विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 June 2021

रणमार्तंड सरसेनापती ममलकतमदार ससंताजीराव घोरपडे

 समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत "

मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या वर्णनातून दिसून येते.
मराठा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या हत्येची बातमी देणाऱ्या व्यक्तीला औरंगजेबाने " खुशखबर खान " पदवी दिली होती ह्यावरूनच सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांच्या पराक्रम आणि शौर्याची महती समजून येते. छत्रपती शंभूराजांच्या हत्येचा बदला घेणारे, आपल्या अनोख्या युद्धशैली आणि वेगवान हालचालीने मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या

रणमार्तंड सरसेनापती ममलकतमदार ससंताजीराव घोरपडे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🚩
साभार : राज जाधव
@maratha_riyasat ©

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...