विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 July 2020

स्वराजसंकल्पक शहाजीराजे, छत्रपती शिवरायांचे जेष्ठ बंधू थोरले संभाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे

स्वराजसंकल्पक शहाजीराजे, छत्रपती शिवरायांचे जेष्ठ बंधू थोरले संभाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे

आवर्जून वाचा व शेअर करा...🙏

एक पिता म्हणून शहाजीराजांना शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची काळजी असणारच यात तीळमात्रही शंका नाही. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची अतिशय उत्तम तजवीज केली होती. त्यासाठी शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांना शहाजी महाराजांनी बेंगलोर येथे बोलावून घेतले. शिवभारतकार परमानंद म्हणतो शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना खालील प्रमाणे विद्या शिकवण्याची तजवीज केली. ____________________________________________
स्मृति, श्रुती, पुराने, भारत, राजनीति, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य ,व्यायाम, वस्तू विद्या, फलज्योतिष, गणित, धनुर्वेद, निरनिराळ्या भाषा, पद्य, छंद, सुभाषित, धनुष्य व चक्र, भाला, पट्टा, शक्ती युद्ध, बाहू युद्ध, दुर्ग अभेद्य करणे, मायाजाळ, विष, विषाची परीक्षा घेणे, रत्न रत्नाची परीक्षा घेणे, अवधाने, सर्व विद्या व शास्त्र.
____________________________________________
परमानंद असेही म्हणतो की शहाजीराजे यांचा दरबार बंगलोरच्या किल्ल्यात भरत असे. शिवाजी महाराजांना राज्यकारभार कसा चालवावा, न्यायनिवाडा कसा करावा, प्रशासन कस असाव हे जवळून बघता यावं म्हणून शहाजीराजे त्यांना दरबारात नेत असत.
शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनाच उत्तम प्रशिक्षण दिले नाही तर त्यांनी आपले थोरले पुत्र संभाजी महाराज यांनाही त्याच तालमीत तयार करून घेतले होते.
शिवाजी महाराजांना हे शिक्षण देत असताना शहाजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की हा मुलगा वेगळा आहे. आपल्या मनी असलेले स्वराज्याचे स्वप्न आपल्या इच्छा आकांक्षा हा सर्वतोपरी पूर्ण करण्यास अतिशय योग्य असाच आहे. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना पुणे तर्फ या आपल्या जहागिरीत २०० मुलकी कारभारी व व ४०० इतर अधिकारी तसेच शिवाजी महाराजांची काळजी घेण्यासाठी दस्तुरखुद्द आईसाहेब जिजाऊ ज्या शहाजी महाराजांच्या सर्वप्रथम सल्लागार व न्यायाधीश होत्या त्यांना पाठवण्यात आले.
____________________________________________
शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे विधीलिखित लिहिले होते ते त्यांच्या सोबत दिलेल्या राजमुद्रेवरून अगदी स्पष्ट होते. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना दिलेली राजमुद्रा अशी होती
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
याचा मराठी अर्थ असा
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.

यातील शाहसुनोः या शब्दाचा अर्थ ज्यांना कळला असेल त्यांना ही गोष्ट सांगण्याची काही गरज नाही की शहाजी महाराजांनी पुणे तर्फ येथे पाठवलेला आपला मुलगा एखादा जमीनदार किंवा जहागिरदार नसून तो फक्त आणि फक्त एक राजा आहे आणि त्या राजाला आपले राज्य दिवसेंदिवस वाढवत जायचे आहे.
____________________________________________
फक्त राजमुद्रा च नव्हे तर शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना आज आपण जो अभिमानाने मिरवतो तो भगवा सुद्धा स्वराज्याची पताका म्हणून सोपविला होता.
शहाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी महाराज यांचे ७ ते ८ शिलालेख कोलार आणि होस्कोटे या परिसरात सापडले आहेत. इतिहासाचार्य वाशी बेंद्रे यांनी या शिलालेखांचे मराठीत भाषांतर केले आहे त्यावर एक ओळ अशी आहे की राजाधिराजन राजगंभिरण महाराजाधिराज संभाजी..... ही विशेषण फक्त आणि फक्त एखाद्या राजालाच लागू होतात.

यावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते ती म्हणजे शहाजी महाराज यांनी आपले दोन्ही पुत्र संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना फक्त आणि फक्त राज्यकर्ते किंवा प्रजाप्रतिपालक म्हणूनच उदयास यावे म्हणून अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते.
____________________________________________

शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र हे एक अस समीकरण आहे की इतिहास असो किंवा आजकालचे राजकारण सत्ताकारण किंवा धर्मकारण, ते शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हाला जर स्वतःचं अस्तित्व अगदी कमी कष्टात उठावदार पणे टिकून ठेवायचं असेल तर एकच पर्याय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकतर तुम्ही शिवाजी महाराजांना आपले आदर्श किंवा गुरु माना नाहीतर मग आपल्या पूर्वज किंवा निकटवर्तीयांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून घोषित करा. शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलेल्या स्वराज्यात किंवा महाराष्ट्रात फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापरले जाते आणि कदाचित त्यामुळेच प्रत्येकाचा झेंडा हा शिवाजी महाराजांशी संबंध सांगू लागतो.
आज शिवाजी महाराजांचे गुरु कोण असा एक प्रश्न विचारला की त्याच्या उत्तरात किमान पाच पन्नास लोकांची रांग लागलेली दिसते.
ज्यांच्या बापजाद्यांची हयात रणांगण आणि मुत्सद्देगिरीत गेली असेल व ज्यांनी स्वतः किंग मेकर शहाजीराजे व दृढनिश्चयी राजमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या पोटी जन्म घेतला असेल त्यांना कुठले उपरे गुरु करून स्वराज्य स्थापन करण्याचा उद्योग करण्याचे प्रयोजनच काय?
वरील पोस्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांना आवश्यक असलेले सर्व शिक्षण व विद्या कला ह्या शहाजी महाराज यांनी दिल्या होत्या असे असताना शहाजी महाराज व आईसाहेब जिजाऊ यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी गुरु असू शकतात यावर ज्याच्या धडावर स्वतःचे मस्तक शाबूत आहे त्याचा तरी विश्वास बसणार नाही.
अखंड हिंदुस्तानवर स्वराज्याचे राज्य असावे असे स्वप्न उरी बाळगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु शहाजी महाराज व आईसाहेब जिजाऊ यांना वंदन करत समस्त बांधवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

(स्वराजसंकल्पक शहाजीराजे, छत्रपती शिवरायांचे जेष्ठ बंधू थोरले संभाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे यांचे तैलचित्र १६ जानेवारी २०१७ रोजी श्रीशंभू राज्याभिषेक दिनी दुर्गराज रायगडावर प्रदर्शित करून जगासमोर आणले आहे )

पोस्ट : ©️अमर साळुंखे भाऊ मराठा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...