विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 October 2020

सुपे भुईकोट (नगर जिल्हा)

 

एका रजपूत कुटुंबातून साबुसिंग उर्फ शिवाजीराव हा तरुण दक्षिणेत आला. अहमदनगरजवळील हंगे गावाच्या जवळील टेकडीच्या जंगलात राहू लागला. त्याच्याबरोबर पत्नी फुलकुँवरबाई होती. तिचे निधन झाले. निजामशाही सरदार मलिकअंबर याच्याकडे साबुसिंग नोकरीस राहिला. मालोजीराजे भोसले व शहाजीराजे तेथेच होते. पुढे शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचा उद्योग आरंभिला त्या वेळी ५० वर्षे उलटलेल्या साबुसिंगाने आली कामगिरी सुरु केली. तोरणा किल्ल्याच्या लढाईत साबुसिंग होते. सन १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण घेतले त्या वेळी त्यांच्या मदतीस साबुसिंग होते. त्या वेळी त्यांचा मुलगा कृष्णाजी यांच्याबरोबर मोहिमांत भाग घेत असत. कल्याणच्या लढाईनंतर साबुसिंगांनी सेवानिवृत्ती घेतली व ते आपल्या सुपे गावास येऊन राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुपे गावची पाटीलकी त्यांना दिली होती. नंतर हंगे गावच्या दळवी-पाटील यांच्याकडून त्यांची हत्या झाली. त्यांनंतर त्यांचे पुत्र कृष्णाजी यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली.
सुपे भुईकोट
(नगर जिल्हा)
पोस्टसांभार :विकास चौधरी 
 
संदर्भ
- माळगावकर मानोहर- Pavars of Devas Senior.
- फडके विश्वनाथ काशीनाथ- परमार घराण्याचा इतिहास.
- सरदेसाई गो.स. मराठी रियासत खंड ३.
- दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे.
- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे- सदाशिव शिवदे.


No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...