विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 1 September 2020

शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला.

 


शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला.
“चौल” जगाच्या नकाशातील एके काळचे भरभराटीचे बंदर !
इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे.
त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते !
असे हे विस्मरणात गेलेले चौल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना फारचं वेगळे भासले.
चौल आज समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते.
जगाच्या नकाशात त्याकाळी “दक्षिण काशी” अशी महत्वाची भूमिका बजावणारे चौल आज त्याच नकाशात शोधावे लागते, कालाय तस्मै नम:, म्हणतात ते हे असे !
इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो.
रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे.
मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो.
पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी,
असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले.
इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.
संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...