विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 March 2021

मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र.

 

१० मार्च इ.स.१६७९.

मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र.
दिलेर ने दिलेरपणे छत्रपती संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती, तीन घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिला. शिवाय छत्रपती संभाजीराजांना ७००० स्वार आणि ७००० जातीच्या मनसबीचे आलमगीर बादशहाचे फर्मान हाती दिले. छत्रपती संभाजीराजे दिलेरच्या छावनित आल्याने दिलेरला निम्मा दक्षिण देश फत्ते केल्याचा आनंद झाला होता.
छत्रपती संभाजीराजांच्या दिलेरखानाला जावून मिळन्याच्या या नवीन आणि अनपेक्षित खेळीने सिद्धिमसूद आणि दिलेरची ८० हजार फौज जी चालून येण्यास तयारच होती, त्या प्रयत्नांच खिळ बसली गेली. याचे वर्णन प्रत्यक्ष इंग्रजांनी करून ठेवले हे बरे. मुंबईहुन सुरतला गेलेले हे पत्र असे होते. " शहजादा दक्षिणेस येवून २ महीने झाले आणि छत्रपती शिवाजींचा मुलगा छत्रपती संभाजी दिलेरखानाकडे पळून गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये ठाणे धरून बसलेले असून मोगल अन आदिलशहा या दोघांनाही ते मोजीत नाहीत. किंवा यापैकी कोणीही त्यांच्यावर चालून जात नाही."
या पत्राची तारीख आहे १० मार्च १६७९.
आता आपणच विचार करा हे कसे घडले. छत्रपती संभाजीराजे १३ डिसेंबरला दिलेरच्या छावनित गेले. तेव्हा पासून म्हणजे १० मार्च हे पत्र लिहालेले गेले. तोवर सगळे स्तब्ध कसे. ना विजापरकरांनी स्वराज्यावर हमला केला ना दिलेरने स्वराज्याविरोधात मोहिम उघडली या दोन्ही शत्रूंना जागच्या जागी खिळवुन ठेवण्याचे यशस्वी राजकारण कोणी केले! याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजांच्या या अभूतपूर्व खेळीने. छत्रपती संभाजीराजे विशिष्ट उद्देशाने दिलेरला मिळाले असावेत यावर परमानंद यानेही चांगला प्रकाश टाकला आहे. छत्रपती संभाजी राजांनी दिलेरला बहुत किल्ले व बाकीचा मुलुख हस्तगत करून देतो अशी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित केले आणि आश्चर्य म्हणजे दिलेरनेही लगेच विश्वास ठेवून विजापुरकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळवीला. पहा याला म्हणतात की नाही खरा गनिमिकावा?? कालपर्यंत स्वराज्यावर एकत्र चालून जाणारे दोन मित्र छत्रपती संभाजी राजांच्या या वचनामुळे एकमेकांविरुद्ध लढायला तयार झाले. अन हो अजुन एक छत्रपती शिवाजीमहाराजांनी हंबीरमामांना आदेश दिला पाठलाग करा अन पाहा, "छत्रपती संभाजीस वाटेतच पकडून इकडे आणावा. बहुत दौडिने फौजेने पाठलाग करवा." आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाटक पहा कसे बेमालुम. छत्रपती संभाजीराजांच्या जवळ फक्त ३०० स्वार आणि पाठलाग करणार्या हंबीरमामा यांच्या जवळ २५००० फौज. हंबीररावांनी महाराजांच्या आदेशाप्रमाने अत्यंत वेगाने पाठलाग केला दरम्यान छत्रपती संभाजी राजांनी वाटेत दोन दिवस मुक्काम केला तरी तरी मोहिते त्यांना पकडू शकले नाही ??? खरोखरच हंबीरराव मोहित्यांनी जर कसूर केली असती तर महाराजांनी त्यांनी कान उघडनी नसती केली का???? बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मोहित्यांनी वर्षभर दरम्यान कोणतीच मोहिम हातात घेतली नाही का?? म्हणजे फक्त छत्रपती संभाजीराजांचा नुसता पाठलाग करत होते का?? अहो खुळे आहोत आपण सगळे, राजे होते ते छत्रपती शिवाजीराजे. पाठलाग करण्याच्या बहान्याने ते छत्रपती संभाजीराजानां बाहेरून संरक्षण पुरवत होते जेव्हा छत्रपती शिवाजीराजांचा आदेश आला अन कामगिरी फत्ते झाली की छत्रपती संभाजीराजांना सुखरूप स्वराज्यात आनने. मला वाटते हे वाचल्यावर तुमच्या डोक्यातले बरेच प्रश्न कायमचे मेले असतील. अहो आम्हाला आमचा इतिहास कधी कळला नाही तेथे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजे काय डांबले कळणार...?

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...