विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 March 2021

मारणे घराण्याची अस्सल सनद आणि इतिहासातला अपरिचीत इतिहास..!!

 

राजाराम छत्रपतींची अप्रकाशित अस्सल सनद
लेखन :सागर जाधव


 
गेल्या 10 दिवसांपासून आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर एक माहितीपूर्ण लेखमाला घेत आहोत आणि तुम्हा सर्वांच्या साथीने इतिहासाची अनेक दडलेली सुवर्णपाने उलगडल्या गेली.आणि त्याची परिणीति म्हणजे आपल्या पेज च्या हातात आलेले हे यश..
मारणे घराण्याची अस्सल सनद आणि इतिहासातला अपरिचीत इतिहास..!!
कोण्या एके काळी परंडयाचा किल्ला आणि किल्ल्यावर आपल्या पराक्रमाची छाप उमटवनारे साळुंखे म्हणजे त्याभागातले दोन भक्कम आधार..उस्मानाबाद-लातूर भागात वावरणाऱ्या या साळुंखेच्या परांडा किल्ल्यावर मुसलमानी सत्ता प्रस्थापित झाली.पण या बाणेदार मराठ्यांनी किल्ल्यावर आलेल्या सरदारास मुजरा करण्यास नकार दिला,आणि आपला मृत्यु स्वखुशीने स्वीकारला.परिस्थिती हाताबाहेर जाऊन इतरांनीही आपल्याविरुद्ध उठाव करू नये म्हणून त्या 7 भावांपैकी 2 भावांना सोडण्यात आले.अर्थात,त्या दोघांचीही मृत्युला बेडरपणे समोर जाण्याची तयारी होती,पण इतर सरदारांनी मात्र असे करण्यापासून त्या मुसलमान सरदाराला रोखले होते.हे दोघे पुन्हा मावळ भागात आपले भविष्य आजमावयाला आले.त्यातील एक भाऊ गेला पाटण येथे आणि दुसरा राहीला आपल्या मावळात..आणि मराठवाड्यात साळुंखे नावाने रुबाबात राहणारे हे घराणे माळवात येऊन झाले ‘सरदार मारणे..!!
महाबाहू शहाजी महाराजांच्या काळापासून हे घराणे स्वराज्याशी एकनिष्ठ आणि निष्ठावंत राहीले.शिवछत्रपतींच्या कित्येक मोहीमेमधे मारने प्रामुख्याने तलवार गाजवत.संभाजी महाराजांवर आधारित ‘परमानंदकाव्यम्’ ह्या ग्रंथात मारणे हे शंभू छत्रपतींच्या सरदारांपैकी एक महत्वाचे सरदार होते असे वर्णन केले आहे.
या मारणे घराण्याने आपली खरी ताकद दाखवली ती राजाराम छत्रपती यांच्या काळात.
स्वराज्याचा छत्रपती जिंजीमधून सारी सूत्रे हलवत होता आणि त्याचवेळी ह्या महाराष्ट्रधर्माची रक्षा करण्याची जिम्मेदारी साऱ्या सरदारांनी उचलली होती.राजाराम महाराज जेव्हा स्वराज्यात वापस आले,तेव्हा सिंहगड मुक्कामी त्यांनी कित्येक सरदारांच्या कार्याचे भरदरबारात मोल केले..त्यातच संभाजी महाराजांच्या काळापासून तलवारीने आपल्या घराण्याची जरब बसवणाऱ्या मारणे घराण्याला राजाराम छत्रपतींनी सनद दिली.
हीच ती अस्सल ऐतिहासिक सनद..
ह्या सनदेवर 3 शिक्के आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...