विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 April 2021

मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या विरपत्नी द्वारकाबाई संताजीराव घोरपडे

 

🙏🚩 अपरिचित इतिहास..........🙏🚩
🙏

मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या विरपत्नी
द्वारकाबाई संताजीराव घोरपडे🙏
पोस्टसांभार : Suvarna Naik Nimbalkar
.
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या सोयराबाई दुसर्‍या द्वारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्वारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय. तारिख दिलकुशा मध्ये भीमसेन सक्सेना लिहितात की, "संताजीच्या निधनानंतर पुढे ५ -६ वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली. शिपाईगिरीत ते आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होते. त्यावरुन १७०१ ते १७०२ हे वर्षे राणोजी घोरपडे यांनी शौर्याने गाजवून सोडलीे होती.
.
सन १७०२ मध्ये कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदनगढीला मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडर विरूध्दच्या लढाईत राणोजींना बंदुकीची गोळी लागून वीर मरण प्राप्त झाले. राणोजींना पुत्र संतती नव्हंती. त्यांच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांच्याकडे गजेंद्रगड येथे राहत होत्या.त्यांच्या नेमणुकीस बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही गावे लावून दिली होती. राणोजींच्या पत्नी संतूबाई या होत. त्या राणोजींच्या निधनानंतर त्यांना कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून दिले होते. त्या संताजीची द्वितीय पत्नी द्वारकाबाई जवळ राहत होत्या. राणोजींच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडेच्या घराण्यावर आलेलेल्या संकटातून बाहेर काढले ते सरसेनापती संताजींच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई साहेब यांनी.
.
अशा अवघड प्रसंगी त्यांना साथ दिलीे ती संताजींचे मानसपुत्र नारो महादेव घोरपडे (जोशी) यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजी (दुसरे) यांना रणराणी, महाराणी ताराबाई साहेब यांनी गादीवर बसवून स्वतः महाराणी ताराबाई साहेब यांनी राज्यकारभार व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.व सेनापती पद अनुभवी व पराक्रमी धनाजीराव जाधवराव यांना दिले. ते योग्य सुध्दा होते. सेनापती राणोजींचा, धाकटा भाऊ सेनापती पिराजी यास द्या हि मागणी द्वारकाबाई साहेब यांनी केली पण पिराजी हे नेणते (लहान) होते ,म्हणून शक्य झाले नाही. परंतु महाराणी ताराबाई साहेब यांनी इ. सन १७०३ मध्ये पिराजीच्या नावे वडिलोपार्जित सरंजामदार चालु ठेवण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी नवाजाबता मातोश्री द्धारकाबाई साहेब घोरपडे यांनी करुन घेतला.
.
पण त्यांना सेनापती पद दिले नाही. याची रुखरुख द्वारकाबाई साहेब यांना लागून राहिली होती.
त्यांच्या अकाली निधनामुळे त्या खचून गेल्या नाहीत. आपल्या नातवाला राणोजी (२) घोरपडेला सेनापती पद मिळावे म्हणून पुन्हा एकदा चिकाटी ने प्रयत्न केले. त्या वेळी देखील राणोजी नेणता होते. त्यांचे वय पाच वर्षे पेक्षा जास्त नव्हंते. प्रथम साताराकर छत्रपती शाहू महाराज थोरले व नंतर कोल्हापूरकर संभाजीराजे यांचे कडे सातत्याने प्रयत्न करून मातोश्री द्वारकाबाई साहेब यांनी कोल्हापूरच्या छत्रपतीं कडून पाच वर्षे वय असलेल्या नातू राणोजीना सेनापती पद मिळवून दिले. यावरून मराठ्यांच्या राजकीय डावपेचात त्या किती यशस्वी झाल्या आहेत, हे लक्षात येईल .हे शक्य झाले दोन गोष्ट मुळे एक कायम आपल्या सरंजामात लढवय्ये फौज उभी केली व सरंजामाचा कारभारी स्वतःच्या बंदोबस्तात ठेवले. त्यांचे अनेक न्यायनिवाडा ही उपलब्ध आहेत.
.
