विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 April 2021

सेनापती धनाजी जाधवपुत्र शंभूसिंग जाधवराव

 


सेनापती धनाजी जाधवपुत्र शंभूसिंग जाधवराव
_________________
माळेगाव, ता. बारामती
शंभूसिंग जाधवराव, माळेगांवकर :- हें घराणें धनाजी जाधवाच्या एका मुलापासून निघालें. धनाजीला दोन बायका होत्या. एकीचा मुलगा संताजी व दुसरीचे चंद्रसेन व शंभुसिंग. धनाजीनंतर चंद्रसेनास शाहूनें सेनापति करून शंभुसिंगास त्याची मुतालकी दिली. पुढें चंद्रसेन उघडपणें शत्रूस मिळाल्यावरून कांहीं दिवस शंभुहि त्याच्या बरोबरच शत्रूकडे होता. परंतु या दोघांत वितुष्ट येऊन शंभु हा शाहूछत्रपतीकडे आला. त्यानें त्याचा मान करून त्यास संभजीवरील एका स्वारींत प्रतिनिधीबरोबर पाठिवलें. तेथें त्यानें उत्तम कामगिरी केली जंजि-यावरिल एका स्वारींत प्रतिनिधीबरोबर शंभूस पाठविलें होतें. नंतर शाहूनें त्याला माळेगांव हें इनाम करून दिलें. (स. १७३२.) अद्यापि हा गांव या घराण्याकडे चालत आहे. कर्नाटकाच्या १७३९ तील स्वारींतहि हा हजर होता. हा इ.स. १७६० त मेल्यावर त्याचा मुलगा अमरसिंग यानें माळेगांवास राहून दौलतीचा कारभार केला. यानें कवि मोरोपंत पराडकरास आपल्या बरोबर काशीयात्रेस नेलें होतें. हा १८१७ त मरण पावला. त्याचा मुलगा रत्नसिंह हा १८७६ त मेल्यावर (याला इंग्रजीत २० हजारांचें उत्पन्न होतें ) त्याचा पुत्र अमरसिंह हा जहागिरीवर आला. तो १८७८ त वारला. त्यानंतर त्याचे दत्तक चिरंजीव शंभुसिंह हे हल्लीं विद्यमान जहागिर-दार आहेत. (दळवी-मराठी कैफियती; वाड-कैफियती.)

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...