विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

दुष्काळात प्रजेची उदरपूर्ती अथवा निर्धन शेतकऱ्यांना पेरणीसाठी 👇👇👇 सरकारी धान्याची कोठारे उघडणारे साळुंखे चाळुक्य राजे

 


दुष्काळात प्रजेची उदरपूर्ती अथवा निर्धन शेतकऱ्यांना पेरणीसाठी
👇👇👇
सरकारी धान्याची कोठारे उघडणारे साळुंखे चाळुक्य राजे
---------------
______............✍️
सतीशकुमार सोळंके देशमुख,
प्रजेच्या हितासाठी दक्ष असणे हे राजाचे कर्तव्य असते. राज्यातील रयत अर्थात प्रजा संतुष्ट असेल तर राजा आणि राज्य सुखी या संकल्पनेला साळुंखे राजवंशातील राजे जाणून होते. म्हणूनच बदामीचे राजे साळुंखे चाळुक्य आणि त्यांचे थेट वंशज असलेल्या उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांनी मिळून अख्या दख्खणावर ५०० ते ५५० वर्ष रयतेला केंद्रस्थानी मानून आपले धर्मराज्य केले होते. याचे प्रमाण द्यायचे झाल्यास साळुंखे राजांकडून परिस्थिती नसलेल्या शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी शुद्ध बियाणे पुरविले जात असे. शेतकऱ्यांकडून अल्प कर आकारणी होत असे. शिवाय दुष्काळी परिस्थिती असेल तर साळुंखे राजे रयतेसाठी सरकारी धान्याची कोठारे उघडत असत. यातून त्यांची रयते विषयीची आस्था आणि प्रेम अशा गोष्टी लक्षात येते.
-----------------
श्लोक :
----------
प्रद्विपन्ति परिख्यातं राजानमतिग्वादिनम्।
अष्टमो द्वादशो वा$पि षष्टो वा धान्यतो नृपे।"
-----------------
बदामीचे सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजे साळुंखे चाळुक्य आणि त्यांचे थेट वंशज असलेले उत्तरकालीन कल्याणचे सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खणाधिपथेश्वर साळुंखे वंशीय राजे हे जनतेच्या हिताप्रति सदैव कर्तव्यदक्ष असलेला राजे म्हणून इतिहासात नावलौकिक मिळवलेले राजे होते. हे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखिय साधनांना अभ्यासल्यानंतर लक्षात येते. हे साळुंखे राजे हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी शुद्ध बियाणांची उपलब्ध करून देत असत. राज्यातील शेतकरी सुखी राहावेत, वर्षभर अडचणीत येऊ नयेत म्हणून साळुंखे राजे त्यांच्या पिकवलेल्या धान्यावर अल्प कराची आकारणी करीत असत. राज्यामध्ये अथवा राष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रजेची उपासमार वाढू नये म्हणून या राजांकडून धन्याची सरकारी कोठारे उघडली जाऊन त्यातून प्रजेसाठी धान्य वितरित केले जात असे.
--------------------
श्लोक :
----------
"फलक्षेत्रानुरुपेषा गृण्हियात् तष्करं नृप:।
अणुपूर्वेण सान्त्वेन यथाकालं यथाविधि।
----------------------
यासंदर्भातील साळुंखे राजवंशाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते, की साळुंखे हे राजे प्रजेप्रती नेहमी दक्ष राहणारे राजे होते. त्यांच्या अभिलेखातून लक्षात येणारी बाब म्हणजे, हे राजे प्रजेकडून अधिक कर घेतला तर प्रजा पीडित होते आणि यातून राजाचा नाश होण्याची शक्यता असते या विचाराचे असल्याचे दिसतात. त्यामुळे साळुंखे राजे शेतकरी आणि प्रजेवर अधिक कर लावण्याच्या विरोधात असल्याचे लक्षात येते.
मुस्लिम पूर्व काळात सार्वभौम चक्रवर्ती म्हणून चाळुक्य साळुंखे राजवंशाचे दख्खनभर साम्राज्य पसरलेले होते. त्यांनी दक्षिणेत शेकडो वर्ष राज्य केले. या राजवंशाची जरबच एवढी होती, की कोण्याही मुस्लिम शासकांची दक्षिणेकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत पण होत नव्हती. एवढ्या मोठ्या काळात दक्षिणभर राज्य केलेल्या या राजवंशाच्या काळातील राज्यव्यवस्था नेमकी कशी असेल, याची इतरांप्रमाणे मलाही उत्सुकता वाटून होती. या राजवटीमध्ये असे नेमके काय असेल, की ज्यातून साळुंखे राजवट या भागात शेकडो वर्ष टिकून होती. या सर्व गोष्टींचा उलगडा या राजवंशाच्या अभिलेखांना अभ्यासल्यानंतर आपोआपच होतो.
प्रजेतील लोक जेवढा कर सरळ मार्गाने आणि सामर्थ्याने देऊ शकतात तेवढ्याच कर आकारणीसाठी या राज्यव्यवस्थेतील कर वसुली करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राजाचे आदेश होते. असे करण्याने राजा आणि प्रजा या दोघांचेही कल्याण होते असेच साळुंखे राजाचे मत होते. प्रजेतील एक महत्वाचा हिस्सा असलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील उत्पादन अथवा उत्पादित क्षेत्र यालाच अनुसरून कर लावला पाहिजे असे देखील साळुंखे राजाचे मत होते. कोणाच्या सामर्थ्याकडे न पाहता वस्तू अनुसार कर लावणाऱ्या राजाला महाभारतात देखील 'अनिखादी' म्हणजे जास्त खाणारा असे संबोधन करण्यात आलेले आहे.
अशा बहुभक्षी राजाकडून प्रजा पीडित झाली तर ती राजाचा द्वेष करायला लागते असे साळुंखे राजांचेही मत होते. त्यामुळे साळुंखे राज्यात जेवढे उत्पादन मिळेल त्यातील आठवा, बारावा, अथवा सहावा भाग करा मधून जमा होत असे. करामधील धान्याच्या रूपाने जो कर जमा होत असे तो राज्य कोषात जमा करण्यात येई. गरज पडल्यास राजा या धान्यातून प्रजेची उदरपूर्ती करीत असे, किंवा हे धान्य राजाकडून निर्धन शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात वाटप करण्यात येत असे.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर,डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...