विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 4 June 2021

l स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची राजमुद्रा l

 Vaishali BhosaleMaratha Empire

🚩

l स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची राजमुद्रा l
शिवपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे पुत्र, हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती क्षत्रियकुलावतंस श्री शिवछत्रपति महाराज यांची मुद्रा.
" श्री l प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ll रामसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "
श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर महाराणी ताराबाईंनी आपले पुत्र शिवाजीराजे यांस गादीवर बसवून सात वर्षे स्वराज्याचा कारभार पाहिला. या काळात सर्व पत्रव्यवहार छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाने व राजमुद्रेने केला जायचा. राजाराम महाराजांनंतर गादीवर येणारे ते स्वराज्याचे चौथे छत्रपती होते.
@karvir_riyasat ©

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...