विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 18 April 2021

क्षत्रिय मराठा



 क्षत्रिय मराठा

क्षत्रिय मराठ्यांचा उल्लेख अगदी प्राचीन इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून येतो. नाशिक जवळील नाणेघाट या सातवाहन कालीन व्यापारी मार्गावर जो विशाल शिलालेख आहे त्यावर सातवाहन राजांची माहिती आहे तो शिलालेख २००० वर्षे जुना आहे. त्यावर मरहठ्ठा असा उल्लेख आहे याचाच अपभ्रंश पुढे मराठा झाला. असे महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांचे शिलालेख आढळतात. महाजनपद काळात महाराष्ट्र अश्मक महाजनपद चा हिस्सा होता. प्रतिष्ठानपुरी म्हणजेच आताचे पैठण ही त्यांची राजधानी होती. अश्मक महाजनपदावर इश्वाकु वंशिय म्हणजे भगवान श्रीरामाचे वंशज राज्य करीत होते. त्यानंतर महाराष्ट्रात पहिलं क्षत्रिय मराठा घरांन उदयाला आलं ते म्हणजे सातवाहन त्यांची राजधानी देखील प्रतिष्ठान पुरी म्हणजे सध्याचे पैठण होती उपराजधानी जुन्नर ही होती. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार, देवगिरीचे यादव त्यांचाच अपभ्रंश पुढे जाधव असा झाला. त्यानंतर मोगलांचे राज्य आले त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य पुन्हा निर्माण केले.
हा झाला थोडक्यात महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास तर क्षत्रिय मराठा हे सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव या महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या राजघराण्याचे वंशज आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ हे शिसोदे राजवंशातील आहे म्हणून त्यांना रजपुत घोषित केले जाते पण मुळात याच सिसोदे कुळाचा मूळ पुरुष हा महाराष्ट्रातील पैठणचा आहे क्षत्रिय मराठ्यांच्या ९६ कुळातील ९२ क्रमांकाचे कुळ हे सिसोदे आहे. शिसोदे हे मूळचे क्षत्रिय मराठा कुळ आहे. (संदर्भ:- मराठा व ९६ कुळे लेखक:- रामकृष्ण कदम पान क्रमांक:- ३६ )
मराठा ही जात रजपूतांपासून पासून निर्माण झाली उत्तरेतले काही क्षत्रिय कुळ राज्य विस्तारासाठी दक्षिणेत आले आणि इथेच स्थायिक झाले तेच पुढे मराठा म्हणून संबोधले गेले असा भंपक निराधार इतिहास सांगितला जातो. अनेक मराठा कुळांची उत्पत्ती खोट्या वंशावळी दाखवून राजस्थानातून दाखवली जाते. आणि विशेष म्हणजे आपले अज्ञानी मराठे हे सर्व मान्य करतात आणि स्वतःला अभिमानाने रजपुतांचे वंशज म्हणून घेतात लाजिरवाण्या गोष्टीला अभिमानाने सांगतात.
वरील सर्व होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांना महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचाच इतिहास माहिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि अगदी मुघल हिंदुस्थानात महाराष्ट्रात यायच्या अगोदर जे महाराष्ट्रात क्षत्रिय मराठा राजे महाराजे होऊन गेले त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नाही क्वचित लोकांना माहिती आहे फक्त त्यामुळे प्राचीन महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास माहित नसल्या कारणाने मराठे रजपुतांच्या खोट्या इतिहासाला बळी पडतात.
मराठा हे मूळ हिंदुस्तानी वैदिक आर्य क्षत्रिय आहेत व रजपूत हे विदेशी आक्रमक शक (सिथींयन) कुशाण लोक जे दुसऱ्या शतकात भारतात आले ज्यांना पहिले मराठा राजघराणे सातवाहन राजे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी हरवले व महाराष्ट्राच्या बाहेर अगदी गुजरात कच्छच्या पुढे आजच्या राजस्थानात हाकलून दिले. पुढे याच लोकांना राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू करून घेतले तेच आता स्वतः ला रजपूत म्हणतात. त्यामुळेच ते स्वतःला मूळ भारतीय दाखवण्यासाठी स्वतःला भगवान श्रीराम श्रीकृष्ण यांचे वंशज सांगतात

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...