पाटील म्हणजे ग्रामधिपती, गावचा मुख्य अधिकारी.
पोस्तसांभार ::राज जाधव
जुन्या उज्जैन शहरात काही जुने २००० वर्षांपूर्वीचे ताम्रपट सापडले आहेत, ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संग्रही आहेत. त्या ताम्रपटात पट्टा व पाटील यांचे अर्थ दिलेले आहेत. पट्टाकिल शब्दापासून पाटील हा शब्द झालेला आहे, पट्टा म्हणजे लेख किंवा सनद आणि कील म्हणजे खिळा. खिळ्याने खोदून किंवा खिळ्याने ठोकून जी सनद किंवा पट्टा पक्का केलेला असतो तो पट्टाकील, असा जो पट्टाकील म्हणजे पाटीलकीचा पट्टा म्हणजे ताम्रपट आणि तो ताम्रपट मिळवणारा पाटील. पुढे हे लिखाण रेशमी कपड्यावर केले जात असे आणि नंतरच्या काळात कागदावर.
" पट्टी " म्हणजे पाटीलकीच्या हक्काची बाब, पाटीलकीचा कर. पट्टा म्हणजे जो ताम्रपट, कापड किंवा कागद म्हणजे पाटीलकीचा हक्क नमूद केलेले साधन. यापुढे पट्टाधिश म्हणजे राजा. ताम्रपट हे लिखित साधनातील प्राथमिक दर्जेदार साधन म्हणून समजले जाते हा संदर्भ सप्रमाण आहे यात शंका नसावी.
( टीप - ताम्रपट आणि कपड्यावर केलेले लिखाण असलेले छायाचित्र ही प्रतिकात्मक आहेत )


No comments:
Post a Comment