विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 April 2021

वीर सेनापती बाजी पासलकर

 

अपरिचित इतिहास 🚩

वीर सेनापती बाजी पासलकर
बाजी पासलकर स्वराज्याचे पहिले सेनापती होते हे आपल्याला सर्वाना माहित आहे....हे बाजी मुसे खोर्याचे वतनदार....काहीसे स्वतंत्र बाण्याचे.....लोकांच्या भल्यासाठी झटणारे....भीम पराक्रमी............बाजी पासलकरांचा पराक्रम तर सर्वश्रुत होताच.....शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी कोंकणात घड्श्या कोळी नावाचा एक जबदस्त पराक्रमी पण तितकाच जुलमी राजा मातला होता...घाटावरच्या मराठ्यांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला आणि त्याच्या पूर्ण सैन्याचा बाजींनी बिलालपूर गावी पराभव केला......बाजी पासलकरांचे मावळातले वाढते वजन बघून चंद्रराव मोऱ्याने त्यांना पकडून आणीन अशी आदिलशाही दरबारात शपथ घेतली होती...आणि विश्राम गडावर हल्ला करायचा असफल प्रयत्न केला होता..चंद्रराव मोऱ्याची त्या हल्ल्यात बाजी पासलकरांनी दाणादाण उडवून दिली होती......तीच गत बाजींनी तवच्या खिंडीत आदिलशाही सैन्याची केली..............तर असे हे बाजी स्वराज्याच्या फतेहखानाशी खळदबेलसर या गावी झालेल्या पहिल्या लढाईत धारातीर्थी पडले.....स्वराज्यासाठी झटणारा पहिला खांब या पहिल्या लढाईतच पडला...
बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेलेअचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळी
ल वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...