मराठ्यांच्या इतिहासातील मातोश्री जिजाऊ साहेब, महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई, यांच्या खालोखाल सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांचा उल्लेख कर्तृत्ववान स्त्री असा गौरवपूर्ण उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही. त्या मे महिन्यात १७६२ मध्ये निधन पावल्या. त्यांची कापशी सेनापती जाहागिरीत साध्वी म्हणून ख्याती होती. निधनानंतर त्यांच्या दहभूमीवर त्यांच्या पादुका स्थापन करून समाधी बांधण्यात आली. त्यांचे निधन वैशाख शुद्ध द्वावदशी रोजी झाल्यानंतर सेनापती कापशी येथे दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाच दिवस उत्सव मोठ्या प्रमाणात समारंभापुर्वक आज पण साजरा केला जातो. द्वारकाबाईसाहेब यांना जर या अथक प्रयत्नाने साथ दिली असेल तर तो सेनापती संताजीराव याचा मानसपुत्र नारो महादेव याने होय।।
द्वारकाबाई साहेब यांना पण संताजी नंतर नारो महादेव यास आपल्या पतिंच्या इच्छेनुसार जहागिरीतील भाग दिला.पुढे घोरपडे हे आडनाव पण दिले कारण नारो महादेव आडनांव जोशी होते. ते ब्राम्हण होते देवगड तालुक्यातील वरघडे गावचे होय, सलाम या माऊलीच्या कर्तृत्व व नेतृत्व यांस आपले।।।
या काळात औरंगजेब बादशहा इरेला पेटला
होता व मराठ्यांच्या अत्यंत आणीबाणीच्या कालावधीत द्वारकाबाई साहेब यांनी सेनापती पदाचा विचार सोडून मानसपुत्र नारो महादेव जोशी यांच्याकडे सैन्य देऊन औरंगजेब विरोधात महाराणी ताराबाईसाहेब यांना साथ दिली. व सरंजामाचा कारभार आपल्या हातात घेऊन योग्य उत्पन्न मिळत ठेवले .कारण सैन्यात पगार वगैरे वेळेवर देऊन औरंगजेब विरोधात जोरदार लढाईत पुढाकार घेतला. तसेच बहिर्जी घोरपडे याच्याशी समजूतशीर भूमिका घेतली. महाराणी ताराबाई साहेब यांना भेटून छत्रपती घराण्यावर निष्ठा कायम ठेवत असे आशिर्वाद घेतले. १७१० नंतर छत्रपतीच्या दोन गादी निर्माण झाल्या, सातारा व कोल्हापूर
.
महाराणी ताराबाई साहेब यांना पिराजी घोरपडे हे ११ - १२ वर्षेचा आहेत म्हणून सेनापती पदी बहिर्जी घोरपडे गजेंद्रगडकर यांचा पुत्र शिदोजीराव घोरपडे यांच्या कडे दिले .कापशीकर घराण्यातील सेनापती पद घोरपडेंच्या दुसऱ्या शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्वारकाबाई साहेब या नाराज झाल्या. पण आपल्या सरंजामचा कारभार करताना स्थानिक लोकांना मदत करून न्यायनिवाडे दिले. विविध धार्मिक उत्सव साजराकरण्यासाठी आर्थिक मदत केली. आपल्या जहागिरी मध्ये लोकांच्या अडचणीत धाऊन येणे, अाशा पध्दतींने सरसेनापती संताजींराव घोरपडे यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांना ओळखले जाऊ लागले. इकडे दोन्ही छत्रपती घराण्याकडे पिराजीसाठी सेनापती पद मिळावे म्हणून मातोश्री द्वारकाबाई साहेब यांनी प्रयत्न व चिकाटी सोडली नाही. पण पिराजी हे आपल्या पराक्रमाने १७१५ साली सेनापती पदी नियुक्त झाले.
.
पिराजीला प्रांत मिरजची देशमुख वतन ५फेब्रवारी १७१५ अशी तारीख दिलेली असून त्यात राजश्री पिराजी घोरपडे सेनापती असा उल्लेख आहे . पुढे १७२८ ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील छत्रपतींना पाळेगराचा त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्यावर तेथील देशमुखशी लढाईत पिराजींना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा राणोजी (२)यांस सेनापतीपदी नियुक्त केले. संताजींची द्वितीय पत्नी द्वारकाबाई या त्या काळातील कर्तबगार व दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या.
संताजीच्या निधनानंतर त्यांनी ६० वर्ष घोरपडे घराण्यांची प्रतिष्ठा आणि लौकिक टिकवून ठेवला. इतकेच नाही तर त्यांच्या चिकाटीमुळे सेनापती पद पुन्हां कापशीकर घोरपडे घराण्याकडे आले.
.
औरंगजेबाच्या कालखंडातील आणीबाणीच्या प्रसंगात आपल्या कुळाचा मोठेपणा व कर्तत्वांवर झळ पोहचवू दिली नाही. प्रथम आपल्या नेणत्या पिराजीची सेनापती पदीवर नेमणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले त्याची कारकिर्द यशस्वी केली.🙏🚩
🙏अशा या थोर व्दारकाबाई घोरपडे यांना मानाचा
मानाचा मुजरा 🙏
🚩जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
सौजन्य
संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...