राक्षसभुवनाची लढाई आणि सलोख्याचा तह
*१७६१ मध्ये पानिपत लढाईमुळे मराठ्यांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब पेशवे मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने मराठी मुलुखावर चढाई करण्याचे योजिले होते. पण मराठ्यांना जणु हे स्वप्न आधीच पडलं होतं त्यांनी असं ठरवलं की निजाम आपल्या मुलुखावर स्वारी करण्याआधी आपण त्याच्या मुलुखावर स्वारी करु आणि झालही तसचं. इकडे मराठे त्याच्या मुलुखात हौदोस घालत होते आणि निजामाने याचाच फायदा घ्यायचा ठरवला. निजाम मराठी मुलुखावर स्वारी करण्यास निघाला स्वारी करण्यापूर्वी त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या तीन दिशेने पाठवल्या. एक तुकडी नाशिकच्या दिशेने, दुसरी तुकडी साताराच्या दिशेने तर तिसरी तुकडी पुण्याच्या दिशेने. त्यात तिसऱ्या तुकडीचे नेतृत्व तो स्वतः करत होता, त्याने पुण्यात खुप हौदोस घातला. पेशव्यांची राजधानी त्याने लुटुन हाणली आणि तिकडे मराठ्यांनीही निजामाचा अख्खा मुलुख लुटुन बेचिराख केला. जाणोजी भोसले हे पेशव्यांवर नाराज होते आणि ते निजामाला जाऊन मिळाले होते, पुढे पावसाळा सुरु होणार या हेतुने दोन्ही फौजा आपापल्या मुलुखावर माघारी फिरणार. यात मराठ्यांनी एक शक्कल लढवली. मल्हारराव होळकरांनी जाणोजी भोसले यांना ३२ लाखांचा मुलुख देऊन आपल्या बाजुने वळवले. मग जाणोजी भोसले यांनी मराठी फौजा पुण्याच्या आसपास येईपर्यंत निजामाला गाफील ठेवले. इ.स. १७६३ मध्ये बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे राघोबादादा यांनी निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबा दादाचा पराभव व्हायचा परंतु ऐनवेळी माधवराव पेशव्यांनी आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनाची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली. या लढाईत निझामाचा सडकून पराभव झाला. झालेल्या पराभवाने निजाम औरंगाबादला पळून गेला. मराठ्यांनी त्याचा पाठलाग करुन औरंगाबादला वेढा घातला, निजामाने घाबरुन तह करण्यास सांगितले. या तहाद्वारे एकुण निजामाने "८२ लक्षांचा मुलुख" मराठ्यांना दिला म्हणजेच "सलोख्याचा तह" झाला. या रितीने मराठ्यांना भिमा अलीकडचा सर्व मुलुख मराठ्यांकडे आला आणि निजामावर माधवराव पेशवे यांची वचक नानासाहेब पेशव्यांसारखीच पुन्हा झाली. यावेळी माधवराव पेशवे हे अवघे १८ वर्षांचे होते.*
*संदर्भ 
*मराठा कालखंड (भाग २)*
*१७०७ ते १८१८*


No comments:
Post a Comment