विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 February 2021

#छत्रपती_शिवाजी_महाराजां #कडून_ख्रिस्ती_पाद्र्यांचा_शिरच्छेद

 


#छत्रपती_शिवाजी_महाराजां
#कडून_ख्रिस्ती_पाद्र्यांचा_शिरच्छेद
गोवा म्हणजे आमची पवित्र भूमी ! याच भूमीत कधीकाळी कंदब, सातवाहन घराण्यांनी राज्य केले. गोवा म्हणजे मौजमजा करण्याचे मुक्त अभयारण्य नव्हे, तर ती श्रीशिव-शंभूछत्रपतींच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे.
इसवी सन १४९७ साली पोर्तुगिज भारतात आले आणि इसवी सन १५१० साली पोर्तुगिजांनी गोवा ताब्यात घेतला. त्यानंतर ६ मे १४५२ रोजी सेंट झेविअर गोव्यात आला. सेंट Saint या शब्दाचा मराठी अनुवाद "संत" असा केला जातो
#संत आणि #Saint या दोन शब्दात धरती-आकाशाइतका फरक आहे. संत म्हणजे करुणा, संत म्हणजे त्याग, संत म्हणजे रंजल्या, गांजल्यांना "आपुले" म्हणणारे पण सेंट झेविअर असा संत नव्हता. त्याने गोव्यात इन्क्विझिशन सुरु करण्याची मागणी केली. इन्क्विझिशन म्हणजेच पवित्र न्यायसभा. ही न्यायसभा नसून अन्यायसभा होती. गोव्यातील जनतेवर अमानुष शब्दही फिका ठरावा इतके अत्याचार सुरु झाले. हिंदुना बाटवून ख्रिश्चन करणे नित्याचेच झाले होते.
गोव्याच्या व्हाॅईसराॅयने एकदा असा हुकुम काढला की, गोव्यात फक्त रोमन कॅथाॅलिक ख्रिश्चनच राहतील. जर हिंदुंना इथे रहायचे असेल तर त्यांनी ख्रिश्चनधर्माचा स्वीकार करावा,अन्यथा आपले घरदार, शेतीवाडी सोडुन गोवा सोडुन निघुन जावे. गोव्यातील हिंदुनी या प्रकरणाची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांकडे केली. हे ऐकल्यानंतर महाराज संतप्त झाले, त्यांनी तिसवाडीतील एक गावच उचलुन आणायला सांगितले. मराठ्यांनी सुमारे दीड हजार लोकांना पकडून महाराजांसमोर हजर केले, त्यात चार जेझुईट ख्रिश्चन पाद्री होते. हा अन्यायकारक हुकुम काढण्यात या चौघांचाही सहभाग होता. त्या चारही पाद्र्यांना समोर बोलावून महाराज त्यांना म्हणाले "तुम्ही आता आमच्या भुमीवर उभे आहात. आमचा धर्म स्वीकारणार का? पाद्र्यांनी त्याला नकार देताच त्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश महाराजांनी दिला व त्यांची मस्तके गोव्याच्या व्हाॅईसराॅयकडे पाठवून दिली. या घटनेने भयभीत होऊन व्हाॅईसराॅयने आपला हिंदुविरुध्दचा हुकूम मागे घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी केली, त्याला हिंदुचा छळ हेच मुख्य कारण होते. वरील घटना घडली त्यावेळी इंग्रजांचा एक वकील गोव्यात होता, त्याने ती हकीकत दि. ३० नोव्हेंबर १६६७ रोजी लिहीलेल्या पत्रात ईस्ट इंडिया कंपनीला कळवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुधर्मरक्षक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी समर्पित केले. गोव्यात हिंदु जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी पोर्तुगिजांना दिला होता.
जय शिवराय.
ऐसे महान शासकों और रक्षकों को हमारे #इतिहास में नहीं पढ़ाया गया इसीलिए तो आज हम मानसिक रूप से अंग्रेजों के गुलाम होकर अपने बच्चों को सांता( जोकर) बनाने पर लगे हुए है 🤦

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...