विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 16 November 2020

स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजीराव शिंदे दहातोंडे

 


स्वराज्याचे पहिले सरसेनापती

माणकोजीराव शिंदे दहातोंडे
📷माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा.
📷जन्म - (१५९२ - १५९५)
📷मुळगाव – चांदा तालुका – नेवासा जिल्हा – अहमदनगर
📷 सुरूवातीच्या काळात शहाजीराजेंबरोबर निजामशाहीत काम.
📷 मुगलांविरूद्धच्या अनेक लढाईत माणकोजींचा मोठा पराक्रम.
📷शहाजहान व आदिलशहा यांच्या बरोबर झालेल्या तहानंतर माणकोजी व शहाजीराजे विजापुरच्या सेवेत दाखल.
📷विजापुरातच शहाजीराजेंनी माणकोजींना स्वराज्याचा संकल्प सांगितला.
📷स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून शहाजीराजेंनी माणकोजींची नियुक्ती केली.
📷शिवाजीराजेंच्या मदतीसाठी माणकोजी पुण्यात दाखल.
📷माणकोजी दहातोंडे म्हणजे शहाजीराजेंचा खास जुना व इमानदार माणुस.
📷माणकोजी हे शिवाजी महारांजाचे फक्त सरसेनापतीच नाही तर मार्गदर्शक व गुरूपण होते.
📷माणकोजींच्या अनुभवामुळे व युद्धनितीमुळे स्वराज्याच्या सुरूवातीला शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या.
📷माणकोजी हे गनिमी कावा तज्ञ् म्हणून ओळखले जात.
📷स्वराज्याच्या विस्तारात माणकोजींचे खुप मोठे योगदान.
📷लोहगङ व विसापुरचे किल्ले माणकोजींनी स्वतः जिंकले.
📷पुरंदरचा किल्ला महाराजांनी पहिल्यांदा जिंकला तेव्हा माणकोजी महारांजासोबत होते.
📷१६५६ मध्ये जावळी जिंकली तेव्हा माणकोजी व रघुनाथ बळ्ळाल यांनी रणतोंङीच्या घाटात नाकेबंदी केली होती.
📷१६५७ हे माणकोजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष.
📷१४ मे १६५७ ला युवराज संभाजीराजेंचा जन्म. घरात नातवासमान युवराज जन्माला आल्यामुळे माणकोजींना आनंद.
📷बढती – मार्च १६५९ मध्ये माणकोजींना स्वराज्याचे प्रमुख सल्लागार व युद्धशास्र तज्ञ (Senior Adviser & Warfare Minister) म्हणून नियुक्त करण्यात आले.
📷जिजाबाई व शिवाजीराजेंनी दरबारात खुप मोठा सत्कार केला.
📷राजेंच्या सदरेवर माणकोजींना भारी वजन होते.
📷सईबाईंचे निधन झाले तेव्हा माणकोजींनी जातीने महाराजांचे सांत्वन केले.
📷अफजलखाना विरुद्धच्या लढाईच्या नियोजनामध्ये माणकोजींचा मोठा सहभाग होता.
📷पुन्हा एकदा रणतोंङीचा घाट बंद करण्याचे ठरविले म्हणजे खान व त्याची फौज परत जाता कामा नये.
📷खानाच्या भेटीआधीच्या बैठकीत माणकोजींचे खास मार्गदर्शन.
📷खानाच्या भेटीला जाण्याआधी महाराजांनी माणकोजींचे दर्शन घेतले.
📷खानाला मारुन आल्यानंतर दारातच उभ्या असलेल्या माणकोजींना राजांनी मिठी मारली.
📷खानाच्या वधानंतर शहाजीराजे व माणकोजींची पुण्यात भेट.
📷शहाजीराजेंच्या स्वागताला माणकोजी हजर. खुप दिवसांनी भेट झाल्यामुळे दोघांनाही आनंद.
📷शहाजीराजे , शिवाजीराजे, माणकोजी व जिजाबाई मध्ये स्वराज्याची खाजगीत चर्चा.
📷माणकोजींची तब्येत ढासळते.
📷जिजाबाई स्वतः भेटुन येतात व महाराजांना खबर देतात.
📷महाराज स्वतः शिवापुरला माणकोजींना भेटायला जातात.
📷शेवटच्या घटका मोजत असतांनाही माणकोजींना स्वराज्याचीच काळजी.
📷महाराजांना शायिस्तेखानाचा बंदोबस्त करायला सांगतात.
📷एवढी प्रकृती खालावली असुनही स्वराज्याची चिंता बघुन महाराज गहिवरतात.
📷माणकोजी माँसाहेबांना मुजरा सांगतात.
📷महाराज व माणकोजींची हिच शेवटची भेट.
📷जुलै ते अॉगष्ट दरम्यान १६६२ मध्ये शिवापुर येथे माणकोजींचे निधन.
📷माणकोजींच्या निधनाची बातमी राजांना कळते. लहानपणापासून बघितलेला एक जिव्हाळ्याचा माणूस गेल्याची राजांना खंत.
📷महाराजांनी मोठ्या मानाने माणकोजींचा अंत्यविधि केला.
📷माणकोजी हे दिलदार व मनमिळाऊ स्वभावाचे होते.
📷शहाजीराजे व शिवाजीराजे या दोघांसाठी काम करणारे एकमेव सरसेनापती.
📷शहाजीराजेंसाठी १५ वर्षे तर शिवाजीराजेंसाठी २० वर्षे सेवा.
📷सलग ३५ वर्षे स्वराज्याची सेवा.
📷१६४२ -१६५९ अशी सलग सतरा वर्षे सरसेनापती म्हणून सेवा कराणारे एकमेव सरसेनापती.
📷बाकीचे वर्षे प्रमुख सल्लागार (Senior Adviser) व युद्धशास्त्र तज्ञ (Warfare Minister) म्हणून काम.
📷दोन्ही राजांची मर्जी असल्यामुळे संपत्तीचा मोह व चिंता कधीही नाही.
📷माणकोजींना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वराज्याचाच ध्यास होता.
📷अधिक माहितीसाठी अवश्य पहा.
स्वराज्याच्या पहिल्या सरसेनापतीला मानाचा मुजरा
#संकलन- The Great Maratha श्रीमंत महादजी शिंदे सरकार

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...