराजांनी प्रबोधन कार्य सुरू केले. त्यासाठी या साथीची तसेच साथीच्या उपचारासंबंधीची शास्त्रीय माहिती देणारी माहितीपत्रके हजारो खेड्यापाड्यात वाटली.प्लेगची बातमी देणाऱ्यांना बक्षीसे देण्यात आली.प्लेगपीडित लोकांच्या निरीक्षणासाठी छावण्या काढण्यात आल्या.दुर्बल आणि गरीब जनतेला मोफत अन्न पुरवण्यात आले.प्लेगच्या संकटातून आपल्या प्रजेची सोडवणूक करण्यासाठी शाहूंमहाराजांनी जीवाचे रान केले.लोकांना दिलासा देत अविश्रांतपणे फिरत राहिले. प्रजेला प्लेगच्या तावडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी व आपल्या अडचणी प्रत्यक्ष आपल्या राजासमोर मांडता याव्यात म्हणून महाराजांनी आपले वास्तव्य पन्हाळगडावर ठेवले होते. आजूबाजूच्या खेड्यातून पाहणी करीत फिरत असलेल्या निरनिराळ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना महाराजांशी चर्चा करून त्यांना तेथे भेटणे सोयीचे होत होते.प्लेगच्या भयंकर काळात यात्रा स्थगित केल्या . दुर्बल आणि गरीब जनतेला अन्न मोफत पुरवले .
नवीन ब्रिटिश राजनैतिक प्रतिनिधी ए .एम.टी जॅक्शन हे शाहूंच्या कार्याचे निरीक्षण करीत होते. आपल्या प्रजेच्या अत्यंत वाईट परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या राजर्षि शाहूंचे कार्य पाहून त्यांना अत्यंत समाधान झाले. 1900 च्या एप्रिलमध्ये जंक्शन म्हणाले ,'आपण जातीने प्लेगच्या काळात त्रस्त झालेल्या जनतेला केलेल्या यशस्वी शासकीय मदतीबद्दल आपले अभिनंदन मी करणे यथोचित होईल.'राजर्षी शाहू एक प्रजाहितदक्ष व सुख संपन्न असे राज्यकर्ते ठरले.
आज जगभर कोरोनाने घातलेले थैमान बघुन नक्कीच आपल्याला राजश्री शाहू महाराज यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
🙏अशा या थोर राजर्षि शाहू महाराज यांना आमचा मानाचा मुजरा 🙏

No comments:

Post a Comment

भारताला इंडिया का म्हणतात?

  भारताला इंडिया का म्हणतात? सिंधू हि नदी भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक फार मोठे सुवर्णस्थान आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्क...